तिप्पट फुलणाऱ्या निराळ्या साबुदाणा पापड्या दोन प्रकारच्या (साध्या व मसाला)
एप्रिल मे महिना आला की महिला वर्षभरासाठी साठवणीचे पदार्थ बनवून ठेवतात. मग वर्षभर आपल्याला उपवासाच्या किंवा इतर दिवशी तळून खाता येतात.
साबुदाणा पापड आपण दोन प्रकारे बनवणार आहोत. आपण साबूदाणा आधल्या दिवशी रात्री भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या पापड्या बनवणार आहोत.
The Two Types Of Sabudana Papad (Simple and Masala) For Fasting Video In Marathi be seen on our You tube Chanel Two Types Of Sabudana Papadya (Simple and Masala) For Fasting
पहिला प्रकारमध्ये आपण अगदी सोप्या व साध्या प्रकारे बनवणार आहोत. त्यामध्ये भिजवलेला साबूदाणा व मीठ व पाहिजे असेलतर जिरे घालायचे आहेत.
दुसऱ्या प्रकारामध्ये साबूदाणा, बटाटा, जिरे, हिरवी मिरची व मीठ वापरणार आहोत. दोन्ही प्रकार टेस्टला अप्रतिम लागतात. तसेच बनवायला पण सोपे आहेत.
पहिला प्रकार
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 50 पापड्या बनतात
साहित्य:
1 कप साबूदाणा
मीठ चवीने
जिरे (एच्छिक)
कृती: पहिला प्रकार:
एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये एक कप साबूदाणा धुवून घ्या. मग त्याच्यामध्ये साबूदाणा बुडेल इतके पाणी घालून रात्रभर भिजत ठेवा.
सकाळी एका जाड बुडाच्या भांड्यात 2 ½ कप पाणी गरम करून त्यामध्ये साबूदाणा व मीठ घालून 5 मिनिट मंद विस्तवावर शिजत ठेवा. मधून मधून सारखे हलवत रहा. मिश्रण घट्ट झालेकी म्हणजे पारदर्शक दिसायला लागले की विस्तव बंद करून भांडे खाली उतरवून घ्या.
एक स्वच्छ प्लॅस्टिक पेपर घेऊन त्यावर एका टे स्पूनच्या सहयानी छोट्या छोट्या पापड्या घाला. सर्व पापड्या घालून झाल्याकी कडकडीत उन्हात वाळत ठेवा. संध्याकाळी पापड्या उलट करून दसऱ्या दिवशी परत कडकडीत उन्हात वाळत ठेवा. पापड्या 2-3 दिवस उन्हात चांगल्या वळून झाल्या की मग डब्यात भरून ठेवा व उपवासाच्या दिवशी किंवा इतर दिवशी तळून खा.
दूसरा प्रकार:
साहित्य:
1 कप साबूदाणा
2-3 छोटे बटाटे
4 हिरव्या मिरच्या
1 टी स्पून जिरे
मीठ चवीने
कृती:
एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये एक कप साबूदाणा धुवून घ्या. मग त्याच्यामध्ये साबूदाणा बुडेल इतके पाणी घालून रात्रभर भिजत ठेवा.
सकाळी 2-3 छोटे बटाटे सोलून घ्या. एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये त्यामध्ये बटाटे थोडेसे उकडून घ्या. बटाटे जास्त उकडायचे नाही फक्त 5 मिनिट अर्धवट उकडायचे. मग गरम असतानाच मोठ्या भोकाच्या किसणीने किसून बाजूला ठेवा. हिरवी मिरची बारीक कुटून घ्या.
सकाळी एका जाड बुडाच्या भांड्यात 2 ½ कप पाणी गरम करून त्यामध्ये साबूदाणा व मीठ घालून 5 मिनिट मंद विस्तवावर शिजत ठेवा. मधून मधून सारखे हलवत रहा. मिश्रण घट्ट झालेकी म्हणजे पारदर्शक दिसायला लागले की त्याच्यामध्ये किसलेला बटाटा, हिरवी मिरची, घालून मिक्स करून एक वाफ येऊ ध्या. मग विस्तव बंद करून भांडे खाली उतरवून घ्या.