हेल्दी पालक इडली मुलांच्या डब्यासाठी नाश्तासाठी रेसीपी
इडली ही दक्षिण भारत ह्या भागतिल डिश असलीतरी भारतभर व भारता बाहेरसुद्धा लोकप्रिय आहे. इडली ही पचायला हलकी व हेल्दी सुद्धा आहे. इडलीचे मिश्रण बनवले की आपल्याला पाहिजे तशी इडली वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येते.
आपण ह्या अगोदर मसाला इडली किंवा इडली सांबर कसे बनवायचे ते पहिले आता आपण हेल्दी इडली कशी बनवायची ते पाहू या.
The Healthy Idli For Kids Tiffin Or Breakfast be seen on our You tube Chanel Spinach Idli Palak Idli
हेल्दी इडली बनवताना पालक वापरुन त्यावर फोडणी घातली की खूप छान टेस्ट येते.
मुलांना रोज डब्यात काहीना काही वेगळे लागत असते. मग आपण विचार करतो की हेल्दी काय बनवायचे.
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहीत्य:
2 ½ कप इडली बॅटर
½ कप पालक पयूरी
2 हिरव्या मिरच्या (बारीक कुटून)
½” आले (किसून)
मीठ चवीने
फोडणी करिता:
2 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
¼ टी स्पून हिंग
¼ टी स्पून हळद
8-10 कडीपत्ता पाने
कृती:
प्रथम इडलीचे बॅटर बनवून घ्या. पालक स्वच्छ धुवून, उकडून त्याची पयूरी करून घ्या. हिरवी मिरची व आले पेस्ट करून घ्या. इडली पात्राला तेल लाऊन ठेवा. व इडली पात्रामध्ये पाणी घालून गरम करायला ठेवा.
एका बाउलमध्ये इडलीचे बॅटर, पालक पयूरी, हिरवी मिरची, आले, मीठ घालून मिश्रण बनवून घ्या. मग इडली पात्रामध्ये इडलीचे बॅटर घालून 12-15 मिनिट वाफवून घ्या. मग विस्तव बंद करून इडली बाहेर काढून थंड करायला ठेवा. इडली एका प्लेटमध्ये काढून घ्या.
कढईच्या वाटीत तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग हळद व कडीपत्ता घालून फोडणी बनवून थोडी थोडी फोडणी चमच्यानी इडलीवर घाला.
टोमॅटो सॉस बरोबर इडली सर्व्ह करा टोमॅटो सॉस बरोबर छान लागते.