महाराष्ट्रियन इन्स्टंट आंबट-गोड कैरीचे लोणचे 5 मिनिटांत
लोणचे हा एक असा पदार्थ आहे की त्याच्या मुळे आपल्या तोंडाला छान चव येते. महाराष्ट्रमध्ये ताटात लोणचे चटणी हे हवेच त्याच्या शिवाय जेवणाला चव येत नाही.
लोणचे आपण जेवणात किंवा ब्रेकफास्ट मध्ये सुद्धा घेऊ शकतो. आपण कैरीचे. लिंबाचे किंवा मिरचीचे लोणचे किंवा अजून नानाविध प्रकारची लोणची बनवतो. लोणचे बनवताना आपण वर्ष भराचे सुद्धा टिकवू लोणचे बनवतो. पण टिकवू लोणचे बनवायचे म्हणजे ते मुरायला 15 तरी दिवस लागतात.
The Maharashtrian Instant Kairiche Lonche | Raw Mango Pickle Video In Marathi be seen on our You tube Chanel Kairiche Lonche | Raw Mango Pickle
इन्स्टंट झटपट लोणचे बनवताना कैरी, मोहरीची डाळ, मेथी दाणे, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, साखर, मीठ व तेल वापरले आहे. हे झटपट लोणचे अगदी कमी वेळात बनवता येते व लगेच खाता सुद्धा येते. पण अश्या प्रकारचे लोणचे 2-3 दिवसा पर्यन्तच टिकते.
बनवण्यासाठी वेळ: 5 मिनिट
तयारी करण्यासाठी वेळ: 5 मिनिट
वाढणी: 1 कप बनते
साहित्य:
1 मध्यम आकाराची कैरी
2 टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
10-12 मेथी दाणे
2 टे स्पून मोहरी डाळ
1 टी स्पून साखर
मीठ चवीने
2 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
¼ टी स्पून हळद
¼ टी स्पून हिंग
कृती: कैरी धुवून, पुसून त्याच्या छोट्या फोडी करून घ्या. मेथी दाणे अगदी थोडेसे तेल घालून अगदी मंद विस्तवावर परतून घ्या. एका बाउल मध्ये कैरीच्या फोडी, लाल मिरची पावडर, हळद, मीठ व साखर मिक्स करून अर्धा तास झाकून बाजूला ठेवा.
एका छोट्या कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, हळद घालून घ्या. मोहरी तडतडली की विस्तव बंद करून फोडणी थंड करायला ठेवा. फोडणी थंड झालीकी बाउलमधील कैरीच्या फोडणीवर घालून मिक्स करून घ्या. लोणचे बाटलीत भरून ठेवा. मग पाहिजे तेव्हा सर्व्ह करा.
टीप: हे तात्पुरते लोणचे आहे 2-3 दिवसाच्या वर टिकत नाही नाहीतर जास्त लोणचे झालेतर फ्रीजमध्ये ठेवावे मग पाहिजे तेव्हा काढून घ्यावे.