सहज सोपी क्रीम कस्टर्ड आइसक्रीम अगदी बाजार सारखे
आता उन्हाळा सीझन चालू आहे. त्यामुळे सगळेच गरमीमुळे हैरान झाले आहेत. आता पर्यन्त आपण बऱ्याच प्रकारचे आइसक्रीम कसे बनवायचे ते पाहिले. आता आपण घरच्या उपलब्ध असलेल्या सामाना पासून सहज सोपे आइसक्रीम कसे बनवायचे ते पाहू या.
आज आपण क्रीम कस्टर्ड आइसक्रीम बनवणार आहोत. कस्टर्ड आइसक्रीम बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. बिना झंझट आपण अश्या प्रकारचे कस्टर्ड आइसक्रीम बनवू शकतो. कस्टर्ड आइसक्रीम छान टेस्टि लागते व दिसायला आकर्षक दिसते.
The Easy Creamy Custard Ice Cream For Kids Video In Marathi be seen on our You tube Chanel Easy Creamy Custard Ice Cream
कस्टर्ड आइसक्रीम बनवण्यासाठी दूध, साखर, कस्टर्ड पावडर, क्रीम पाहिजे. हे सामान आपल्या घरी नेहमी असते त्यामुळे आपण कमीत कमी खर्चामध्ये हे कस्टर्ड आइसक्रीम बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
सेटिंग वेळ: 4 – 6 तास
वाढणी: 4-6 जणसाठी
साहित्य:
½ लीटर दूध
½ कप साखर (किंवा 3 टे स्पून साखर)
2 टे स्पून कस्टर्ड पाऊडर
½ कप व्हिप क्रीम
½ टी स्पून वानिला एसेन्स किंवा
3-4 थेंब ऑरेंज/मॅंगो इमल्शन
सजावटी करिता:
1 टे स्पून टूटी फ्रूटी
कृती: ½ लीटर दूध गरम करायला ठेवा. दूध गरम झालेकी 5 मिनिट मंद विस्तवावर ठेवा.
एका बाउलमध्ये ½ कप दूध बाजूला काढून ठेवा. मग त्यामध्ये कस्टर्ड पाउडर मिक्स करून घ्या. दूध व कस्टर्ड पावडर पूर्ण विरघळली पाहिजे त्यामध्ये गुठळी होता कामा नये.
आता गरम केलेल्या दुधामद्धे कस्टर्ड पावडरचे दूध मिक्स करून घेऊन 2-3 मिनिट मंद विस्तवावर गरम करून घ्या. मग त्यामध्ये साखर घालून मिक्स करून सतत हलवत रहा साधरण पणे 3-4 मिनिट. मग विस्तव बंद करून पॅन खाली उतरवून घेऊन थंड करायला ठेवा.
एका बाउलमध्ये व्हिप क्रीम घेऊन चांगले फेटून घ्या. अगदी फुलले पाहिजे. मग थंड झालेल्या कस्टर्ड, एसेन्स किंवा इमल्शन मिश्रणात घालून परत 1-2 मिनिट व्हिपिंग मशीननी व्हिप करून घ्या. आता एका भांड्यात किंवा प्लॅस्टिक डब्यात हे मिश्रण काढून झाकून फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवा. आइसक्रीम सेट होण्यासाठी साधारणपणे 2 तास लागतील. मग दोन् तासानंतर परत व्हिप करून घ्या, परत भांडे किंवा डब्बा फ्रीजमद्धे ठेवा.
कस्टर्ड आइस क्रीम सेट झाल्यावर सर्व्ह करा.