टेस्टी चविष्ट जळगाव स्पेशल शेंगदाणा चटणी
चटनी म्हंटले की तोंडाला छान चव येते. महाराष्टमध्ये चटणी हा प्रकार म्हणजेच पदार्थ खूप लोकप्रिय आहे. त्याच्या मुळे जेवणाला छान चव पण येते. आपण चटण्या अनेक प्रकारच्या व विविध पद्धतीने बनवतो. नारळ चटणी, शेगदाणा चटणी, कारळाची चटणी, तिळांची चटणी अश्या बऱ्याच प्रकारच्या चटण्या आपण बनवतो.
The Tasty Jalgaon Special Shengdana Peanut Chutney Recipe can be seen on our Youtube Chanel Tasty Jalgaon Special Shengdana Peanut Chutney
आपण शेंगदाणा चटणी ही सुकी बनवतो. पण ओली शेंगदाणा चटणी बनवून पहा बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. तसेच चवीला पण मस्त लागते. अश्या प्रकारची चटणी आपण वडा, इडली, डोसा उतपा बरोबर सुद्धा सर्व्ह करू शकतो.
शेंगदाणा चटणी बनवताना शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची, मीठ व तेल वापरले आहे. अगदी झटपट होणारी चटणी आहे.
साहीत्य:
1 कप शेंगदाणे
7-8 लसूण पाकळ्या
2-3 हिरव्या मिरच्या किंवा अजून 2 मिरच्या
मीठ चवीने
1 टे स्पून तेल
कृती: प्रथम शेंगदाणे भाजून, सोलून घ्या व बाजूला ठेवा. लसूण सोलून घ्या.
एका कढईमध्ये 1 टे स्पून तेल गरम करून घेऊन त्यामध्ये हिरवी मिरची घालून थोडीशी गरम करून बाजूला काढून ठेवा. बाकीचे तेल तसेच बाजूला थंड करायला ठेवा.
मिक्सरच्या भांड्यात सोललेले शेंगदाणे, लसूण तुकडे करून, हिरव्या मिरच्या तुकडे करून व मीठ घालून एकदा ग्राइंड करून घ्या. मग ½ कप पाणी घालून परत एकदा ग्राइंड करून घ्या. शेंगदाणे फार बारीक करायचे नाही जरा जाडसरच ठेवायचे. मग एका बाउलमध्ये काढून घेऊन त्यामध्ये गरम करून गार केलेले बाजूला ठेवलेले तेल मिक्स करून घ्या.
जळगावी चटणी इडली, डोसा, वडा किंवा कटलेट बरोबर किंवा भाकरी बरोबर सुद्धा छान लागते.