नेहमीचा तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला तर कांद्याचा पराठा अनियन पराठा झटपट बनवा
आता मुलांना सुट्या लागल्या आहेत. मग रोज नाश्ता काय करायचं. इडली, डोसा, पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला तर मुलांसाठी नवीन काय बनवायचे..
The Onion Paratha Kanda Paratha Pyaz ka Paratha For Kids Breakfast Video In Marathi be seen on our You tube Chanel Onion Paratha Kanda Paratha Pyaz ka Paratha For Breakfast
पराठे आपण निरनिराळ्या प्रकारचे बनवतो. आपण ह्या अगोदर, बटाटा पराठा, पुदिना पराठा, फ्लॉवर् पराठा कसे बनवायचे टे पहिले. आता आपण कांदा पराठा म्हणजेच अनियन पराठा कसा बनवायचा ते पाहूया. अनियन पराठा बनवायला अगदी सोपा आहे व छान टेस्टी लागतो व निराळ्या प्रकारचा आहे. आपण नाश्ता किंवा जेवणात सुद्धा बनवू शकतो.
अनियन पराठा बनवताना कांदा, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आले बारीक चिरून वापरले आहे. त्याच बरोबर लाल मिरची पावउर, चाट मसाला, ओवा, धने-जिरे पावडर पण वापरली आहे. कांदा पराठा बनवताना त्याच्या सारणात मीठ वापरले तर लगेच पाणी सुटते. म्हणून त्यासाठी त्यामध्ये बेसन भाजून टाकले तर छान बाइडिग होते. अनियन पराठा आपण दही, चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 पराठे
साहित्य:
आवरणासाठी:
2 कप गव्हाचे पीठ
1 टी स्पून मीठ
1 टी स्पून तेल
3 टे स्पून तेल
तूप पराठाला वरतून लावण्यासाठी
सारणासाठी:
2 मध्यम आकाराचे कांदे (बारीक चिरून)
2 टे स्पून पुदिना पाने (बारीक चिरून)
¼ कप कोथिंबीर (बारीक चिरून)
3 हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
1” आले (बारीक चिरून)
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1 टी स्पून चाट मसाला
1 टी स्पून ओवा
2 टे स्पून बेसन
मीठ चवीने
कृती: आवरणासाठी: प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ, 1 टी स्पून तेल, मीठ घालून मिक्स करून पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. पीठ मळून झाल्यावर त्यावर 1 टे तेल घालून परत मळून घ्या व झाकून बाजूला ठेवा.
सारणासाठी: कांदा सोलून बारीक चिरून घ्या. कोथिंबीर, पुदिना व हिरवी मिरची धुवून बारीक चिरून घ्या. आल किसून घ्या. पॅनमध्ये ½ टी स्पून तेल घालून बेसन मंद विस्तवावर 2 मिनिट भाजून घ्या. सारणाचे चार भाग करून घ्या.
एका बाउलमध्ये चिरलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, चाट मसाला, ओवा व मीठ घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये भाजलेले बेसन घालून मिक्स करा.
पराठे बनवण्यासाठी: कणकेचे एक सारखे मोठ्या लिंबा एव्हडे गोळे बनवून घ्या. मग दोन गोळे घेऊन पुरीच्या आकाराचे लाटून घ्या. एका पुरीवर बनवलेलया मिश्रणाचा एक भाग ठेऊन पुरीवर पसरवून त्यावर दुसरी पुरी ठेवा मग पुरीच्या कडा दाबून घ्या. वरतून थोडे पीठ लावून पराठा लाटून घ्या.
तवा गरम करून त्यावर पराठा घालून तेलावर छान भाजून घ्या. अश्या प्रकारे सर्व पराठे भाजून वरतून तूप लावून सर्व्ह करा.