त्रिफळा चूर्ण सेवनाचे फायदे केस, दात, पचनक्रिया, कॉन्स्टिपेशन, त्वचा व वजन कमी करते
त्रिफळा आपल्या आरोग्यासाठी फायदेमंद आहे. तसेच पचनक्रिया सुधारते व कॉँस्टीपेशन समस्या दूर करते.
आयुर्वेदचा इतिहास हा 5000 वर्षा पासून जास्त जुना आहे. पूर्वी पासून आयुर्वेद औषधे बनवण्यासाठी जडीबुटीचा वापर केला जातो. त्यामधील एक जडीबुटी म्हणजे त्रिफळा होय. आयुर्वेद औषधे म्हंटली की त्रिफळाचे नाव येतेच. जर आपण आयुर्वेद औषधे घेत असाल तर आपल्याला त्रिफळा ही परिचयाचे असेल.
The Health Benefits of Triphala Churna Video In Marathi be seen on our You tube Chanel Health Benefits of Triphala Churna
त्रिफळा किंवा त्रिफळा चूर्ण ह्या मध्ये एका पेक्षा जास्त जडीबुटीचा समावेश केला जातो ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. त्रिफळा मिश्रण अनेक रोगांवर गुणकारी आहे.
आयुर्वेदामध्ये त्रिफळा हे आपल्या शरीरातील वात, पित्त व कफ संतुलित करण्यासाठी बनवले आजे. त्रिफळामध्ये पाच रस किंवा स्वाद असतात. त्याची चव गोड, आंबट, कडवी व तिखट असते. फक्त त्याच्यामध्ये खारट पणा नसतो.
त्रिफळा चूर्ण म्हणजे काय?
त्रिफळा किंवा त्रिफळा चूर्ण हे आयुर्वेद मिश्रण आहे. ते आवळा, हरडा ह्याच्या पासून तयार करतात. खरम्हणजे त्रिफळा ह्याचा अर्थ तीन फळ होय. त्रिफळा हे आपल्या शरीरातील शक्ति वाढवण्यासाठी व आपले शरीर निरोगी राहण्यासाठी गुणकारी आहे व ते बऱ्याच रोगांवर गुणकारी आहे.
त्रिफळा चूर्णमध्ये आवळा, बेहडा व हिरडा आहे त्याच्या मिश्रणानी बनवले जाते.
आवळा: आवळा आपल्या देशामध्ये मुबलक प्रमाणात कुठे सुद्धा मिळतो आवळा हे एक सामान्य फळ आहे. आवळ्यामध्ये फायबर, एंटी ऑक्सिडेन्ट व खनिज भरपूर प्रमाणात आहे. त्याच बरोबर त्याच्यामध्ये विटामीन भरपूर प्रमाणात आहे.
आवळ्याच्या सेवनाने पोट साफ राहते तसेच रोग प्रतिकार शक्ति वाढते व वाढत्या वया बरोबर शरीरावर व चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात त्यावर खूप फायदेशीर आहे.
बेहडा: बेहडा हे गुणकारी आहे. त्याच्यामुळे दुखणे, एंटि ऑक्सिडेन्ट व लिव्हरला सुरक्षा प्रदान करते. डायबीटीस होण्यापासून बचाव होतो.
हिरडा: आयुर्वेदामध्ये हिरडा ह्या जडीबुटी ला खूप महत्व आहे. ह्यामध्ये एंटि ऑक्सिडेन्ट, सूज येणे, किंवा वाढत्या वयाचे गुण कमी होतात. जखम बरी होते. हिरडा मुळे पोट साफ होते, हृदय व मूत्राशयसाठी फायदेमंद आहे. तसेच हिरडा औषधांचा राजा आहे असे म्हणता येईल.
त्रिफळा व त्रिफळा चूर्णचे फायदे:
शरीराचे वजन कमी करण्यासाठी फायदेमंद आहे. जर आपल्याला बिना एक्सरसाईज शरीराचे वजन कमी करायचे आहे तर आपल्याला त्रिफळा चूर्ण हा चांगला विकल्प आहे.
