चैत्रगौर हळदी-कुंकू कैरीचे पन्हे व डाळकैरी कशी बनवायची
चैत्र शुद्ध त्रयोदशी ह्या दिवशी महाराष्टमधील स्त्रिया गौरीची स्थापना करून महिनाभर तिची पूजा अर्चा करतात. तसेच महिनाभरमध्ये कोणत्यासुद्धा मंगळवारी किंवा शुक्रवारी स्त्रियांना हळदीकुंकूला बोलावतात. गौरीला देव्हाऱ्यात किंवा पाळण्यात बसवल्या नंतर तिच्या समोर छान आरास करतात. रांगोळ्या काढतात तसेच देवीला छान दागिने व जरीचे कपडे घालून सजवतात. फळे, फुले व खाद्य पदार्थ ठेवतात. जशी गौरी गणपती पुढे करतात तशीच छान आरास करतात. असोल्या नारळांना कुंच्या घालून ती बाळे म्हणून गौरीपुढे ठेवतात. गौरी अक्षय तृतीया पर्यन्त ठेवतात. सुवासिनी महिलाना हळद कुंकू देवून हरभरे भिजवून त्यांची ओटी भरतात. पूर्ण महिन्यात कोणत्यापण एका दिवशी हे अश्या प्रकारचे हळदीकुंकू करावे.
The Chaitra Gauri Haldi-KumKum Kairiche Panhe Dal Kairi can be seen on our You tube Chanel How to make Kairiche Panhe and Dal Kairi
हळदकुंकू च्या निमिताने स्त्रिया, मैत्रिणी, नातेवाईक भेटतात त्यांचे हितगुज होते. वातावरण प्रसन्न राहते. त्यामुळे आपल्या जीवनात चांगला बदल होतो.
पूर्वीच्या काळी स्त्रिया फक्त चूल व मूल पहात असत. त्यांना मग अश्या निमिताने घरा बहरे पडता यायचे त्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद असे. आपल्याला माहीत आहेका हळदी कुंकू या प्रथेला एक विशिष्ट अर्थ आहे.
आपण हळदीकुंकू ला जे दान करतो त्याची कमतरता आपल्याला कधी सुद्धा भासत नाही. व आपल्याला भरभरून मिळते. पूर्वी स्त्रियांचे जीवन हे आपल्या पतीशी निगडीत असे. व समाजात त्याच्या मुळेच मानसन्मान मिळत असे. आपले सौभाग्य वृद्धिंगत व्हावे म्हणून प्रतेक जणी घरी हळदी कुंकू करत. तेव्हा महिलाना हाताला चंदनचा लेप लावत त्याना प्रसाद म्हणून कैरीचे पन्हे, डाळ कैरी देत. खिरापत व बत्तासे देत. मग सगळ्या स्त्रियांची हरभरेनी ओटी भरत त्यांना मोगरा किंवा चाफाचे फूल देत. नंतर गौरीची आरती करतात व मैत्रिणी बरोबर खेळ खेळले जातात झोके घेतात. असे म्हणतात की मुलगी लग्न होऊन माहेरी आली की आई कसे कोड कौतूक करते तसेच गौरीचे पण करतात.
कैरीचे पन्हे झटपट कसे बनवायचे:
साहित्य:
1 कप कैरीचा गर
2 कप (साखर+गूळ)
1 टी स्पून वेलची पावडर
मीठ चवीने
1 लीटर पाणी
पुदिना पाने सजावटी करिता
कृती: कैरी धुवून, उकडून सोलून त्याचा गर काढून घ्या. मिक्सरच्या भांड्यात कैरीचा गर, साखर, गूळ, मीठ व वेलची पावडर घालून ब्लेंड करून घ्या मग त्यामध्ये थोडेसे पानी घालून परत ब्लेंड करून घ्या. मिश्रण स्टीलच्या भांड्यात काढून घ्या. मग बाकीचे पानी घालून थंड करून सर्व्ह करा. सर्व्ह करताना पुदिना पाने घालून सर्व्ह करा.
डाळ कैरी कशी बनवायची:
साहित्य:
1 वाटी हरभरा डाळ
½ वाटी कैरी किसलेली
2-3 हिरव्या मिरच्या
मीठ व साखर चवीने
फोडणी करिता:
1 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
¼ टी स्पून हिंग
¼ टी स्पून हळद
2 हिरव्या मिरच्या (तुकडे करून)
कृती: प्रथम चनाडाळ धुवून 4 तास पाण्यात भिजत ठेवा. मग पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात डाळ, हिरवी मिरची, मीठ, साखर घालून ग्राइंड करून घ्या. ग्राइंड करताना थोडे जाडसर ठेवा. मग एका बाउलमध्ये काढून घ्या.
फोडणीसाठी तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, हळद घालून हिरवी मिरची तुकडे घालून फोडणी करून कोमट झाल्यावर वाटलेल्या डाळीवर घालून मिक्स करून सर्व्ह करा.