8 Powerful Lal Kitab Totke Or Upay In Marathi

8 प्रमुख शक्तिशाली लाल किताब मधील तोटके किंवा उपाय 

आज काल धकाधकीच्या जीवनात आपण कोणत्याना कोणत्या तरी समस्याणी परेशान असतो. तसेच परेशानी मधून बाहेर पडण्यासाठी आपण वेगवगळे उपाय तोटके किंवा ज्योतिषी उपाय करीत असतो. तरी पण काही वेळेस आपल्याला त्यातून यश मिळत नाही.

The text 8 Powerful Lal Kitab Totke Or Upay In Marathi be seen on our You tube Chanel 8 Powerful Lal Kitab Totke Or Upay

आपण आपल्या जीवनात अश्याच काही समस्या पासून परेशान असाल तर लाल किताब मधील 10 सोपे सटीक उपाय किंवा तोटके आहेत ते करून बघा ते केल्याने आपल्या परेशानी मधून आपल्याला काही पप्रमाणात फायदा होऊ शकतो.

आपल्या समस्या दूर करण्यासाठी लाल किताब मधील 8 तोटके किंवा उपाय देत आहोत. कदाचित आपल्याला माहीत नसतील पण काळजी करू नका ते प्रयोग कसे करायचे ते आपण बघणार आहोत त्याचा प्रयोग आपण करून पहा.

लाल किताब मधील 8 प्रमुख टोटके: 

Lal Kitab Totke
8 Powerful Lal Kitab Totke Or Upay

1. शनि दोष दूर करण्यासाठी: आपल्या कुंडलीमध्ये शनि दोष असेलतर लाल किताबमधील हा तोटका किंवा उपाय करून पहा. एक चपातीचा तुकडा 3 ते 4 वेळा डोक्या वरुण फिरवून कावळ्याला खायला द्या. असे केल्याने शनि दोष कमी होईल. व शनि देवाची कुदृष्टि आपल्यावर राहणार नाही.

2. लाल किताबच्या उपायांनी दुर्भाग्य व त्रास कसा कमी करायचा:
आपण जर आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या दुर्भाग्य व कोणत्या त्रासानी त्रस्त असाल तर त्यातून मार्ग बाहेर पडण्यासाठी शनिवार ह्या दिवशी उदीडदाळमध्ये दही व सिंदूर घालून पिंपळाच्या झाडाच्या खाली ठेवा. हा प्रयोग आपण थोडे दिवस केल्यावर त्याचा नक्की फायदा होऊन आपण दुर्भाग्य सारक्या चीज पासून छुटकारा मिळवू शकाल.

3. लाल किताब मधील तोटके किंवा उपाय करून धन संबंधित समस्या कश्या दूर कराल:
आपण आपल्या जीवनात धन संबंधित समस्या पासून परेशान आहात तर लाल किताब मधील तोटके किंवा प्रयोग करू शकता. अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर उडीद डाळीचे वडे बनवून त्यावर सिंदूर वाहून पिंपळाच्या झाडाखाली ठेवा.

4. आपण आपल्या जीवनातील गरोबी दूर करायची असेलतर आपण लाल किताब मधील तोटके किंवा प्रयोग करून पहा. सर्वात पहिल्यांदा शनिवार ह्या दिवशी आपल्या पलंगाच्या खाली एका बाउलमध्ये मोहरीचे तेल घेऊन त्यामध्ये उडीदडाळीचे गुलगुले बनवून ठेवा. मग नंतर ते गुलगुले कुत्र्याला किंवा कावळ्याला खायला द्या. असे केल्याने हळू हळू आपली गरीबी दूर होऊन आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होऊन माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहील.

5. नवीन व्यवसायात सफलता मिळण्यासाठी लाल किताब मधील तोटके:
आपण नवीन व्यवसाय सुरू करणार असाल किंवा व्यापार अजून वाढवणार असाल तर व आपल्याला त्यामध्ये सफलता पाहिजे असेलतर लाल किताब मधील तोटके किंवा उपाय करून पहा त्यामुळे बराच फायदा होईल. त्यासाठी आपण ज्या जागी स्वस्तिकचे चिन्ह काढा मग आपल्या पहिल्या व्यापार करीत असलेल्या जागेवरून एक लोखंडी वस्तु आणून त्यामध्ये उडीदडाळ ठेवा. असे केल्याने आपला व्यवसाय मोठा होऊन चांगल्या प्रकारे चालू शकेल.

6. नोकरी मिळण्यासाठी लाल किताब मधील तोटका:
आपण नोकरी मिळण्यासाठी बरेच प्रयत्न करीत आहात पण त्यामध्ये आपल्याला यश येत नाही तर लाल किताब मधील तोटके करून पहा. त्यासाठी रात्री झोपताना आपल्या उशीच्या खाली एक रुपया ठेवावा मग दुसऱ्या दिवशी तो रुपया शमशान घाटावर फेकून द्यावा. कॉईन फेकताना आपल्याला एक प्रार्थना बोलायची आहे. “ हे दुर्गा माता व येथे ज्या पण शक्ति आहेत त्याना माझी विनंती आहे की माझी जी पण इच्छा आहे ती पुरी करा” असे म्हणून परत घरी या पण घरी येताना कोणाशी सुद्धा बोलू नका. जर आपण बोलला तर आपली प्रार्थना असफल होईल.

7. आपल्या पतीला वश करण्यासाठी लाल किताब मधील तोटका:
जर कोणती सुद्धा स्त्री आपल्या पतीला वश करू इच्छिते तर तिने लाल किताब मधील तोटक करावा. त्यासाठी पहिल्यांदा विडयाचे पान घ्यावे व त्यावर चंदन व केशरची पावडर मिक्स करून ठेवा. मग दुर्गा माताच्या फोटो समोर बसून दुर्गा स्तुति मधील चंडी स्त्रोत्रचा पाठ 43 दिवस वाचावा मग केशर व चंदन चा तिलक आपल्या कपाळावर लाऊन आपल्या पती समोर जावे किंवा जर आपले पती बाहेर गावी आहेत तर त्यांच्या फोटो समोर जावे पण ही प्रक्रिया 43 दिवस करावी मग विडयाचे पान नदीत टाकावे. असे केल्यावर आपले पती आपल्या वशमध्ये येतील व आपले म्हणणे मानायला लागतील.

8. कोर्ट केसमध्ये विजय प्राप्त होण्यासाठी:
जर आपण कोणत्या कोर्ट केसमध्ये फसला आहात व आपल्या बाजूनी फेसला होत नसेलतर त्यासाठी कोर्ट केस च्या दिवशी थोडेसे तांदूळ कोर्ट रूम घेऊन जा व कोणचे लक्ष नसताना ते तांदूळ कोर्ट रूममध्ये फेकून द्या.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.