लग्न विवाह होत नाही किंवा उशीर होत आहे त्यासाठी लाल किताब मधील सोपे उपाय करून बघा
आपण ह्या अगोदर लाल किताब काय आहे ते पहिले तसे त्यामधील काही उपाय सुद्धा पाहिले. आता आपण मुलांच्या किंवा मुलींच्या विवाहसाठी अडचणी येत असतीलतर त्यासाठी सोपे घरगुती उपाय किंवा तोटके काय करायचे ते पाहू या.
The text Lal Kitab Remedies To Remove Delay In Getting Married In Marathi be seen on our You tube Chanel Lal Kitab Remedies
आजकाल मूल किंवा मुलीसुद्धा विवाह उशिरा करायला लागले आहेत. त्याची बरीच कारण सुद्धा असू शकतात किंवा आहेत. त्यातील काही कारणे अशी सुद्धा असू शकतात पहिले म्हणजे आपले करियर होय. मुले व मुली आता बरोबरीने शिकतात. करियर करायचे तर तेव्हडे शिक्षण सुद्धा घ्यायला पाहिजे. दुसरे म्हणजे आर्थिक तंगी सुद्धा असू शकते व तिसरे म्हणजे निर्णय घेण्यास विलंब होत जातो.
खर म्हणजे शास्त्रा नुसार विवाहाचे वय 25 वर्षे आहे. पण आजकाल 30 वर्षा पासून 53 वर्षा पर्यन्त विवाह होत आहेत. जर वय वाढत चालले तर विवाहामध्ये सुद्धा अडचणी येतात व बऱ्याच समस्याना तोंड द्यावे लागते.
आज काल विवाह होण्यास उशीर होतो कारण की आपल्याला साजेसा किंवा आपल्या शिक्षण किंवा नोकरी च्या तोंडीचा जीवनसाठी शोधण्यास किंवा पसंद करण्यात सुद्धा वेळ जातो. किंवा कुंडली जमत नाही, ग्रह पीडा, कुंडली दोष, कुंडलीमध्ये मंगळ दोष अशी बरीच कारणे असू शकतात. तसेच एक महत्वाचे म्हणजे विवाह होण्याची वेळ सुद्धा यावी लागते.
विवाह लवकर होत नाही किंवा अडचणी येत आहेत तर लाल किताब मधील खाली दिलेले 5 उपाय किंवा तोटके करून पहा:
1. जर अविवाहित मुलगी आहे व तिच्या लग्नासाठी म्हणजेच विवाह साठी विलंब होत असेलतर शुक्ल पक्ष मधील पहिल्या सोमवारी सकाळी एक चांदीचा भरीव गोळा चांदीच्या लॉकेटमध्ये घालून त्याला गंगाजल व दुधाचा अभिषेक करून अगरबत्ती व दिवा लाऊन शिवलिंगचा स्पर्श करून गळ्यात घालावा मग गरीब लोकांना मिठाई द्यावी.
2. जर मुलाच्या विवाह साठी उशीर होत असेलतर शुल्क पक्ष मध्ये येणाऱ्या पहिल्या शुक्रवारी सूर्यास्त पूर्वी एका मातीच्या मटक्यामध्ये मशरूम अगदी वर पर्यन्त भरून त्याचे झाकण लाऊन ती मटकी धार्मिक स्थान, मंदिर किंवा मस्जिद मध्ये दान करावी.
3. जर मुलाच्या विवाहमध्ये विलंब किंवा उशीर होत असेलतर शुक्रवार ह्या दिवशी सुनसान जागी दुपारी एक निळ्या रंगाचे फूल पुरा. पण फूल पुरण्यासाठी खड्डा करताना एका लाकडी काठीचा उपयोग करा व ती लाकडी काठी तेथेच टाकून या.
4. विवाह madhe येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी 36 लवंग, 6 कापुरche तुकडे किंवा वडी घेऊन त्यामध्ये हळद व तांदूळ मिक्स करून ते दुर्गा माताला अर्पण करा.
5. विवाह लवकर होण्यासाठी मुलीनी गुरुवारचे व्रत म्हणजेच उपवास करावा व मुलांनी शुक्रवार चे व्रत करावे.