आंब्याचा कलाकंद | मॅंगो कलाकंद
आंबा हा फळांचा राजा आहे. आंब्याचा सुगंध व त्याचा रंग आपल्याला मोहून टाकतो. आता आंब्याचा सीझन चालू झाला आहे. आंब्याच्या रसा पासून आपण नानाविध पदार्थ बनवू शकतो.
आंब्याचा कलाकंद ही एक छान स्वीट डिश आहे. त्याचा रंग व चवपण खूप छान लागते. आंब्याचा कलाकंद बनवताना दूध, आंब्याचा रस, साखर व मिल्क पावडर वापरली आहे. आपण आंब्याचा रस फ्रीजमद्धे स्टोर करून पाहिजे तेव्हा ही मिठाई बनवू शकतो.
The Maharashtrian Sweet Delicious Ambyacha Kalakand | Mango Kalakand Video In Marathi be seen on our You tube Chanel Ambyacha Kalakand | Mango Kalakand
आंब्याचा कलाकंद आपण डेझर्ट म्हणून किंवा स्वीट डिश म्हणून सुद्धा बनवू शकतो. बनवायला सुद्धा सोपी आहे.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणांसाठी
साहीत्य:
½ लीटर दूध (क्रीमयुक्त)
1 कप हापूस आंब्याचा रस
½ कप साखर
½ कप मिल्क पावडर
1 टी स्पून वेलची पावडर
सजावटी करिता :
काजू-बदाम-पिस्ते तुकडे करून
कृती: प्रथम आंबा स्वच्छ धुवून त्याचा रस काढून घ्या. जूसरच्या भांड्यात आंब्याचा रस ब्लेंड करून घेऊन बाजूला ठेवा.
नॉनस्टिक पॅनमध्ये दूध गरम करायला ठेवा. दूध चांगले 10 मिनिट मंद विस्तवावर गरम करून घ्या, मग त्यामध्ये आंब्याचा रस घालून मिक्स करून मिश्रण घट्ट होई पर्यन्त आटवून घ्या. मिश्रण आटले की त्यामध्ये साखर घालून अजून थोडे घट्ट होऊ ध्या.
मिश्रण घट्ट झालेकी त्यामध्ये मिल्क पावडर व वेलची पावडर घालून मिक्स करून घ्या. मिश्रण अजून थोडे घट्ट झालेकी विस्तव बंद करून पॅन खाली उतरवून घ्या.
एका स्टीलच्या ट्रेवर त्याच्या मापाचा बटर पेपर घेऊन त्याला तूप लाऊन त्यावर ड्रायफ्रूट चे तुकडे पसरवून त्यावर बनवलेले मिश्रम घालून एक सारखे थापून घ्या. आता ट्रे पूर्ण थंड होई पर्यन्त बाजूला ठेवा. थंड झाल्यावर त्याचे पिसेस कापून घ्या.