सहज सोपा स्पॉन्ज केक बिना अंडे, बटर व ओव्हन मुलांसाठी
आता मुलांना शाळेला सुट्या लागल्या आहेत मग रोज काहीना काही दुधा बरोबर खायला पाहिजे टे पण मुलांच्या आवडीचे. केक हा पदार्थ मुलांच्या अगदी आवडीचा. आपण ह्या अगोदर आपण बऱ्याच प्रकारचे निरनिराळे केक कसे बनवायचे ते पाहिले.
आज आपण बिना अंड्याचा सहज सोपा केक कसा बनवायचा ते पाहू या. अश्या प्रकारचा स्पॉन्ज केक बनवायला अगदी सोपा आहे. ते पण आपल्या घरात जे सामान आहे त्यापासून झटपट बनवता येतो.
स्पॉन्ज केक बनवण्यासाठी फक्त मैदा, दही, साखर, तेल, बेकिंग पाउडर व बेकिंग सोडा वापरला आहे. त्यासाठी आपल्याला अंडे किंवा बतरची गरज नाही.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 4 जनसाठी
साहित्य:
1 ½ पक मैदा
¾ कप साखर
1 कप दही
1 टी स्पून बेकिंग पाउडर
½ टी स्पून बेकिंग सोडा
½ कप तेल
1 टी स्पून व्हनीला एसेन्स
कृती: प्रथम दही आदल्या दिवशी लाऊन ठेवा. मैदा सपेटीच्या चाळणिनी चाळून घ्या.
ओव्हन 180 डिग्रीवर प्रीहीट करायला ठेवा. जर ओव्हन नसेलतर कुकर गरम करायला ठेवा. कुकरच्या झाकणाची रिंग व शिट्टी काढून बाजूला ठेवा. कुकरमध्ये एक कप मीठ घालून एक स्टँड ठेवा. केकच्या भांड्याला तेल लाऊन त्याच्या आकाराचा बटर पेपर घाला. जर बटर पेपर नसेलतर तेल लावल्यावर मैदा भुरभुरा व भांडे बाजूला ठेवा.
एका बाउलमध्ये दही व साखर चांगले फेटून घ्या. साखर पूर्ण विरघळली पाहिजे. मग त्यामध्ये बेकिंग पाउडर व बेकिंग सोडा, घालून मिक्स करून 5 मिनिट बाजूला ठेवा. मिश्रणाला बुडबुडे आले की त्यामध्ये व्हनीला एसेन्स घालून मैदा हळू हळू घालून मिक्स करून घ्या. मिश्रण चांगले मिक्स झालेकी केकच्या भांड्यात ओता. मिश्रण ओतून झाल्यावर एकदा भांडे हळूच आपटा म्हणजे जर मिश्रणात हवा असेलतर निघून जाईल.
आता केकचे भांडे कुकरमध्ये ठेवा. कुकरचे झाकण लाऊन मंद विस्तवावर 45 मिनिट केक बेक करून घ्या. 45 मिनिट झाले की विस्तव बंद करून कुकर तसाच 10-15 ठेवावा. झाकण उघडू नये. 15 मिनिट झाल्यावर झाकण काढून केक थंड झाल्यावर केक उलटा करून बटर पेपर काढून कापून मग सर्व्ह करावा.
जर ओव्हनमध्ये केक ठेवायचा असेलतर ओव्हन गरम करून मग त्यामध्ये कोनव्हेकशन मोडवर 40 मिनिट सेट करून बेक करून घ्या. मग 40 मिनिट झाल्यावर केक तसाच ओव्हनमध्ये 15 मिनिट ठेवावा. मग बाहेर काढून थंड झाल्यावर सर्व्ह करावा.