पायनापल आपसाइड डाउन केक बिना अंड्याचा अननस केक मुलांसाठी
पायनापल ह्या फळाचे सर्व पदार्थ मस्त लागतात. पायनायल ह्या फळाचा सुगंधपण छान येतो व टेस्ट सुद्धा छान लागते.
पायनापल आपसाइड डाउन केक बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. तसेच आकर्षक सुद्धा दिसतो त्याच बरोबर त्याची टेस्ट सुद्धा अप्रतिम लागते. ही केक ची रेसीपी खूप निराळी आहे व त्याची पद्धत सुद्धा निराळी आहे.
पायनापल आपसाइड डाउन केक बनवताना केकची सजावट उलट पद्धतीने करायची आहे. व जेव्हा केक बनून तयार होतो तेव्हा उलट केल्यावर तो खूप आकर्षक दिसतो.
साहित्य:
सजावटीकरिता: (ब्राऊन शुगर बनवण्यासाठी)
5 पायनापल स्लाईस
9 चेरी
¼ कप साखर
केक करिता:
2 कप मैदा
¾ कप साखर
1 कप दूध
½ कप तेल
1 टी स्पून पांढरे व्हेनिगर
1 टी स्पून बेकिंग पावडर
¼ टी स्पून बेकिंग सोडा
1 टी स्पून पायनापल एसेन्स
कृती: प्रथम आननसच्या गोल गोल पातळ चकत्या कापून घ्या. मग आननसचा मधला कडक भाग गोल कापून घ्या. केकच्या भांड्याला आतून तेल लावून घेऊन केकच्या भांड्याच्या आकाराचे बटर पेपर कापून भांड्याच्या आतून ठेऊन त्याला सुद्धा तेल लाऊन घ्या. कुकर गरम करायला ठेवा. कुकरच्या झकणाची शिट्टी व रिंग काढून बाजूला ठेवा. कुकरमद्धे मीठ घाला व चांगला गरम होऊ द्या.
सजावटी करिता बाऊन शुगर कशी बनवायची: एका पॅनमध्ये साखर घेऊन ती विरघळे पर्यन्त गरम करा पण सारखे हलवत रहा.साखर बाऊन रंगाची होई पर्यन्त गरम करा. मग विस्तव बंद करून पॅन खाली उतरवून घ्या. आता केकच्या भांड्यात बनवलेले मिश्रण घालून एक सारखे करून त्याच्यावर आननसच्या गोल चकत्या ठेवा व कापलेल्या भागामध्ये एक एक चेरी ठेवा.
केक बनवण्यासाठी मैदा, बेकिंग पावडर व बेकिंग सोडा चाळून बाजूला ठेवा. एक बाउल घेऊन बाउल मध्ये दूध, साखर, तेल व व्हेनिगर घालून साखर विरघळे पर्यन्त मिक्स करून घ्या, मग त्यामध्ये पायनापल एसेन्स घालून मिक्स करा. साखर विरघळली की त्यांच्या मध्ये हळू हळू मैदा घालून मिक्स करा.
आता केकचे मिश्रण हळू हळू केकच्या भांड्यात ओता मग एकदा ट्याप करा म्हणजे मिश्रण एकसारखे पसरले जाईल. आता केकचे भांडे गरम कुकरमद्धे एक स्टँड ठेऊन त्यावर ठेवा. मग कुकरचे झाकण लावा मंद विस्तवावर केक 40 मिनिट बेक करा.
केक बेक झाल्यावर चेक करा झाला की नाही ते. मग कुकरमद्धेच पाच मिनिट तसेच ठेवा. मग बाहेर काढून हळुवार पणे केक उलटा करून बाहेर काढा. म्हणजे केकची खालची बाजू वर आली पाहिजे म्हणजेच पायनापलचे डेकोरेशन वर दिसेल.
केक थंड झाल्यावर कापून सर्व्ह करा.