अप्रतिम झटपट मस्क मेलन मिल्कशेक खरबूजचे मिल्कशेक उन्हाळा सीझनसाठी रेसीपी
आता गर्मीचा सीझन चालू आहे. त्यामुळे आपण रोज वेगवेगळे मिल्कशेक, सरबत बनवत असतो. त्यामुळे आपल्या शरीराला थंडक मिळते. आपण मॅंगो मिल्कशेक, बनाना मिल्कशेक, चॉकलेट मिल्कशेक, अगदी आवडीने पितो. पण आपण मस्क मिलन चे मिल्क शेक सेवन केले आहे का? नसेलतर जरूर सेवन करा.
The Perfect in 2 Minutes Muskmelon Milkshake Kharbuja Milkshake Video In Marathi be seen on our You tube Chanel Perfect in 2 Minutes Muskmelon Milkshake Kharbuja Milkshake
मस्क मिलनचे मिल्क शेक बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. त्यासाठी दूध, क्रीम, व्हनीला एसेन्स य आइसक्रीम पाहिजे त्याच बरोबर थंडगार होण्यासाठी बर्फ. मुलेतर तर मग अगदी खुश होतील.
बनवण्यासाठी वेळ: 5 मिनिट
वाढणी: 2 ग्लास
साहित्य:
1 कप मस्क मिलन तुकडे करून
1 कप दूध थंड (गरम करून थंड केलेले)
2 टे स्पून क्रीम
1 टे स्पून साखर (पाहिजे तर)
1/2 टी स्पून व्हनीला एसेन्स
1 स्कूप व्हनीला आइसक्रीम
10-12 बर्फ तुकडे
खरबुजचे पिसेस
कृती: प्रथम खरबूज स्वच्छ धुवून, पुसून त्याची साल काढून त्याचे बारीक तुकडे कापून घ्या. मिक्सरच्या ब्लेंडरमध्ये खरबूजचे तुकडे, साखर घालून ब्लेंड करून घ्या. मग त्यामध्ये दूध, व्हनीला एसेन्स व बर्फ घालून परत ब्लेंड करून घ्या.
मग छान नक्षीचे दोन काचेचे ग्लास घेऊन त्यामध्ये ज्यूस ओतून वरतून एक स्कूप आइसक्रीम घालून परत वरतून खरबूजचे पिसेस घालून थंडगार मस्क मेलन मिल्कशेक सर्व्ह करा.