इन्स्टंट रवा-मावा मोदक | गणेश चतुर्थी स्पेशल मोदक नैवेद्य खिरापत
मोदक हे गणपती बापांचे आवडतीचे खाद्य आहे. गणेश चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी ह्या दिवशी आपण गणपती बापाना प्रसाद म्हणून मोदक दाखवतो.
आपण निरनिराळ्या पद्धतीने मोदक बनवू शकतो. त्यामध्ये उकडीचे मोदक, तळलेले मोदक किंवा इन्स्टंट मोदक. आपण ह्या अगोदर बऱ्याच प्रकारचे मोदक कसे बनवायचे ते पहिले. आता आपण इन्स्टंट मोदक कसे बनवायचे ते पाहू या.
The Maharashtrian Instant Rava-Khava Modak | Modak For Ganesh Chaturthi Naivedya Video In Marathi be seen on our You tube Chanel Instant Rava-Khava Modak
इन्स्टंट मोदक हे झटपट होतात तसेच ते छान चविष्ट सुद्धा लागतात. इन्स्टंट मोदक बनवताना खवा, रवा, साखर व ड्रायफ्रूट वापरले आहेत ते दिसायला आकर्षक दिसतात.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 12 मोदक मध्यम आकाराचे बनतात
साहित्य:
1 कप रवा
100 ग्राम खवा
½ कप साखर
1 कप दूध
2 टे स्पून तूप
1 टी स्पून वेलची पावडर
¼ कप काजू-बदाम-पिस्ते (तुकडे करून)
कृती: काजू-बदाम-पिस्ते चिरून बाजूला ठेवा. वेलची पावडर करून बाजूला ठेवा. खवा किसून घ्या
एका नॉनस्टिक पॅनमध्ये 1 चमचा तूप घेऊन त्यामध्ये खवा थोडा गुलाबी रंगावर परतून घेऊन बाजला ठेवा.
मग त्याच पॅनमध्ये 2 टे स्पून तूप गरम करून त्यामध्ये रवा मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्या. मग त्यामध्ये साखर घालून 2 मिनिट परतून घ्या. आता त्यामध्ये कोमट दूध घाला पण दूध घालताना एकदम सगळे दूध घालू नका हळू हळू दूध घालून मिक्स करा. रवा छान फुलला पाहिजे.
आता मिश्रण थोडेसे घट्ट झालेकी त्यामध्ये वेलची पावडर व ड्रायफ्रूट घालून मिक्स करून विस्तव बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये भजलेला खवा घालून मिक्स करून घ्या.
मोदक बनवण्याचा साचा घेऊन त्याला आतून थोडेसे तूप लावून वरच्या बाजूला पिस्ताचे 2 तुकडे ठेवून त्याच्यावर बनवलेले मोदक चे मिश्रण ठेवा व साचा बंद करून मिश्रण थोडे दाबून भरा. मग साचा उघडून मोदक प्लेटमध्ये काढून ठेवा. अश्या प्रकारे सर्व मोदक बनवून घ्या.
मोदक बनवून झालेकी गणपती बाप्पाना नेवद्य दाखवा.