गव्हाच्या पिठाचा असा टेस्टी नाश्ता बनवा सगळे विचारतील कसा बनवला
आता मुलांना सुट्ट्या आहेत मग रोज काहीना काही नवीन डिश आपण बनवतो. पण ती डिश पौष्टिक असायला पाहिजे असे आपल्याला वाटते. आज आपण अशीच नवीन एक डिश पाहणार आहोत. गव्हाचे पीठ वापरुन मस्त टेस्टी नाश्ता बनवा सगळे अगदी आवडीने खातील.
The Wheat Flour Tasty Nashta For Kids New Recipe For Kids Video In Marathi be seen on our You tube Chanel Wheat Flour Tasty Nashta For Kids New Recipe For Kids
आपण कोणी पाहुणे येणार असतील तर अश्या प्रकारची डिश बनवू शकतो किंवा जेवणाच्या वेळी सुद्धा अश्या प्रकारची डिश बनवू शकतो. नवीन प्रकारचा नाश्ता बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, बटाटा, गाजर वापरले आहे.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
2 कप गव्हाचे पीठ
1 टी स्पून ओवा
3 चमचा तेल
मीठ चवीने
3 मध्यम आकाराचे बटाटे
2 मध्यम आकाराचे गाजर
2-3 हिरव्या मिरच्या
1 छोटा कांदा
1 टी स्पून आल-लसूण पेस्ट
2 टे स्पून कोथिंबीर
1 टी स्पून लिंबुरस
मीठ चवीने
कृती: एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ, ओवा, 2 टी स्पून तेल किंवा तूप, मीठ घेऊन मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. जसे आपण चपाती बनवण्यासाठी मळतो तसे.
दोन बटाटे स्वच्छ धुवून, सोलून, किसून घ्या. मग बटाट्याचा कीस पाण्यात घालून धुवून घ्या. म्हणजे बटाट्याचा स्टार्च निघून जाईन. मग त्यातील पाणी दाबून काढून एका बाउलमध्ये काढून घ्या. मग गाजर धुवून, सोलून किसून घ्या. कांदा बारीक चिरून घ्या. कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्या. हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. आल-लसूण कुटून घ्या.
एका बाउल मध्ये किसलेला बटाटा, गाजर, कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा, आले-लसूण पेस्ट, घालून मिक्स करून घ्या. जेव्हा आपण नाश्ता बनवणार तेव्हा सर्वात शेवटी लिंबुरस व मीठ घालून मिक्स करा.
आता मळलेल्या पिठाचे एक सारखे 8 गोळे बनवा. प्रथम पहिले चार गोळे एक सारखे लाटून घ्या. मग एक चपाती घेऊन त्यावर दोन टे स्पून बटाटाचे मिश्रण एक सारखे पसरवून त्यावर दुसरी चपाती ठेवा मग त्यावर परत दोन टे स्पून सारण पसरवून त्यावर तिसरी चपाती ठेवून परत त्यावर दोन टे स्पून मिश्रण ठेवून चौथी चपाती ठेवून बाजूनी कडा मुडवून घ्या म्हणजे सारण बाहेर पडणार नाही.
मग एका मोठ्या आकाराच्या भांड्यात पाणी घेऊन गरम करायला ठेवा. मग भोक असलेली प्लेट तेल लावून घ्या. त्यावर बनवली चपाती ठेवा व त्यावर झाकण ठेवून 15 मिनिट वाफ येवू ध्या. (किंवा जर आपल्या कडे स्टीमर घेऊन त्याच्या प्लेटला तेल लावून त्यावर ती चपातीचे बनवलेला नाश्ता ठेवा वर झाकण ठेवून 15 मिनिट वाफ येवू द्या.)
15 मिनिट झाल्यावर विस्तव बंद करून स्टीमर वरची प्लेट काढून नाश्ता थंड होऊ द्या. मग त्याचे एक सारखे 8 त्रिकोणी तुकडे करा. एका नॉन स्टिक पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवा.
एका बाउलमध्ये ½ वाटी तांदळाचे पीठ व मीठ चवीने घालून थोडे पाणी घालून मिश्रण बनवून घ्या. मग एक कापलेला त्रिकोण घेऊन तांदळाच्या मिश्रणात बुडवून शालो फ्राय करा. किंवा तव्यावर बाजूनी तेल घालून सुद्धा फफ्राय करू शकता.
गरम गरम गव्हाच्या पिठाचा चविष्ट नाश्ता टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.