चैत्र गौरी 2022 पूजा तारीख, मुहूर्त वेळ व पूजाविधी
हिंदू धर्ममध्ये गौरी पूजेचे खूप महत्व आहे. गौरी पूजेमध्ये महिला माता पार्वतीची पूजा अर्चा करतात. हा सण महाराष्ट्र मध्ये साजरा करतात. ह्या दिवशी माता पार्वतीला आव्हान केले जाते. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीया ह्या दिवशी चैत्र गौर बसवली जाते. आपल्या देवघरात किंवा स्वच्छ पवित्र ठिकाणी चैत्र गौर बसवली जाते. ह्या वर्षी चैत्र महिन्यात 4 एप्रिल 2022 सोमवार ह्या दिवशी गौरी तृतीया आहे. ह्या दिवशी गौरीची स्थापना करतात. माता पार्वती व शंकर भगवान ह्यांची कृपा मिळण्यासाठी हे व्रत करतात.
The Chaitra Gauri 2022 Puja Date, Muhurat And Puja Vidhi be seen on our You tube Chanel Chaitra Gauri 2022
चैत्र महिन्यात झाडांची पाने गळून पडतात व नवीन पानाचा बहर येतो. त्यालाच चैत्र पालवी असे म्हणतात. त्याचा आनंद काही निराळाच असतो. चैत्र महिन्यात लाडक्या माहेर वाशिणीच्या रूपात चैत्र गौर घरोघरी आगमन होते. आपल्या पूजा घरातील अन्नपूर्ण माताला आसनावर बसवून तिची पूजा केली जाते. तिला नेवेद्य दाखवून जवळच्या सुवासीनिना हळदी कुमकुमसाठी निमंत्रण दिले जाते.
चैत्र गौर ही कर्नाटक व राजस्थान ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरी करतात.
गौरी पूजा तारीख व वेळ:
गौरी पूजा सोमवार 4 एप्रिल 2022 ह्या दिवशी आहे.
तृतीया तिथी 3 एप्रिल 2022 12:40 सुरू होणार असून
तृतीया तिथी 4 एप्रिल 2022 13:55 पर्यन्त आहे.
शिव-गौरी पूजन शुभ मुहूर्त :
अमृत काल मुहूर्त : सकाळी 09:18 ते 11:02 पर्यंत
अभिजीत मुहूर्त : सकाळी 11:36 ते दुपारी 12:26 पर्यंत
विजय मुहूर्त : दुपारी 02:06 ते 02:56 पर्यंत
गोधूलि मुहूर्त: संध्याकाळी 06:03 ते 6.27 पर्यंत
सांयकाळ मुहूर्त: संध्याकाळी 06.16 ते 07.25 पर्यंत
निशित मुहूर्त: रात्री 11.38 ते 12.24 पर्यंत
चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना कशी करावी सोपी पद्धत:
चैत्र महिन्यात शिवपत्नी पार्वती माता गौरी रूपात पूजन केले जाते.
शिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपात पूजली जाते. गौरीची स्थापना करण्यापूर्वी घराच्या अंगणात चैत्रांगण काढावे. गौरी महिनाभर माहेरी येते म्हणून या दरम्यान दररोज अंगणात चैत्रांगण काढलं जातं.
माता अन्नपूर्णा म्हणजेच पार्वती माता होय. तिच्या स्वागता साठी आपल्या घरासमोर अंगण झाडून सारवून त्यावर वैशिष्ट पूर्ण रांगोळी काढली जाते. त्यालाच चैत्रागण असे म्हणतात.
चैत्रागण म्हणजे 51 प्रकारची शुभ चिन्ह असतात. जर आपल्याला ती काढणे शक्य नसेल तर बाजारात त्याचा साचा मिळतो त्याचा वापर करावा. त्यामध्ये आपल्या हिंदू संस्कृतिचे प्रतीक असते. अश्या प्रकारची रांगोळी काढली की अप्रतिम दिसते.
देवघरात अन्नपूर्ण मातेला स्वच्छ करून पाळण्यात बसवतात महिनाभर म्हणजेच वैशाख शुल्क तृतीया म्हणजेच अक्षयतृतीया पर्यन्त तिची पूजा अर्चा करतात. चित्र गौरची स्थापना केल्यावर तिच्या समोर शोभिवंत आरस करतात.
चैत्र महिन्यात देवीची स्थापना केल्यावर महिना भरात कोणत्या सुद्धा एका दिवशी सवाष्ण ला जेवायला बोलवावे. डाळकैरी व पन्हे द्यावे. तसेच ह्या महिन्यात जमेल तेव्हा एक दिवस आपल्या नातेवाईक किंवा सखी किंवा आजू बाजूला राहणाऱ्या महिलाना हळदी-कुंकू साठी बोलवावे. त्याना हळद-कुंकू लावून त्यांची भिजवलेल्या हरबरे व फळ ह्यांनी ओटी भरावी व त्याना प्रसाद म्हणून कैरीचे पन्हे, कैरी घालून वाटलेली हरभराडाळ द्यावी. व त्याना चांगले सुगंधी फूल द्यावे.
हे व्रत केल्याने आपल्याला सर्व कष्टा पासून मुक्ती मिळते व जीवनात सफलता मिळते. हे व्रत पूर्ण केल्यावर त्याचे उद्यापन करावे. त्याच्या मुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.