उसाचा रस गन्ने का जूस शुगरकेन ज्यूस जबरदस्त फायदे उसाचा रस बनवण्याची सोपी पद्धत
उसाचा रस सेवन केला तर त्याचे आपल्या आरोग्यासाठी जबरदस्त फायदे मिळतील.
उसाचा रस जरी गोड असला तरी उसामध्ये फैट जरासुद्धा नाही. आपल्या शरीराचे वजन कमी करू शकते. उसाचा रस आपली किडनी, हार्ट व पोटासाठी लाभदायक आहे.
आता उन्हाळा सीझन चालू आहे त्यामुळे ऊसाची गुरहाळ जोरात चालू झाली आहेत. कारण ऊसाच्या रसा मुळे आपल्या शरीराचा गरमी पासून बचाव होतो. उसाचा रस आपल्या आरोग्यासाठी फायदेमंद आहे त्याच्यामुळे बऱ्याच रोगान बरोबर लढण्याची शक्ति मिळते.
The Health Benefits Of Sugar Cane Juice And Home made Sugar Cane Juice Video In Marathi be seen on our You tube Chanel Health Advantages Of Sugar Cane Juice And Home made Sugar Cane Juice
ऊसाच्या रसाचे आरोग्यदाई फायदे | Ganne Ke Juice Ke Fayde
१. डायबिटीजसाठी फायदेमंद
उसाचा रस आपल्या शरीरातील ग्लुकोजची मात्रा संतुलित करते. म्हणून डायबीटीज असणाऱ्या लोकांना उसाचा रस सुरक्षित आहे. ऊसाच्या रसामध्ये फायबर भरपूर प्रमाणात आहे. म्हणून डायबीटीज असणाऱ्या लोकाना फायदेशीर आहे.
२. इम्यूनिटी स्ट्रांग होते:
उसामध्ये कैल्शियम, मैग्नीशियम, आयरन, फास्फोरस व पोटेशियम सारखी पोषक तत्व आहेत. त्याच्या सेवनाने आपल्या शरीराची इम्यूनिटी मजबूत होते.
३. कैंसर पासून बचाव होतो:
उसामध्ये अल्कलाइन ची मात्रा जास्त प्रमाणात आहे. त्याच्या मुळे कॅन्सर सारख्या आजारा पासून बचाव होतो. उसाचा रस सेवन केल्याने स्तन, पोट, व लंग्स ह्याच कॅन्सर होण्या पासून बचाव होतो.
४. वेट लॉस म्हणजेच शररीराचे वजन कमी करण्यास मदत होते:
उसामध्ये फायबरची मात्रा भरपूर आहे. त्यामुळे उसाचा रस सेवन केल्याने वजन वाढणे कंट्रोल मध्ये राहते. त्याच बरोबर शरीरातील बैड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
५. शरीराला थंडक मिळते:
उन्हाळ्याच्या सीझनमध्ये उसाचा रस सेवन केल्याने शरीराला थंडक मिळते. जर ऑफिसमध्ये जास्ती काम करून आपण थकले असालतर उसाचा रस सेवन केल्याने ताजे तवाने वाटते.
६. हीमोग्लोबिन वाढण्यास मदत होते:
उसामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न आहे. त्यामुळे उसाचा रस सेवन केल्याने शरीरात हीमोग्लोबिन ची कमी दूर होते.
७. हड्डिया म्हणजेच हाडे स्ट्रांग होतात:
ऊसाच्या रसामध्ये कैल्शियम, मैग्नीशियम, आयरन, फास्फोरस व पोटेशियम भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे आपली हाडे मजबूत बनतात.
८. चेहऱ्यावर निखार म्हणजेच चकाकी येते:
उन्हाळ्यामध्ये कडक ऊन व घामामुळे चेहरा डल होतो व कोमेजल्या सारखा दिसतो. उन्हाळ्यात उसाचा रस नियमित सेवन केल्यास चेहऱ्यावर फ्रेशनेस येतो.
९. यूरिनमध्ये जलन होण्यापासून आराम मिळतो:
उसचा रस सेवन केल्यास युरीनमध्ये होणारी जळजळ कमी होते. उसाचा रस युरीन क्लियर करतो.
१०. पिंपल्सच्या समस्यासाठी फायदेमंद:
उसामध्ये सुक्रोज ची चांगली मात्रा आहे. जे शरीरावरील घाव बरे करण्यास मदत करते. त्याच बरोबर चेहऱ्यावरील येणारे पिंपल्स ठीक करते. त्याच बरोबर चेहऱ्या वरील डाग डाग धब्बे नष्ट करते. ऊसाच्या रसाच्या सेवनाने शररातील रक्त शुद्ध होते. त्यामुळे स्कीनच्या समस्या पासून आराम मिळतो.
घरच्या घरी फेसपॅक कसा बनवायचा:
साहित्य:
उसाचा रस (आवश्यकतानुसार)
मुलतानी माती (आवश्यकतानुसार)
कृती: मुलतानी मातीमध्ये उसाचा रस मिक्स करून चेहऱ्यावर हा पॅक लावावा मग २० मिनिट तसाच ठेवून थंड पाण्यांनी चेहरा धुवावा. आठोडयातून १-२ वेळा असे करावे.
घरच्या घरी उसाचा ताजा रस कसा बनवायचा सोपी पद्धत:
साहित्य:
१ मोठ्या आकाराचा उस (कट करून)
१ टी स्पून आल (किसून)
काळे मीठ व लिंबुरस चवीने
कृती:
उस स्वच्छ धुवून त्याची साल काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. आता ब्लेंडरमध्ये उसाचे छोटे छोटे तुकडे व आल घालून चांगले ब्लेंड करून गाळून ग्लासमध्ये उसचा रस ओतून थंड करून वरतून काळे मीठ व लिंबुरस घालून सर्व्ह करा.
आम्ही ही माहिती फक्त आपणास माहिती होण्यासाठी देत आहोत. त्याची कोणतीसुद्धा हमी आम्ही देत नाही. आपण वैद्यकीय सल्ला घेऊन मगच ती आचरणात आणावी.