सारखे सारखे इंटरव्ह्युमध्ये फेल मग करा हे सटीक सोपे उपाय
बरेच प्रयत्न करून सुद्धा इंटरव्ह्युमध्ये पास होत नाही किंवा काही वेळेस नोकरी जॉब मध्ये सिलेक्शन होऊन सुद्धा नोकरी मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. तर असे समजा की कुंडलीमध्ये काही दोष असेल. पण असे समजू नका की तुमचे प्रयत्न वाया जाणार नाहीत.
The text 7 Upay Or Totke Before Going For Job Interview In Marathi be seen on our You tube Chanel 7 Upay Or Totke Before Going For Job Interview
ज्योतिष शास्त्रामध्ये नोकरी मिळण्या बाबद अडचणीवर योग्य मार्ग आहेत. असे म्हणतात की ज्योतिष शास्त्रा नुसार खाली दिलेले 7 सटीक उपाय किंवा तोटके केले तर आपल्याला चांगली नोकरी मिळण्यामद्धे नक्की यश मिळेल व सर्व अडचणी दूर होतील.
1. हिंदू धर्मामध्ये गुरुवार ह्या दिवसाचे व्रत किंवा उपवास अगदी महत्वपूर्ण मानला जातो. ज्योतिष शास्त्रामध्ये सुद्धा गुरुवारचे व्रत महत्वाचे मानले जाते. असे म्हणतात की ज्या यक्तिला नोकरी मिळण्यासाठी परेशानीचा सामना करावा लागत आहे किंवा त्याच्या कार्य क्षेत्रात गती मिळण्यासाठी अडचणी येत आहेत त्यांनी गुरुवारचे व्रत करून भगवान विष्णु ह्यांची मनापासून पूजा अर्चा करावी. भगवान विष्णु ह्यांच्या समोर आपल्या परेशानीच्या व्यथा सांगा व समस्या दूर करण्यासाठी विनवणी करून प्रार्थना करा.
2. ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्य देव, भगवान शिव व पिंपळाच्या झाडाची पूजा अर्चा करणे महत्वाचे मानले जाते. असे म्हणतात की नियमितपणे सूर्य देव, शिव व पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करावे त्यामुळे नोकरी मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतील. पण आपल्याला नियमितपणे जल अर्पित करावे. पण नोकरी मिळाल्यावर जल अर्पित करणे बंद केले तरी चालेल.
3. मनासारखी नोकरी मिळण्यासाठी हा उपाय करा:
ज्योतिष शास्त्रा नुसार आपल्याला मनासारखी नोकरी मिळण्यासाठी रुद्राक्ष धारण करा. पण कोणते सुद्धा रुद्राक्ष धारण करू नका फक्त 1 मुखी, 10 मुखी व 11 मुखी रुद्राक्ष धारण करा. रुद्राक्ष धारण केल्यावर आपले नोकरी मिळण्याचे योग जुळून येतील. पण त्याच बरोबर आपले श्रम सुद्धा चालू ठेवा.
4. रविवारी बदाम दान करा:
ज्योतिष शास्त्रा नुसार रविवार ह्या दिवशी सूर्य पूजा करणे जेव्हडे महत्वाचे आहे तेव्हडेच बदाम दान करणे सुद्धा महत्वाचे आहे त्यामुळे योग्यते फळ मिळेल. असे म्हणतात की ज्यांना नोकरी मिळण्यामद्धे अडचणी येत आहेत किंवा मनासारखी नोकरी मिळण्यासाठी हा उपाय जरूर करून बघा. त्यामुळे कामातील अडचणी सुद्धा दूर होतील व चांगली नोकरी सुद्धा मिळेल. पण बदाम दान करताना जरूरतमंदलाच बदाम दान करावे.
5. ज्योतिष शास्त्रा नुसार जर नोकरी मध्ये प्रमोशन होत नसेलतर नियमित पणे “ॐ म्यो हो रेंग्ये क्यो” ह्या मंत्राचा जाप करावा. पण एक लक्षात ठेवा की ह्या मंत्राचा जाप करताना रोज एका ठराविक वेळीच करा. जर संध्याकाळी करत असालतर रोज संध्याकाळीच जाप करा. किंवा रोज सकाळी करत असालतर रोज सकाळीच करा. त्याच बरोबर रोज जितक्या वेळा जाप कराल तितक्याच वेळा जाप करावा व मध्येच जाप सोडू नका नाहीतर त्याचा फायदा होणार नाही.
6. काल भैरवची आराधना करा:
आपल्या नोकरी मध्ये आपली उन्नती होत नसेल किंवा उच्चअधिकारी किंवा सहकर्मि बरोबर कोणत्या समस्या होत असतील तर काल भैरवची आराधना करा. लाल किताबच्या अनुसार काल भैरवची पूजा करून नोकरीमध्ये उन्नती होऊ शकते. त्याच बरोबर बाकीच्या समस्या सुद्धा दूर होऊ शकतात. असे म्हणतात की काल भैरवची पूजा अर्चा केल्यास सफलता लवकर मिळते.
7. अर्गलाचे वाचन करावे:
आपल्या कार्य क्षेत्रात सारख्या अडचणी येत असतील तर देवी दुर्गाची उपासना करावी. तसेच नियमितपणे दुर्गा सप्तशनी मधील अर्गला ह्या अध्यायाचे वाचन करावे. त्यामुळे नोकरी मिळणे किंवा नोकरीतील अडचणी दूर होण्यास मदत मिळेल. त्याच बरोबर त्याचे वाचन सुद्धा वेळच्या वेळी करावे. म्हणजे सकाळी वाचन करत असाल तर नियमित पाने सकाळी वाचन करावे किंवा संध्याकाळी वाचन करत असाल तर संध्याकाळी करावे. परंतु अर्गलाचे वाचन करताना पूर्ण आत्म विश्वासाने व श्रद्धा पूर्वक वाचावे. देवी भगवती आपल्या सर्व समस्या दूर करील. त्याच बरोबर गरीब लोकाना आठवड्यातून दों वेळा जेवण द्यावे.