अक्षय तृतीया 2022 शुभ मुहूर्त, पूजाविधी, दानधर्म
हिंदू पंचांग अनुसार दरवर्षी वैशाख महिन्यात शुक्लपक्ष तृतीया ह्या तिथीला अक्षय तृतीया हा पावन पर्व साजरा केला जातो. ह्या दिवशी विष्णु भगवान व माता लक्ष्मी ह्यांची विधिपूर्वक पूजा केली जाते. अक्षय तृतीया ह्या दिवशी भगवान विष्णुचा सहावा अवतार म्हणजे भगवान परशुराम ह्यांचा जन्म झाला होता. हिंदू पंचांग अनुसार अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त मानला जातो. अक्षय तृतीया हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो.
The Akshaya Tritiya 2022 Shubh Muhurat, Puja vidhi, Mahatva Video In Marathi be seen on our You tube Chanel Akshaya Tritiya 2022 Shubh Muhurat, Puja vidhi, Mahatva
अक्षय ह्याचा अर्थ कधीही क्षय न होणारा. चंद्र गणनामध्ये सर्व तिथीचा क्षय होतो. पण तृतीया ह्या तिथीचा कधीही क्षय होत नाही. ह्या तिथीची अधिष्ठात्री माता पार्वती आहे. जर आपल्याला शुभ कार्य करण्यासाठी शुभमुहूर्त मिळत नसेल किंवा शुभ कार्य करण्यासाठी अडचणी येत आहेत. आपल्या व्यापारमध्ये लॉस होत आहे. तर त्यासाठी अक्षय तृतीया हा खूप चांगला शुभ मुहूर्त आहे. अक्षय तृतीया ह्या दिवशी साखरपुडा, विवाह, गृह प्रवेश, नवीन खरेदी, सोने-चांदी किंवा कोणतीसुद्धा नवीन खरेदी करण्यास उत्तम मुहूर्त आहे व ती खरेदी लाभदायक होते.
शुभ मुहूर्त:
अक्षय तृतीया ह्या वर्षी 3 मे 2022 मंगळवार ह्या दिवशी साजरी करायची आहे.
शुभ मुहूर्त सकाळी 5 वाजून 39 मिनिट ते
दुपारी 12 वाजून 18 मिनिट पर्यन्त
सोने-चांदी किंवा नवीन खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त:
3 मे 2022 सकाळी 5 वाजून 39 मिनिट ते 4 मे सकाळी 2022 5 वाजून 38 मिनिट पर्यन्त
चौघड़िया मुहूर्त (Chaugharia Muhurt)
चौघड़िया मुहूर्त म्हणजे अति उत्तम मुहूर्त:
सकाळी मुहूर्त – सकाळी 08:59 मिनट ते दुपारी 01:58 मिनट पर्यन्त
दुपारी मुहूर्त – दुपारी 03:38 मिनट ते संध्याकाळी 05:18 मिनट पर्यन्त
अक्षय तृतीया पूजाविधी:
अक्षय तृतीया ह्यादिवशी सकाळी लवकर उठून, स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे.
देवघर किंवा पूजा स्थान स्वच्छ करून घ्यावे. चौरंगवर लाल रंगाचे कापड घालावे.
भगवान विष्णु व माता लक्ष्मी ह्यांची मूर्ती स्थापित करावी. भगवान विष्णु ह्यांना पांढरे किंवा पिवळे रंगाचे फूल अर्पित करावे व माता लक्ष्मी ह्यांना लाल रंगाचे गुलाबाचे फूल अर्पित करावे.
अक्षय तृतीया ह्या दिवशी दोन कलश स्थापित करावे. पहिल्या कलशमध्ये पाणी भरावे मग चंदन, पिवळे फूल, पंचामृत घालावे, त्यावर मातीचे झाकण ठेवावे. झकणावर एक फळ ठेवावे. हा कलश विष्णु भगवान ह्यांच्यासाठी आहे.
दुसऱ्या कलशमध्ये पाणी भरावे, मग चंदन, काळे तीळ, व पांढरे फूल घालावे. दूसरा कलश आपल्या पितरांसाठी आहे. ह्या दोन्ही कलशची विधिपूर्वक पूजा करावी. मग दोन्ही कलश दान करावे. त्यामुळे भगवान विष्णु व पितर प्रसन्न होतात व आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी व शांती येते व आपल्या घरावर कृपा राहते व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
दान-धर्म करावे:
अक्षय तृतीया ह्या दिवशी जलदान केल्याने सर्व तीरथांचे फळ प्राप्त होते.
हिंदू धर्म नुसार अक्षय तृतीया ह्या दिवशी काही वस्तूंचे दान करणे उत्तम मानले जाते. शास्त्रानुसार अक्षय तृतीया व पूर्ण वैशाख महिना जलदान करणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की त्यामुळे सर्व तीर्थ केल्याचे पुण्य प्राप्त होते. तेपण जलदान केल्याने पुण्य प्राप्त होते. ह्या दिवशी कोणत्या सुद्धा देवळात किंवा सार्वजनिक ठिकाणी जलदान करावे. कारण की वैशाख महिना म्हणजे खूप उष्णता असते व तहानलेल्या पाणी देणे हे सर्वात पुण्याचे काम समजले जाते.
अक्षय तृतीया ही दिवशी वृक्षारोपण करणे, पशू-पक्षांना दाणा-पाणी देण्याचे काम करणे शुभ मानले जाते. त्यामुळे आपल्या जीवनात सुख-समृद्धी येते. त्याच बरोबर ब्रह्मा, विष्णु, महेश ह्या तिन्ही देवांचे आशीर्वाद प्राप्त होतात. वृक्षारोपण केल्याने सावली मिळते.
अक्षय तृतीया ह्या दिवसाला सत्ययुग व त्रेता युगची सुरवात झाली.
अक्षय तृतीया ह्या दिवशी भगवान परशुराम ह्याचा जन्म झाला.
अक्षय तृतीया ह्या दिवशी माता गंगा ह्याचा उगम झाला.
अक्षय तृतीया ह्या दिवशी वेद व्यास ह्यांनी महाभारत ग्रंथ लिहायला सुरवात केली होती.
अक्षय तृतीया ह्या दिवशी बद्रिनाथ ह्या चारधाम पैकी एक धाम ह्याचे दरवाजे उघडले जातात व त्या दिवशी पासून दर्शन घ्यायला मिळते.