घरी बनवा दोन मिनिटांत फालुदा सेव खूप सोपी पद्धत
फलूदा ही एक छान डेझर्ट रेसीपी आहे त्यासाठी अश्या प्रकारची सेव वापरली जाते. आपण घरच्या घरी फालूदा सेव अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. अगदी परफेक्ट बाजारातील फलूदा प्रमाणे सेव बनते.
The How To Make Falooda Sev In 2 Minutes At Home Simple Method Video In Marathi be seen on our You tube Chanel Home made Falooda Sev
फलूदा सेव बनवण्यासाठी आपण कॉर्नफ्लोर किंवा आरारुत वापरू शकता. तसेच आयन पाहिजे त्या रंगामध्ये बनवू शकतो. खूप मस्त व बारीक बनते करून पहा. जर आपल्याला थोडेशी गोड सेव बनवायची असेलतर मिश्रण बनवताना साखर वापरू शकता. पण साखर फक्त 1 चमचा घाला खूप गोड सुद्धा छान लागत नाही.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 4 ग्लास फलूदा ड्रिंक बनवण्यासाठी
साहित्य:
½ कप कॉर्नफ्लोर
1 कप पाणी (पाणी दुपट्ट घ्यायचे)
1 टी स्पून साखर (हवी असेलतर)
खायचा रंग (हिरवा, पिवळा, लाल, केशरी)
2 ग्लास थंड बर्फाचे पाणी
कृती: आपल्याला सेव बनवण्यासाठो आपण चकली किंवा सेव बनवण्यासाठी जे यंत्र वापरतो त्याला आतून तेल लाऊन घ्या. व सेव बनवण्यासाठी बारीक भोकाची चकती घ्या.
एका बाउलमध्ये कॉर्नफ्लोर घ्या. मग त्यामध्ये डबल पाणी घाला (म्हणजे समजा 1 कप कॉर्नफ्लोर घेतले तर 2 कप पाणी घ्या) चांगले मिक्स करून घ्या. त्यामध्ये गुठळी राहता कामा नये.
एक पॅन गरम करायला ठेवा व त्यामध्ये बनवलेले मिश्रण घालून मंद विस्तवावर सतत हलवत रहा. मिश्रण हळू हळू घट्ट होत जाईल. मिश्रण घट्ट झाले व पारदर्शक दिसायला लागले की विस्तव बंद करा. त्यामधीत निम्मे मिश्रण सेव बनवण्याच्या यंत्रामध्ये घालून सेव बनवण्याची चकती लावा.
एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये थंड बर्फाचे पाणी घ्या व त्यामध्ये सेव घाला. सेव आपल्याला थंड पाण्यातच ठेवायची आहे.
आता राहिल्याला कॉर्नफ्लोरच्या भागात आपल्याला जो पाहिजे तो रंग घालून मिक्स करून सेव बनवण्याच्या यंत्रामध्ये मिश्रण घालून दुसऱ्या बाउल मध्ये बर्फाचे पाणी घेऊन त्यामध्ये सेव घाला.
आता हे दोन्ही बाउल फ्रीजरमध्ये ½ तास ठेवा. म्हणजे सेव छान सेट होईल. मग बाउल काढून फ्रीजमध्ये ठेवा. मह पाहिजे तेव्हा सेव फलूदा बनवण्यासाठी वापरा.
फलूदा सेव फ्रीजमध्ये 2 दिवस राहू शकते पणती बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्येच ठेवायची आहे.