स्वादिष्ट आंब्याची पुरणपोळी मॅंगो पुरणपोळी नवीन रेसीपी
एप्रिल मे महिना म्हणजे आंब्याचा सीझन. बाजारात आपल्याला ठिकठिकाणी आंबे पहायला मिळतात. मग रोज आमरस चपाती, मॅंगो मिल्कशेक, आइसक्रीम बनवायचे. आंबा हा फळांचा राजा पण वर्षभरात फक्त दोन महीने मिळतो. मग आपण आंब्याच्या रसा पासून नानाविध पदार्थ बनवतो.
The Swadisht Amba Puran Poli Mango Puran Poli Video In Marathi be seen on our You tube Chanel Swadisht Amba Puran Poli Mango Puran Poli
आपण आंब्याचा रस वर्षभरासाठी साठवून सुद्धा ठेऊ शकतो. आंब्याचा रस वर्षभरासाठी कसा साठवून ठेवायचा त्याचा विडियो ह्या अगोदर पब्लिश केला आहे. तीची लिंक आपण येथे (आंब्याचा रस वर्षभर कसा साठवायचा) क्लिक करून पाहू शकता.
आंब्याची पुराण पोळी बनवताना त्याचे आधी साररण बनवून घ्यायचे. त्यासाठी आंब्याचा रस, रवा, मिल्क पावडर, साखर, वेलची पावडर व जायफळ वापरले आहे. आंब्याची पुरणपोळी खूप छान स्वादिष्ट लागते.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 6 बनतात
साहित्य:
आवरणसाठी:
2 कप मैदा
¼ टी स्पून हळद
1 टे स्पून तूप
मीठ चवीने
1 चमचा तेल
तूप वरतून पोळीला लावण्यासाठी
सारणासाठी:
2 कप आंब्याचा रस
½ कप बारीक रवा
1 टे स्पून तूप
½ कप साखर
¼ कप मिल्क पावडर
1 टी स्पून वेलची पावडर
¼ टी स्पून जायफळ
कृती: आवरणसाठी: मैदा, हळद, मीठ व तूप मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. मग मळलेल्या पिठाला तेलाचा हात लाऊन 15 मिनिट बाजूला झाकून ठेवा.
सारणासाठी: आंब्याचा रस काढून मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्या. एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यामध्ये बारीक रवा मंद विस्तवावर भाजून घ्या. मग त्यामध्ये आंब्याचा पल्प घालून मंद विस्तवावर मिश्रण थोडे घट्ट होई पर्यन्त आटवून घ्या. मिश्रण घट्ट झालेकी त्यामध्ये साखर, घालून परत मिश्रण घट्ट होई पर्यन्त आटवून घ्या. मग त्यामध्ये वेलची पाउडर, जायफळ पाउडर घालून मिक्स करून मिश्रण थंड करायला ठेवा.
आंब्याच्या पुरणपोळी करिता: मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवा. एक गोळा घेऊन पुरी एव्हडा लाटून त्यामध्ये बनवलेले सारण भरा. सारण भरताना पिठाच्या गोळ्याच्या दुप्पट सारण भरा. मग पुरी मुडपून बंद करून हळुवारपणे पोळी लाऊन घ्या.
नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर पोळी घालून छान तुपावर खमंग भाजून घ्या. अश्या प्रकारे सर्व पोळ्या बनवून घ्या.
गरम गरम आंब्याची पुरणपोळी तूप घालून सर्व्ह करा.