2 मिनिटांत बनवा कच्च्या कैरीचे सरबत व उन्हाळ्यात लगेच ताजे तवाने व्हा ते कसे ते ह्या विडियो मध्ये नक्की पहा
एप्रिल-मे महिना म्हंटले की कडक उन्हाळा मग आपल्याला अगदी हैराण झाल्या सारखे होते. मग हा असहाय उन्हाळा व गरमी मुळे अंगाची लाही लाही होते. आपण बाहेरून घरी आलो की अजून त्रास होतो. मग अश्या वेळी असे थंडगार सरबत बनऊन ठेवले व सेवन केली की आपल्याला त्यापासून छान आराम मिळतो व शरीराची उष्णता सुद्धा कमी होते.
The Refreshing Raw Mango Sharbat | Aam Ka Sarbat Video In Marathi be seen on our You tube Chanel Refreshing Raw Mango Sharbat | Aam Ka Sarbat for Summer Season
कैरीचे पन्हे आपण बनवतो त्यासाठी आपण कैरी उकडून घेतो. पण अश्या प्रकारचे कैरीचे सरबत बनवताना कैरी उकडून घ्यायची गरज नाही. आपण अगदी 2 मिनिटांत हे सरबत बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 2 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
1 मोठ्या आकारची कैरी किंवा
1 कप चिरलेली कैरी
½ कपला थोडी कमी साखर
½ टी स्पून वेलची पावडर
½ टी स्पून मीठ
10-15 आईस क्युब व थंड पाणी
कृती: प्रथम कैरी स्वच्छ धुवून पुसून घ्या. मग त्याची साले काढून घ्या. आता कैरी बारीक चिरून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात चिरलेली कैरी व निम्मी साखर घेऊन ग्राइंड करून घ्या. मग बाकीची राहिलेली साखर, वेलची पावडर, मीठ व ½ मोठा ग्लास थंड पाणी घालून परत एकदा ग्राइंड करून घ्या,
आता तयार झालेले मिश्रण एका स्टीलच्या भांड्यात काढून घेऊन त्यामध्ये मोठे 2 ग्लास थंड पाणी व बर्फ घालून थंडगार सरबत सर्व्ह करा.