टोमॅटो शरबत | टोमॅटो ड्रिंक | टोमॅटो ज्यूस मुलांसाठी उन्हाळा स्पेशल
टोमॅटो हे फळ असे आहे की आपल्याला वर्षभर बाजारात मिळते. आपण बाजारात गेलो की लालचूटूक टोमॅटो पाहिलेकी आपल्याला ते घेण्याचा मोह होतो. आता उन्हाळा सीझन चालून आहे. तर टोमॅटोचे सरबत आपल्या शरीराला उपयोगी आहे. टोमॅटो सरबत बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे.
The Refreshing Tomato Sharbat | Tomato Drink For Summer Season Video In Marathi be seen on our You tube Chanel Tomato Sharbat | Tomato Drink | Tomato Juice For Summer Season
टोमॅटो हे फळ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितावाह आहे. टोमॅटो चवीला छान लागतात तसेच त्यामध्ये भरपूर गुण आहेत. टोमॅटोच्या सेवनाने आपली हाडे बळकट होतात. कॅन्सर पासून बचाव होतो. वजन कमी करायचे असेलतर नियमित टोमॅटो सेवन करा. टोमॅटो ज्यूस किंवा त्याचे सरबत सेवनाने शरीराला ऊर्जा मिळते. हाय बीपीचा त्रास होत असेलतर कमी होतो. हृदय रोगावर टोमॅटो गुणकारी आहे. टोमॅटोमध्ये विटामीन ए व सी आहे जे डोळ्याचे आरोग्य चांगले ठेवते. त्यामुळे मोती बिंदु वाढत नाही. तसेच त्याच्या मध्ये अँटी ऑक्सीडंट्ससारखी पोषक तत्त्व आहेत, शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढते, धूम्रपान मुळे शरीराचे नुकसान भरून निघते.
आपण थंडीच्या दिवसांत टोमॅटो सूप सेवन करतो. तसेच उन्हाळा ह्या सीझनमध्ये टोमॅटो सरबत नियमित सेवन करावे. लहान मुले व मोठी माणसे ह्यांना नक्की आवडेल बनवून बघा.
बनवण्यासाठी वेळ: 5 मिनिट
वाढणी: 1 ग्लास बनते
साहित्य:
2 मोठे टोमॅटो
2 टी स्पून साखर
¼ टी स्पून काळेमीठ
¼ टी स्पून मिरे पावडर
2-3 पुदिना पाने
मीठ चवीने
बर्फाचे तुकडे
½ कप थंड पाणी
कृती: प्रथम टोमॅटो स्वच्छ धुवून, पुसून व चिरून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात चिरलेले टोमॅटो, पुदिना पाने, साखर, काळे मीठ, मिरे पाउडर, मीठ व ½ कप पाणी घालून ब्लेंड करून घ्या.
एक छोट्या आकाराचे स्टीलचे भांडे घेऊन त्यावर चाळणी ठेवा व मिक्सर मधील मिश्रण गाळून घ्या.
गाळलेले मिश्रण फ्रीजमद्धे थंड करायला ठेवा.
आता टोमॅटो सरबत छान थंड झाले की काचेच्या ग्लासमध्ये ओतून त्यावर आइस क्युब घालून थंडगार सरबत सर्व्ह करा.