मस्कमिलन खरबूजचे औषधी गुणधर्म तसेच ज्यूस कसे बनवायचे सोपी पद्धत
खरबूज हे फळ चवीस्ट व आकर्षक देसते. त्याचा नारंगी रंग व सुगंध आपल्याला मोहित करतो. खरबूज च्या सेवनाचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. उन्हाळ्याच्या Summer सीझनमध्ये आपल्याला हे जास्त प्रमाणात उपलब्ध होते. त्याच्या सेवनाने आपल्या आरोग्याला बरेच फायदे होतात. त्याचे जूस हे रुचकर व आपल्या आरोग्याच्या दृष्टीने थंड व फायदेमंद आहे.
The Muskmelon Kharbuja Health Benefits And Kharbuja Juice Video In Marathi be seen on our You tube Chanel Muskmelon Kharbuja Health Benefits And Kharbuja Juice
खरबूज सेवनाचे फायदे किंवा उपयोग:
१. खरबुजामध्ये Anti Occident एंटी ओक्सीडेंट आहेत ते ह्रदयसाठी गुणकारी आहे. ह्रदय संबधी रोग दूर होतात व आपले ह्रदय स्वस्थ राहून रक्त प्रवाह सुरळीत होतो.
२ खरबुजामध्ये अजून एक मोठ्या प्रमाणात घटक आहे तो म्हणजे पोटैशियम त्यामुळे कर्क रोग म्हणजेच Cancer होत नाही तसेच विटामीन “C” सी व बीटा- कैरटिन आहे त्यामुळे आपल्या शरीरातील प्राणघातक कण शरीरा बाहेर टाकण्यास मदत होते.
३ मेंदूला ऑक्सीजन पुरवण्याचे काम सुरळीत होते. ह्यामध्ये विटामीन “A” ए आहे त्यामुळे आपल्या डोळ्यासाठी उपयुक आहे. तसेच किडनीच्या आरोग्यासाठी म्हणजेच किडनीच्या आजारासाठी उपयोगी आहे.
४ खरबूजामध्ये ओक्सीकीन नावाचे तत्व आहे त्यामुळे फेफडे Lung निरोगी रहातात. जे सिगरेट पितात म्हणजेच धूम्रपान करतात त्यांना खरबुजाचे सेवन करणे खूप गुणकारी आहे.
५ झोपेचा त्रास आहे झोप येत नाही व उत्साही वाटत नाही अशक्तपणा वाटतो त्यांना पण खूप गुणकारी आहे.
६. महिलांसाठी मासिक काळ मध्ये त्रास होतो व थकल्या सारखे वाटते त्यांना खरबुजाच्या सेवनाने फायदा होतो कारण की ह्यामध्ये विटामीन “C” सी आहे.
७. खरबूजमध्ये कैलोरी जास्त प्रमाणात आहे त्यामुळे जर शरीराचे वजन कमी करायचे आहे त्यानी ह्याचे सेवन करावे.गर्भ घारणे साठी उपयोगी आहे कारण ह्यामध्ये फोलिक असिड आहे.
८. खरबूजाचा रस काढून त्यामध्ये मध मिक्स करून आपल्या चेहऱ्याला लावून १५ मिनिट ठेवावा मग आपला चेहरा थंड पाण्यानी धुवावा एकदम ताजेतवाने वाटते व आपली त्वचा छान मुलायम होते.
९. स्ट्रैस तनाव कमी करण्यास फायदेमंद आहे. तनावचे मुख्य कारण म्हणजे वात दोष वाढणे. खरबूजमध्ये वात शामक गुण आहे. म्हणून त्याच्या सेवनाने तनाव कमी होण्यास मदत होते.
१०. त्वचेवर होणारा सोरेसिस हा रोग खूप त्रासदायक आहे. ह्या रोगांमद्धे पूर्ण शरीरावर खाज येते. हा रोह स्त्री किंवा पुरुष दोघांना सुद्धा होऊ शकतो. अश्या वेळेस खरबूजचा रस काढून शरीरावर लावावा.
खरबूजचे ज्यूस कसे बनवावे:
साहित्य:
१ कप खरबूज (तुकडे करून)
२ टी स्पून साखर
१/२ कप पाणी (थंड)
बर्फ तुकडे
कृती: प्रथम खरबूज स्वच्छ धुवून त्याची साले काढून चिरून घ्यावा.
मग मिक्सरच्या भांड्यात खरबूजचे तुकडे, साखर, पाणी व बर्फ घालून ब्लेंड करावे.
मग ज्यूस काचेच्या ग्लासमध्ये ओतून बर्फ घालून सर्व्ह करावा.