हनुमानजीनचे सुंदर कांड काय आहे | सुंदर कांड कसे व कधी वाचावे | वाचनाचे फायदे व शुभ संकेत काय आहेत.
सुन्दर कांड काय आहे
जय श्री राम
सुन्दर कांड हे श्री राम चरित मानस मधील 5 अध्याय कांड आहे. सुन्दर कांड हे सर्वात पहिल्यांदा श्री वाल्मीकी ह्यांनी संस्कृत ह्या भाषेमध्ये लिहिले होते. नंतर मग तुलसीदास ह्यांनी राम चरित मानस लिहिले त्यामुळे सुन्दर कांड हे आपल्याला आपल्या भाषेमध्ये पाहायला मिळाले टे आता सर्वात जास्त लोकप्रिय आहे.
सुन्दर कांडमध्ये श्री हनुमान सीतामाता ह्यांना शोधायला निघाले व त्यामध्ये लंका यात्राचे संपूर्ण मनमोहक लिखाण केले आहे.
The Benefits of Reading Sunder Kand Path In Marathi be seen on our You tube Chanel Benefits of Reading Sunder Kand Path
सुन्दर कांडमध्ये श्री हनुमान ह्यांचे वर्णन केले आहे तसेच संपूर्ण रामायण मध्ये श्री राम ह्यांचे सुंदर रूप, त्यांचे जीवन, स्वभाव, आदर्श ह्यांचे गुणगान केले आहे. व सुन्दर कांड मध्ये श्री हनुमान ह्यांचे वीरताचे वर्णन केले आहे. सुन्दर कांड हे हनुमान जीनच्यावर पूर्ण रचना आहे. असे म्हणतात की सुन्दर कांडचे वाचन केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
सुन्दर कांडमध्ये काय सांगितले आहे.
हनुमान जी ह्यांनी आपल्या बुद्धीने व बळाचा वापर करून सीता माताना शोधून काढले होते. हनुमान जी सीता माता ह्यांना शोधायला लंका ह्या ठिकाणी गेले होते. लंकामधील सुंदर अशोक वाटिका मध्ये सीता माताचे दर्शन झाले होते. म्हणूनच ह्या भागाचे नाव सुन्दर कांड असे पडले. हनुमानजी ह्यांना त्यांची आई सुंदरा असे हाक मारत होती. म्हणूनच वाल्मीकी ह्यांनी ह्या भागाचे नाव सुन्दर कांड असे दिले.
”
सुन्दर कांड ” चे फायदे | Benefits of – “Sunder Kand”?
असे म्हणतात की 40 आठवडे नियमित सुन्दर कांडचे जो कोणी श्रद्धापूर्वक वाचन करेल त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याच बरोबर जीवनातील कष्ट, दुख, परेशानी दूर होतात. ज्योतिषीसुद्धा काही समस्यासाठी सुन्दर कांडचे वाचन करण्यासाठी सांगतात. जर कोणाच्या जीवनात बऱ्याच समस्या असतील त्यांनी सुन्दर कांडचे आत्मविश्वासनाने वाचन केल्यास शुभ फळ मिळते.
सुन्दर कांडमध्ये किती कांड आहेत?
वाल्मीकि ह्यांनी लिहिलेल्या रामायण मध्ये पाचवे कांड म्हणजे सुंदर कांड (अध्याय) होय. वाल्मीकि ह्यांच्या रामायणमध्ये सात कांड म्हणजे बाल कांड, आयोध्या कांड, अरण्य कांड, किष्किंधा कांड, सुंदर कांड, युद्ध कांड व उत्तर कांड आहे.
सुंदरकांडचे वाचन किती वाजता करावे:
सुंदरकांडचे वाचन जर आपण एकटे करत आसाल तर सकाळी म्हणजेच पहाटे 4 टे 6 ह्या वेळात करावे. पान जर आपण ग्रुपमध्ये सुंदरकांडचे वाचन करीत असाल तर संध्याकाळी 7 वाजून गेल्यावर करणे फायदेशीर आहे.
सुंदरकांडचे वाचन कधी व कसे करायचे?
सुंदरकांडचे नियमित वाचन केल्यास व्यक्तिच्या शरीरात नकारात्मक शक्ति दूर होतात. जर आपण कोणत्या हेतुसाठी सुंदरकांडचे वाचन करणार असाल तर त्याची सुरवात मंगळवार किंवा शनिवार ह्या दिवसांपासून सुरू करू शकता. सुंदरकांडचे वाचन करायचे असेलतर पहिल्यांदा स्वच्छताचे पालन केले पाहिजे.
हनुमान जी खुश असतील तर काय शुभसंकेत देतात:
शनि साडेसातीचा कोणताच असर आपल्यावर होत नसेलतर किंवा शनि पीडा होत नसेलतर असे समजावे की हनुमानजी आपल्यावर खुश आहेत. म्हणजे आपण खोटे बोलत नसाल, सगळ्यां बरोबर प्रेमानी वागत असाल मित्र परिवार बरोबर आपले वादविवाद होत नाहीत म्हणजे समजावे की हनुमानजीनची कृपा आपल्यावर आहे.
आपल्या जीवनात जर हे 5 संकेत मिळत असतील तर समजावे हनुमानजीनची विशेष कृपा आपल्यावर आहे. ते कोणते टे पाहू या:
हनुमानजीनच्या शरणमध्ये जो जी व्यक्ति जाईल त्याना कोणती सुद्धा बाधा येणार नाही. आताच्या कलियुगमध्ये हनुमानजीची भक्तिच लोकांना दुख व संकट पासून वाचवू शकेल.
महावीर हनुमान नेहमी आपल्या भक्तांची रखा करतात. हनुमानजी भक्तांना लवकर प्रसन्न होतात. पण भगवान हनुमान कसे प्रसन्न आहेत ते कसे काय समजावे.
आपल्या स्वप्नात भगवान राम किंवा भगवान हनुमान येत असतील तर समजावे त्यांची कृपा आपल्यावर आहे.
आपण जर नेहमी सत्याच्या बाजूनी रहात असाल व निडर असाल तर हनुमानजीनची कृपा नेहमी आपल्यावर राहील. असे लोक बिनधास्त राहू शकतात.
आपल्या जीवनात फक्त सफलता मिळत असेल व कोणत्या सुद्धा अडचणींचा त्रास होत नसेलतर हनुमान जीनची कृपा आपल्यावर आहे.
आपल्याला साडेसातीचा त्रास होत नसेलतर समजावे की आपल्यावर हनुमानजीनची कृपा आहे.