पचनक्रिया चांगली राहते:
आपण पॅक फूड किंवा बाहेरील अन्न पदार्थ सेवन करतो तेव्हा ते पचायला थोडे जड असतात व ते आपल्या आतडयामधील खालच्या भागात अडकून राहतात. व त्यामुळे पचनक्रिया बिघडते. तर त्रिफळा चूर्ण हे आपल्याला फायदेशीर आहे.
त्रिफळा डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेमंद:
त्रिफळा डोळ्यांच्या आरोग्यासाठी व दृष्टीसाठी फायदेमंद आहे. तसेच डोळ्याच्या मासपेशी मजबूत करतात. ग्लुकोमा, मोतीबिंदूची सुरवात ह्यावर उपयोगी आहे. रात्री झोपण्याच्या अगोदर 2 चमचे त्रिफळा तांब्याच्या भांड्यात किंवा मातीच्या भांड्यात भिजवून ठेवा मग सकाळी गाळून त्या पाण्यांनी डोळे धुवा. त्यामुळे डोळ्याचे आरोग्य चांगले राहते.
डोळ्याची जळजळ व त्रास कमी होतो. गाईचे तूप , मध व त्रिफळाच्या सेवना डोळ्याच्या आरोग्यासाठी वरदान आहे. किंवा एक ग्लास पाण्यात 1 चमचा त्रिफळा 10-15 मिनिट मंद विस्तवावर उकळून त्याचा काढा बनवून त्याच्यानी डोळे धुतल्यास फायदेशीर आहे.
त्रिफळा त्वचाच्या आरोग्यासाठी फायदेमंद:
त्रिफळा चूर्ण त्वचा संबंधित समस्याचा इलाज करतो. त्यामुळे चमक सुद्धा येते. आपल्या त्वचे वरील मृत पेशी काढून टाकतो. आपले रक्त साफ करतो. त्यामुळे चेहऱ्यावर चमक येते. त्याच बरोबर त्वचे वरील डाग, पिंपल्स व सनबर्न वरती इलाज करतो. त्वचेचा रंग उजळतो.
त्रिफळाचे गुण कॉँस्टीपेशन समस्या दूर करते:
त्रिफळा आपल्या आरोग्यासाठी फायदेमंद आहे. तसेच पचनक्रिया सुधारते व कॉँस्टीपेशन समस्या दूर करते.
त्रिफळा चूर्ण एक ग्लास गरम पाण्यात 1 चमचा मिक्स करून जेवण झाल्यावर घ्यावे. त्रिफळा चूर्ण आयुर्वेदिक औषध आहे.
त्रिफळा चूर्ण दांत मजबूत ठेवते:
त्रिफळा चूर्ण दातांच्या समस्या पासून छुटकारा देते. कारण की त्याच्या मध्ये एंटी इनपलेमेटरी व एंटी बकटेरियल गुण आहेत त्यामुळे दांत किडणे, सूज येणे रक्त येणे ह्या समस्या होत नाहीत. जर मुलांच्या दाताच्या तक्रारी असतील तर रात्री पाण्यात त्रिफळा भिजवून सकाळी ते पाणी तोंडात थोडा वेळ ठेवून मग थोडा वेलानी काढावे त्यामुळे दांत व हिरड्या मजबूत राहतात. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी सुद्धा दूर होते.
त्रिफळा चूर्ण केसांसाठी लाभदायक:
त्रिफळा चूर्ण केस गळणे, पातळ होणे, किवा टक्कल पडणे ह्या वर गुणकारी आहे. त्रिफळा केसांची मूळ घट्ट करतो. त्यासाठी आठोडयातून दोन वेळा त्रिफळा तेलानी मालीश करावे. त्यामध्ये विटामीन सी आहे त्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते. त्यामध्ये आवळा आहे त्यामुळे केस काळे होतात.
त्रिफळा चूर्ण सेवनांचे अजून फायदे:
त्रिफळा चूर्ण 5-5 ग्राम घेण्याने दाद, खाज, खुजली व त्वचा रोग वरती लाभदायक आहे.
शरीरातील पित्त, कफ व वायु कमी होतो.
अल्सर ठीक होतो.
कोलेस्ट्रॉल कमी होते.
डायबीटीस व हृदय रोगामध्ये रोज घ्यावे.
रात्री झोपण्याच्या अगोदर 1/2 चमचा त्रिफळा सेवन केल्यास रोग प्रतिकार शक्ति वाढते.