महाराष्ट्रियन आंबा नारळ वडी आंबा नारळ बर्फी मॅंगो कोकनट बर्फी
आता आंब्याचा सीझन चालू आहे. ह्या अगोदर आपण आंब्याचा रस म्हणजेच पल्प वापरुन नानाविध पदार्थ बनवले. आता आपण आंबा नारळ बर्फी म्हणजेच वडी कशी बनवायची टे पाहणार आहोत.
आंबा हा फळांचा राजा त्याचे कोणते सुद्धा बनवले पदार्थ अप्रतिम लागतात. आंबा नारळ बर्फी बनवायला अगदी सोपी आहे. आपण अश्या प्रकारची आंबा बर्फी सणाच्या दिवशी किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो. पण आपल्याला त्यासाठी आंब्याचा पल्प पाहिजे तर आंब्याचा पल्प घरच्या घरी कसा साठवून ठेवायचा ते आपण दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
The Maharashtrian Mango Coconut Barfi Amba Naaral Barfi Video In Marathi be seen on our You tube Chanel Maharashtrian Mango Coconut Barfi Amba Naaral Barfi
आंबा बर्फी बनवण्यासाठी आंब्याचा पल्प, ओला खोवलेला नारळ, साखर व दूध वापरले आहे. आंबा बर्फीचा रंग व सुगंध त्याच बरोबर त्याची टेस्ट खूप मस्त लागते. आपल्याला पहिजे असेलतर आपण त्याच्या मध्ये खवा किंवा मिल्क पाउडर सुद्धा वापरू शकता.
बनवण्यासाठी वेळ: 25-30 मिनिट
वाढणी: 25-30 वड्या बनतात
साहित्य:
1 कप आंब्याचा पल्प (2 मोठ्या आकाराचे हापूस आंबे)
1 कप दूध
1 साखर
3 कप ओला नारळ खोवलेला
1 टी स्पून विलची पाउडर
ड्राय फ्रूट सजावटी करिता
1 टे स्पून पिठीसाखर
कृती: प्रथम आंब्याचा रस काढून मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्या. ओला नारळ खोवून घ्या. ड्रायफ्रूट तुकडे करून घ्या. एका ट्रेला तूप लाऊन ठेवा.
एका पॅनमध्ये दूध, साखर, मॅंगो पल्प व ओला नारळ मिक्स करून मंद विस्तवावर मिश्रण घट्ट होई पर्यन्त आटवायला ठेवा. मधून मधून ढवळत रहा.
मिश्रण घट्ट झाले की ते एका गोळ्या सारखे होऊ लागेल मग त्यामध्ये वेलची पाउडर घालून मिक्स करून परत 2 मिनिट मंद विस्तवावर ठेवा. आता विस्तव बंद करून त्याच्या मध्ये पिठीसाखर घालून मिक्स करून दोन मिनिट ढवळत रहा. मिश्रण एक सारखे झालेकी तूप लावलेल्या ट्रेमध्ये काढून एक सारखे करून वरतून ड्रायफ्रूटचे तुकडे घालून हळुवार पणे दाबून घ्या. आता ट्रे बाजूला थंड करायला ठेवा.
आंब्याचे मिश्रण थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून डब्यात भरून ठेवा. मग पाहिजे तेव्हा सर्व्ह करा.