आरोग्यदायी स्वादिष्ट ऊसाचा रस बिना ऊस कसा बनवायचा
आता उन्हाळा सीझन चालू आहे आपल्याला घरात व घराबाहेर पडले की खूप गरमीचा त्रास होतो. मग आपण घराबाहेर पडलो की आपल्याला ठिकठिकाणी ऊसाची गुरहाळ दिसतात. ऊसाचा रस आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.
The Healthy Sugarcane Juice Without Sugarcane Video In Marathi be seen on our You tube Chanel Healthy Sugarcane Juice Without Sugarcane
ऊसाचा रस तेपण उस नवापरता आपण आईकले आहे का? गूळ हा ऊसाच्या पासून तयार होतो. गूळ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.
गूळ सेवनांचे फायदे अनेक आहेत.
गुळामध्ये लोह सारखी पोषक तत्व आहेत. आपण रोज गुळाचे सेवन केले तर शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते. तसेच सांधेदुखी पासून आराम मिळतो. तसेच शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे अनेक आजारा पासून आपली सुटका होते. जर रिकाम्या पोटी गूळ सेवन केला तर पचना संबंधित आजाराय पासून सुटका होते. गुळामध्ये पोट्याशियम आहे त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
आपल्या कडे प्रथा आहे की उन्हातून माणूस आला की त्याना गूळ व पाणी सेवन करण्यास दिले जाते. त्यामुळे शरीरातील गरमी कमी होते. आपल्याला डॉक्टरसुद्धा सांगतात की साखरेच्या आयवजी गुळाचे सेवन करा.
बनवण्यासाठी वेळ: 5 मिनिट
वाढणी: 2-3 ग्लास होतात
साहित्य:
1 कप गूळ (किसून किंवा चिरून)
1 टे स्पून लिंबुरस
½ टी स्पून वेलची पाउडर
¼ टी स्पून काळे मीठ
10-12 पुदिना पाने
2 ग्लास पाणी (थंड)
बर्फाचे तुकडे
कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 कप पाणी व गूळ 5 मिनिट भिजत ठेवा. पुदिना पाने स्वच्छ धुवून घ्या.
मिक्सरच्या ज्यूसर भांड्यात गुळाचे पाणी, लिंबुरस, वेलची पाउडर, काळे मीठ, पुदिना पाने, काळे मीठ व 1 ग्लास पाणी घालून ब्लेंड करून घ्या. मग अजून 1 ग्लास पाणी घालून ब्लेंड करून घ्या.
आता एका काचेच्या बाउलमध्ये मिश्रण काढून घेऊन त्यामध्ये बर्फाचे तुकडे घालून मिक्स करून काचेच्या ग्लास मध्ये ओतून सर्व्ह करा.
उन्हाळ्याच्या दिवसांत आपण घरच्या घरी अश्या प्रकारचा ऊसाचा रस बनवून आपले शरीर मस्त थंड करू शकता.