9 फेगशूई टिप्सनी दूर करा घरातील निगेटिव्ह एनर्जी
आपल्याला माहीत आहे का की आपले मन उदास दुखी होते ते का? कारणकी आपण टेंशन मध्ये असतो किंवा कोणत्यातरी काळजीमध्ये असतो कारण तेव्हा आपल्या घरात नकारात्मक ऊर्जाचा संचार होत असतो. त्याचा परिणाम सर्व परिवारावर म्हणजेच त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर किंवा त्यांच्या कामावर पडत असतो.
The text 9 Simple Feng Shui Tips To Remove Negative Energy From House In Marathi be seen on our You tube Chanel 9 Simple Feng Shui Tips To Remove Negative Energy From House
घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढणायवर काही फेंगशुई टिप्स आहेत त्या आपण बघणार आहोत त्या टिप्स आपण आचरणात आणून निगेटिव्ह एनर्जी दूर करू शकतो.
1. आपल्या घरात जर जास्त प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी आली असेलतर प्रतेक खोलीमध्ये थोडे थोडे मीठ (खडे मीठ) ठेवा. मग दोन दिवस झाले की हे मीठ काढून बाहेर फेकून द्या मग दुसरे मीठ ठेवा.
2. घरातील प्रतेक खोलीमध्ये पोंछा मारताना पाण्यात थोडे खडे मीठ घाला त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. फेंगशुई टिप्स नुसार असे रोज करा त्याचा चांगला अनुभव आपल्याला येईल.
3. घरामध्ये विंड चाइम अश्या ठिकाणी लावा की जेथून चांगली हवा येईल व विंड चाइम च्या घंटीचा छान आवाज येईल त्याच्या मधुर आवाजानी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. पण विंड चाइम लावताना मेन डोर किंवा खिडकीच्या येथे लावा तेथून हवा चांगली येते. व त्याचा चांगला प्रभाव पडतो.
4. घरात नेहमी स्वच्छता ठेवा सर्व वस्तु जागच्या जागी व्यवस्थित ठेवा. घर स्वच्छ असले की आपले मन सुद्धा प्रसन्न रहाते.
5. बेकारच्या ण लागणाऱ्या वस्तु उगाच जमा करू नका कारण की त्यामुळे घरात पसारा होतो व त्यातून नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
6. बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवा उघडा ठेऊ नका. कारण की बाथरूममधून सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा बाहेर येते. तसेच बाथरूम मधून आलेली नकारात्मक ऊर्जा घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत असते.
7. घरात सकाळ संध्याकाळ दिवा=बत्ती करा. म्हणजे चांगली सुगंधी अगरबत्ती लावा त्याच्या पवित्र सुगंधानी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
8. बथरूम मध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा असते. तेव्हा बाथरूमच्या खिडकीत एका काचेच्या बाउलमध्ये थोडे खडे मीठ ठेवा. पण ते जर ओली झाले तर लगेच बदलून दुसरे मीठ ठेवा. बदललेले मीठ फेकून द्यायला विसरू नका.
9. सिंगिंग बाउल, क्रिस्टल सिंगिंग बाउल सारख्या फेंगशुई वस्तु घरात ठेवून सुद्धा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करता येते.
टीप: आपण फेंगशुई आइटम्स घरात ठेवतो पण अश्या प्रकारचे फेंगशुई आइटम्स घरात ठेवताना त्याची पूर्ण माहीत करून घ्या मगच घरात अश्या प्रकारच्या वस्तु ठेवा कारण अश्या वस्तूची दिशा बदलली तर त्याचे उलट परिणाम होऊ शकतात.