लाख कोशिश करून सुद्धा लग्न होत नाही हे उपाय करून चट मंगनी पट शादी लवकर विवाह योग येऊ शकतो
खूप प्रयत्न करून सुद्धा विवाह होत नाही बऱ्याच अडचणी येतात कारण काही कमजोर ग्रह दोष असू शकतात. तसे असताना खाली दिलेले उपाय करून पहा विवाहामधील अडचणी दूर होतील.
The text 8 Most Power Remedies For Fast Marriage In Marathi be seen on our You tube Chanel 8 Most Power Remedies For Fast Marriage
शनि, मंगळ व सूर्य ह्या ग्रहांच्या मुळे विवाहमध्ये अडचणी येतात. ते कसे ते आपण पाहू या.
तुळशीचे लग्न झालेकी आपल्याकडे विवाह तिथी सुरू होतात. पण काही मुला-मुलींना मन पसंद जोडीदार मिळत नाही किंवा विवाहामध्ये अडचणी येतात. किंवा काही कुंडली दोष असू शकतो त्यामुळे लग्न ठरता ठरता मोडते. त्यासाठी काही ज्योतिष उपाय आहेत.
ज्योतिष शास्त्र नुसार गुरु व शुक्र हे ग्रह विवाह साठी जिम्मेदार असतात. जर हे दोन्ही ग्रह प्रबळ असतील तर विवाह साठी काही समस्या येत नाहीत. ह्याच्या व्यतिरिक्त शनि, मंगळ व सूर्य हे ग्रह प्रबळ असतील तर विवाहासाठी कोणत्या सुद्धा समस्या येत नाहीत. विवाहसाठी काही अडचणी येत असतील तर काही उपाय दिले आहेत ते केलेतर समस्या दूर होऊ शकतील.
विवाहमध्ये येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय:
1. विवाह इच्छुक मुलगा-मुलगी ह्यांनी भगवान शंकर ह्यांच्या देवळात जाऊन माता पार्वतीची पूजा अर्चा करावी. त्यामुळे नक्की फायदा होईल.
2. विवाह इच्छुक मुलींनी 16 सोमवारचे व्रत विधी पूर्वक करावे त्याच बरोबर माता पार्वती व शंकर भगवान ह्यांची पूजा अर्चा करावी.
3. ज्याचे विवाह होत नाहीत किंवा खूप अडचणी येत आहेत त्यांनी गुरुवारी ब्रहस्पति देवाचा उपवास करावा. गुरुवार ह्या दिवशी भगवान ब्रहस्पति ह्यांचा पूर्ण दिवस उपवास करून संध्याकाळी कहाणी वाचावी मग गूळ व चणेच्या नेवद्य दाखवावा. एक गोष्ट लक्षात ठेवा की पूर्ण दिवस काही सेवन करायचे नाही फक्त संध्याकाळी उपवास सोडताना खावे. पण त्यामध्ये मीठ असता कामा नये.
4. विवाह संबंधी समस्या पासून मुक्ती मिळण्यासाठी 6 मुखी रुद्राक्ष धारण करावे. त्यामुळे आपल्याला लाभ मिळेल.
5. सोमवार ह्यादिवशी सव्वा लीटर दूध व 200 ग्राम चनाडाळ जरूरत मंदला दान करावी. त्यामुळे फायदा होईल. हा उपाय मुलगा व मुलगी दोघे सुद्धा करू शकतात.
6. गुरुवार ह्या दिवशी आंघोळ करताना त्या पाण्यात थोडीशी हळद टाकावी, हा उपाय मुलगा व मुलगी दोघे सुद्धा करू शकतात.
7. गुरुवार ह्या दिवशी पिवळ्या रंगाची वस्तु दान करावी त्यामुळे विवाहा मधील अडचणी दूर होतील.
8. जर कुंडली मध्ये मंगळ दोष आहे तर हनुमानजीनची रोज पूजा अर्चा करावी. मंगळवार ह्या दिवशी उपवास करून भगवान हनुमान ह्यांची पूजा करावी. व भोग म्हणून गव्हाच्या पिठाचे गूळ घालून लाडू बनवून भोग दाखवावा व त्याच बरोबर शेंदूर अर्पित करावा.