अश्या भयंकर गरमीमद्धे असे सरबत बनवा पिलेकी त्याचा स्वाद कधीच विसरणार नाही
आता उन्हाळा सीझन चालू झाला आहे. गरमी मुळे सगळे हैराण झाले आहेत. अश्या वेळेस आपण काही थंड पेय सेवन केले तर आपल्या शरीराला छान थंडावा मिळतो.
The Refreshing Summer Season Drinks Video In Marathi be seen on our You tube Chanel Summer Season Sharbat
आज आपण ह्या भयंकर गरमी साठी एक छान मजेदार सरबत बनवणार आहोत. पण हे सरबत आपण दुधाचा वापर करून बनवणार आहोत. गरमीच्या सीझनमध्ये थंड दूध आपल्या आरोग्यासाठी फायदेमंद आहे.
आपण दूध, कस्टर्ड पावडर व खूप सारा बर्फ वापरुन हे अश्या प्रकारचे सरबत बनवणार आहोत. हे सरबत जेव्हडे थंड सेवन कराल तेव्हडे ते छान लागते.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 2 जणांसाठी
साहित्य:
2 कप दूध
1 टे स्पून कस्टर्ड पावडर
½ वाटी दूध
4 टी स्पून साखर
1 टे स्पून काजू-बदाम-पिसे पावडर
सजावटी करिता:
बदाम-पिस्ते तुकडे
केशर काड्या
आइस क्युब
कृती: एका पॅनमध्ये दूध गरम करायला ठेवा. दूध गरम झालेकी 5 मिनिट मंद विस्तवावर ठेवा.
एका बाउलमध्ये ½ कप दूध व कस्टर्ड पाउडर मिक्स करून घ्या. गुठळी होता कामा नये. मग ते मिश्रण गरम दुधात घालून मिक्स करून 5 मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या. आता त्यामध्ये साखर व बदाम पावडर घालून मिक्स करून 2-3 मिनिट गरम होऊ द्या. विस्तव बंद करून दूध थंड होऊ ध्या.
दूध थंड झालेकी फ्रीजमद्धे थोडावेळ थंड करून घ्या. मग त्यामध्ये आईस क्युब घालून काचेच्या डेकोरेटीव्ह ग्लासमध्ये सरबत ओतून त्यामध्ये आइस क्युब घालून वरतून काजू-बदाम तुकडे घालून थंडगार सरबत सर्व्ह करा.