परफेक्ट रिच बादाम मावा मलाई कुल्फी कुल्फी
आता उन्हाळा चालू झाला आहे. मुलांच्या शाळेला सुट्टी सुद्धा लागणार आहे. मग रोज दुपारी मुलांना काही तरी मस्त गारेगार पाहिजे. तर यंग आपण नेहमी आइसक्रीम बनवतो, सरबत बनवतो. आजा आपण मस्त पैकी आइसक्रीम पार्लरसारखी बदाम मावा कुल्फी बनवू या मग बच्चे सुद्धा खुश व आपण सुद्धा खुश.
The Badam Mawa Malai Kulfi Badam Kulfi Mawa Kulfi be seen on our You tube Chanel Badam Mawa Malai Kulfi
बदाम मावा कुल्फी बनव्याला अगदी सोपी आहे. चवीला सुद्धा मस्त लागते. बदाम मावा कुल्फी ही अगदी रिच आहे कारण की कुल्फी बनवताना फूल क्रीम दूध, मावा, मिल्क पावडर, बदाम, जायफळ व वेलची पावडर वापरली आहे,
दूध आटवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
बनवण्यासाठी वेळ: 5 मिनिट
फ्रीजमद्धे सेट करण्यासाठी वेळ: 5 तास
वाढणी: 4-6 जणसाठी
साहित्य:
½ लीटर फूल क्रीम दूध
½ कप साखर
100 ग्राम खवा (मावा)
15 बदाम (तुकडे करून)
½ कप क्रीम
2 टे स्पून मिल्क पावडर
¼ टी स्पून जायफळ पूड
1 टी स्पून वेलची पावडर
कृती:
प्रथम दूध उकळून घ्या मग त्यामध्ये साखर घालून 10 मिनिट मंद विस्तवावर आटवून घ्या. दूध आटवून निम्मे झाले पाहिजे. मग थंड करायला बाजूला ठेवा.
मावा हातानी कुस्करून घ्या. वेलची पावडर व जायफळ पावडर करून घ्या. बदाम मिक्सरमध्ये थोडे ग्राइंड करून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात मावा व थोडेसे दूध ब्लेंड करून घ्या. मग त्यामध्ये बाकीचे राहिलेले दूध, मिल्क पावडर, क्रीम, वेलची पावडर, जायफळ पावडर व बदाम घालून थोडेसे ब्लेंड करून घ्या.
जर आपल्याकडे कुल्फी मोल्ड असतील तर त्यामध्ये मिश्रण घालून फ्रीजरमध्ये 5-6 तास सेट करायला ठेवा. कुल्फी मोल्ड नसतील तर ट्रे मध्ये मिश्रण घालून झाकण ठेवून 5-6 तास सेट करायला ठेवा.
बदाम मावा कुल्फी सेट झाल्यावर सर्व्ह करा व सर्व्ह करताना वरतून बदाम घालून सजवून सर्व्ह करा.