पुण्याची जगप्रसिद्ध स्ट्रॉबेरी मस्तानी समर स्पेशल रेसीपी
आता उन्हाळा हा सीझन चालू आहे. मग आपण वेगवेगळी सरबत, आइस क्रीम, मिल्कशेक बनवतो. पण आपण मस्तानी बनवली तर घरातील सगळे खुश होईल.
पुणे तेथे काय उणे असे म्हणतात. आपण पुण्याची जगप्रसिद्ध मस्तानी पिली आहे का? जरूर सेवन करा. स्ट्रॉबेरी मस्तानी तर अगदी अप्रतिम लागते. एक ग्लास थंडगार स्ट्रॉबेरी मस्तानी सेवन केली की आपण कधीच विसरणार नाही इतकी सुंदर लागते.
The Pune Famous Strawberry Mastani For Summer Special Recipe Video In Marathi be seen on our You tube Chanel Pune Famous Strawberry Mastani For Kids
स्ट्रॉबेरी मस्तानी बनवायला अगदी सोपी आहे. आपण स्ट्रॉबेरी क्रश वापरू शकता कारण की आपल्याला फ्रेश स्ट्रॉबेरी नेहमी मिळतीलच असे नाही. स्ट्रॉबेरी क्रशने सुद्धा मस्तानी छान बनते. बनवून बघा नक्की सर्वाना आवडेल.
बनवण्यासाठी वेळ: 5 मिनिट
वाढणी: 3 जणसाठी
साहीत्य:
½ लीटर फूल क्रीम युक्त दूध
3 टे स्पून साखर
2 टे स्पून स्ट्रॉबेरी क्रश
3 स्कूप स्ट्रॉबेरी आइस क्रीम
सजावटीसाठी:
बदाम-पिस्ते तुकडे
फ्रेश स्ट्रॉबेरी तुकडे
आइस क्युब
कृती:
प्रथम स्ट्रॉबेरी आइस क्रीम बनवून घ्या. स्ट्रॉबेरी आइस क्रीम कसे बनवायचे ते येथे क्लिक करून पाहू शकता.
दूध गरम करून त्यामध्ये साखर घालून 2 मिनिट मंद विस्तवावर परत गरम करून घ्या. मग थंड करायला ठेवा. मग फ्रीजमद्धे थंड करून घ्या.
दूध थंड झाल्यावर मिक्सरच्या (जूसरच्या) भांड्यात दूध व स्ट्रॉबेरी क्रश घालून 1 मिनिट ब्लेंड करून घ्या. मग 3 डेकोरेटीव्ह काचेचे ग्लास घेऊन त्यामध्ये मिश्रण ओतून घ्या. वरतून थोडासा बर्फ घाला व स्ट्रॉबेरी आइस क्रीमचा एक स्कूप घाला वरतून ड्रायफ्रूट व स्ट्रॉबेरीच्या तुकडयानी सजवून घ्या.
आता थंडगार स्ट्रॉबेरी मस्तानी सर्व्ह करा.