अक्षय तृतीया 2022 जरूर करा हे उपाय आपले भाग्य चमकेल व राशीनुसार खरेदी
धन-धान्य व करियरमध्ये सफलता मिळण्यासाठी अक्षय तृतीया ह्या दिवशी काही उपाय केले पाहिजे.
अक्षय तृतीया ही 3 मे 2022 मंगळवार ह्या दिवशी साजरी करायची आहे. अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त आहे. संपूर्ण दिवस शुभ मानला जातो.
The Akshaya Tritiya 2022 Upay Video In Marathi be seen on our You tube Chanel Akshaya Tritiya 2022
अक्षय तृतीया ह्या दिवशी शुभ कार्य, दान-धर्म व आपल्या पितरांना तर्पण व पिंडदान करण्याचे महत्व आहे. ह्या दिवशी आपल्या पितरांसाठी मातीचे माठ पाणी भरून दान करण्याचे पुण्य आहे. कारणकी ह्या काळात खूप गरमी असते त्यामुळे पाणी भरून माठ किंवा रांजण दान केलेतर आपल्या पितरांना शीतलता मिळते व आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात.
अक्षय तृतीया ह्या दिवशी खाली दिलेले उपाय करून पहा:
जर आपल्याला आपल्या करियरमध्ये सफलता पाहिजे असेलतर अक्षय तृतीया ह्या दिवशी विष्णु भगवान ना चंदनचा तुकडा अर्पित करून त्यांचा आशीर्वाद घ्या. असे केल्याने आपल्या करियरमध्ये आपल्याला सफलता मिळेल.
जर आपल्या वैवाहिक जीवन चांगले रहावे असे वाटत असेलतर स्वच्छ पाण्यात थोडेसे गंगाजल व चंदन विष्णु भगवान ह्यांना अर्पित करावे. त्यामुळे आपले वैवाहिक जीवन सुखी होईल.
जर आपणास आपल्या शैक्षणिक क्षेत्रमध्ये प्रगती पाहिजे असेलतर ह्या दिवशी विष्णु भगवान हयना चंदनाचा तिलक लावावा. मग आपल्या कपाळावर सुद्धा चंदनाचा तिलक लावावा. पण विष्णु भगवान ह्यांना चंदनाचा तिलक लावताना आपल्या उजव्या हाताच्या तिसऱ्या बोटानि तिलक लावावा. व आपल्याला स्वतःला तिलक लावताना उजव्या हाताच्या दुसऱ्या बोटानि तिलक लावावा. असे केल्याने आपल्या शिक्षणात प्रगती होते.
जर आपल्या घरात सुख-समृद्धी पाहिजे असेलतर अक्षय तृतीया ह्या दिवशी विष्णु भगवान ह्यांच्या मंदिरात जाऊन चंदनाची अगरबत्ती किंवा धूप पॅकेट दान करावे व त्यामधील एक धूप लाऊन प्रार्थना करावी की आपल्या घरी सुख समृद्धी नांदावी.
आपण आपल्या आयपती नुसार सोने-चांदी किंवा डाग-दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते. अक्षय तृतीया ह्या दिवशी आपण आपल्या राशी नुसार धातू खरेदी केले तर आपली किस्मत चमकू शकते असे म्हणतात. चला तर मग आपण पाहूया कोणत्या राशीनि कोणता धातू खरेदी करायचा.
मेष: मेष राशि च्या लोकांनी ह्या दिवशी सोने सुद्धा खरेदी करू शकता. कारण ह्या राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. मंगळ ग्रहाचा शुभ धातू तांबा आहे.
वृषभ: ह्या राशीचा स्वामी शुक्र आहे त्यामुळे ह्यादिवशी चांदी खरेदी केली पाहिजे शुक्र ह्या साठी खर म्हणजे हिरा हे प्रमुख रत्न आहे.
मिथुन: ह्या राशीचा स्वामी बुध आहे. म्हणून अक्षय तृतीया ह्या दिवशी तांब्याची भांडी खरेदी करावी.
कर्क: ह्या राशीचा स्वामी चंद्र आहे म्हणून ह्या दिवशी चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते.
सिंह: ह्या राशीचा स्वामी सूर्य आहे त्यामुळे ह्या दिवशी सोने किंवा तांबा खरेदी करणे लाभदायक आहे.
कन्या: ह्या राशीचा स्वामी बुध आहे म्हणून ह्या दिवशी तांबा खरेदी करणे लाभदायक आहे.
तूळ: ह्या राशीचा स्वामी शुक्र आहे त्यामुळे ह्या दिवशी चांदी खरेदी करावी.
वृश्चिक: ह्या राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे ह्या दिवशी तांबा हा धातू खरेदी करावा.
धनु: ह्या राशीचा स्वामी बुध आहे त्यामुळे सोने किंवा पितळ खरेदी करावे.
मकर: ह्या राशीचा स्वामी शनि आहे त्यामुळे स्टील किंवा लोखंडी भांडी खरेदी करावी.
कुंभ: ह्या राशीचा स्वामी ग्रह शनि देव आहे तर लोखंडी भांडी खरेदी करावी.
मीन: ह्या राशीचा स्वामी गुरु आहे त्यांनी पितळ खरेदी करावे किंवा सोने सुद्धा खरेदी करू शकता.
Disclaimer:
ही माहिती किंवा उपाय फक्त आपल्या माहितीसाठी दिली आहे. त्याची कोणतीसुद्धा जबाबदारी आम्ही घेत नाही.