शाही फालूदा दोन प्रकार रोज फालूदा मॅंगो फालूदा घरी बनवा सोपी पद्धत रेसिपी
शाही फालूदा ही उन्हाळा ह्या सीझनसाठी मस्त थंडगार रेसिपी आहे. फालूदा ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे दिसायला आकर्षक दिसते व डिलीशीयस लागते. आता गरमीचा सीझन चालू आहे मग आपल्याला रोज काहीना काही सरबत, थंड ड्रिंक्स, मिल्कशेक किंवा फालूदा प्यावेसे वाटते.
The Shani Falooda 2 Types Rose Falooda And Mango Falooda Homemade Video In Marathi be seen on our You tube Chanel Shani Falooda 2 Types Rose Falooda And Mango Falooda Homemade
आज आपण दोन प्रकारचे शाही फालूदा कसे बनवायचे आहे ते पाहणार आहोत.
पहिला प्रकार म्हणजे रोज फालूदा. रोज फालूदा ही रेसिपी चवीला खूप छान लागते. ह्या मध्ये रोज सिरप, फालूदा सेव, सबजा बी, आईसक्रीम व ड्रायफ्रूट वापरले आहे. रोज फालूदा टेस्टला अप्रतिम लागतो. त्याचा रंग व सुगंध आपल्याला मोहून टाकतो. रोज फालूदा ड्रिंक पाहताच आपल्याला प्यावेसे वाटते.
दूसरा प्रकार म्हणजे मॅंगो फालूदा. मॅंगो आंबे आपल्याला वर्षातून एकदाच म्हणजे एप्रिल व मे महिन्यात मिळतात. आंब्याचा रंग व सुगंध आपल्याला मोहून टाकतो. आंबा हा फळांचा राजा आहे.
मॅंगो फालूदा चवीला अप्रतिम लागतो. तसेच दिसायला आकर्षक दिसतो. मॅंगो फालूदा बनवायला अगदी सोपे आहे. त्यासाठी आपल्याला दूध, मॅंगो, फालूदा सेव, सबजा बी व ड्राय फ्रूट पाहिजे.
फालूदा ड्रिंक बनवण्यासाठी आपल्याला फालूदा सेव पाहिजे. फालूदा सेव कशी बनवायची ते आपण फालूदा ह्या अन्डर लाईनवर क्लिक करून पाहू शकता.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
कुलीग टाइम: 1 तास
वाढणी: 2 जणांसाठी
साहित्य रोज फालूदा:
½ लीटर दूध (फूल क्रीम)
1 टे स्पून साखर
4 टे स्पून फालूदा सेव
1 टी स्पून सबजा बी
3 टे स्पून रोज सिरप
2 मोठे स्कूप व्हनीला आइस क्रीम
ड्राय फ्रूट सजावटी करिता
साहित्य: मॅंगो फालूदा:
½ लीटर दूध (फूल क्रीम)
2 टे स्पून साखर
1 कप आंब्याचा रस (हापूस)
1 टी स्पून सबजा बी
4 टे स्पून फालूदा सेव
2 मोठे स्कूप व्हनीला आइस क्रीम
ड्राय फ्रूट सजावटी करिता
कृती: प्रथम दूध गरम करून साखर घालून 5 मिनिट परत मंद विस्तवावर आटवून घ्या. मग फ्रीजमद्धे ठेवून छान थंड करून घ्या. फलूदा सेव बनवून फ्रीजमद्धे ठेवा. (फलूदा सेव कशी बनवायची येथे लिंकवर क्लिक करा) सबजा बी पाण्यात घालून 30 मिनिट बाजूला ठेवा.
रोज फलूदा बनवण्यासाठी: दोन मोठे काचेचे ग्लास घेऊन त्यामध्ये प्रथम 1 टे स्पून रोज सिरप घालून 1 सबजा बी घालून त्यामध्ये 1 टे स्पून फलूदा सेव घालून त्यावर परत 1 टे स्पून सबजा बी घालून त्यामध्ये थंड दूध घालून एकदा चमच्यानी हळुवार मिक्स करून घ्या. त्यावर 1 मोठा स्कूप व्हनीला आइसक्रीम घालून वरतून ड्रायफ्रूट, चेरी व टुटी फ्रूटीने सजवा मग ग्लासच्या कडेनी एक चमचा रोज सिरप मधून मधून बाजूनी सोडा म्हणजे छान दिसेल. मग थंडगार रोज फलूदा सर्व्ह करा.
मॅंगो फलूदा बनवण्यासाठी: प्रथम थंड केलेले दूध व मॅंगो पल्प ज्यूसरमधून काढा. मॅंगो मिल्कशेक थंड करून घ्या. दोन मोठे काचेचे ग्लास घेऊन त्यामध्ये प्रथम 1 सबजा बी घालून त्यामध्ये 1 टे स्पून फलूदा सेव घालून त्यावर परत 1 टे स्पून सबजा बी घालून त्यामध्ये थंड मॅंगो मिल्क शेक घालून त्यावर 1 मोठा स्कूप व्हनीला आइसक्रीम घालून वरतून ड्रायफ्रूट, चेरी व टुटी फ्रूटीने सजवा. मग थंडगार मॅंगो फलूदा सर्व्ह करा.