आषाढ दीप अमावस्या कणकेचे गोड दिवे | महत्व | माहिती व पूजाविधी
आता आषाढ महिना संपत आला आहे. आषाढ महिना शेवटचा दिवस म्हणजे अमावस्या आहे. पूर्वीच्या काळी आषाढ महिन्यातील अमावस्या म्हणजे गटार अमावस्या म्हणायचे. म्हणजे नॉनव्हेज सेवन करायचे व त्यासोबत दारू सेवन करायची कारण नंतर श्रावण भाद्रपद म्हणजेच गणपती नवरात्री असते मग नॉनव्हेज सेवन करणे वर्ज असते.
कणकेचे गोड दिवे कसे बनवायचे ते पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडियोमध्ये पहा: दिवे कसे बनवायचे
आषाढ दीप अमावस्या महत्व | माहिती व पूजाविधी येथे क्लिक करून विडियोमध्ये आइकू शकता: दीप अमावस्या माहिती व पूजाविधी
पण आता आपण निराळ्या पद्धतीने आषाढ अमावस्या साजरी करायची आहे. त्याला दीप अमावस्या म्हणतात. अमावस्याच्या दिवशी घरातील सर्व दिवे घासून पुसून ठेवा. देवांना आंघोळ घालून देव्हारा स्वच्छ करून देवांची मनोभावे पूजा करून दिव्यांची पूजा करा. ह्या दिवशी कणकेचे गोड दिवे लाऊन पूजा करायची पद्धत आहे.
आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला खूप महत्व आहे. आषाढ अमावस्याच्या दिवशी पूजा करून दिवे का लावायचे तर आपल्या घरातील इडापीडा टळावी व त्याच बरोबर अज्ञान, रोगराई दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश पसरावा व सुख समृद्धी मिळावी त्यासाठी ह्या दिवशी दिव्यांची पूजा करायची फार पूर्वी पासून प्रथा आहे.
आषाढ अमावस्या वेळ:
27 जुलै 2022 बुधवार रात्री 9 वाजून 11 मिनिट ते
28 जुलै 2022 गुरुवार रात्री 11 वाजून 24 मिनिट पर्यन्त
28 जुलै 2022 गुरुवार गुरुपुष्यामृतयोग सुद्धा आहे.
28 जुलै गुरुवार सकाळी 7 वाजून 4 मिनिट ते
29 जुलै शुक्रवार सकाळी 6 वाजून 16 मिनिट पर्यन्त
आषाढ दीप अमावस्या ह्या दिवशी काय करावे:
आषाढ दीप अमावस्या दिवशी भगवान शिव, पार्वती, गणेश व कार्तिक स्वामींची पूजा करतात. जर आपली इच्छा असेलतर आपण उपवास सुद्धा करू शकता. सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा.
आषाढ दीप अमावस्या दिवशी महिला तुळशीला किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालायची पद्धत आहे.
आषाढ दीप अमावस्या दिवशी पुरणाचा नेवेद्य बनवून पितरांना दाखवायची पद्धत आहे.
आषाढ दीप अमावस्या दिवशी पितरांना तर्पण देवून पुरणाचा नेवेद्य दाखवल्यास पितर प्रसन्न होतात व त्यांना मुक्ती मिळून ते आपल्याला आशीर्वाद देतात.
आषाढ दीप अमावस्या दिवशी पिंपळ, केळी, लिंबू, किंवा तुळशीची झाड लावण्याची प्रथा आहे. त्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रहदोष दूर होतो.
आषाढ दीप अमावस्या दिवशी गंगा स्नान करून दान करण्याचे महत्व आहे. त्याच बरोबर माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घालायची पद्धत आहे.
दीप अमावस्या पूजा अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची:
आपल्या घरात असणारे दिवे, समया, लामण दिवे सर्व घासून पुसून स्वच्छ करायची पद्धत आहे. आपल्याला पहिजे तर आपण 11 कणकेचे गोड दिवे बनवून लाऊ शकता किंवा पणत्या सुद्धा लावू शकता.
मग एका पाटावर लाल रंगाचे कापड घालून पाटा भोवती छान रांगोळी काढून त्यामध्ये विविध रंग भरावे.
भगवान शिव, पार्वती, गणेश व कार्तिक स्वामींची मनोभावे पूजा अर्चा करावी.
घरातील स्वच्छ केलेले दिवे पाटावर मांडून त्याच्या भोवती फुले ठेवून फुलांनी छान सजावट करावी.
मग सर्व दिव्यामद्धे कापसाची डबल वात घालून तेल घालावे व दिवे प्रज्वलित करावे.
आपली इच्छा असेल व शक्य असेल तर ओल्या मातीचे दिवे सुद्धा बनवून पूजेत ठेवावे.
काही गृहिणी हौस म्हणून कणकेचे गोड दिवे बनवतात. कणकेचे गोड दिवे बनवून लावण्याची सुद्धा प्रथा आहे.
दिव्याना हळद-कुंकू, अक्षता व फूल वाहून त्याची मनोभावे पूजा करावी.
मग नेवेद्य दाखवावा त्यामध्ये गोड दिवे ठेवावे.
निरांजन आरती करावी मग कहाणी आईकावी.
संध्याकाळी दिवे लावल्यावर शुभंकरोती म्हणावी व घरातील लहान मुलांना ओवाळावे. घरातील लहान मुले हे वंशाचे दिवे मानले जातात म्हणून त्यांचे औक्षण करावे.
दीप आमयावस्या साठी कणकेचे दिवे कसे बनवायचे:
साहित्य:
1 वाटी गव्हाचे पीठ
1/4 वाटी गुळ
1/4 वाटी पाणी
1/4 टी स्पून थोडे कमी कमी बेकिंग सोडा
1 टी स्पून तूप
कृती: एका बाऊल मध्ये गुळ व पाणी मिक्स करून घ्या. दुसऱ्या एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ, बेकिंग सोडा व तूप मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये हळू हळू गुळाचे पाणी घालून मिक्स करून घट्ट पीठ मळून घ्या.
आता मळलेले पीठ झाकून 30 मिनिट बाजूला ठेवा. मग त्याचे छोटे छोटे 11 गोळे बनवून घ्या. एक गोळा घेऊन त्याला बोटांनी वाटीचा आकार द्या. मग एका वरच्या बाजूला थोडेसे दाबून पणतीचा आकार द्या. अश्या प्रकारे सर्व दिवे बनवून बाजूला ठेवा.
मोदक पात्रामध्ये पाणी घालून पाणी गरम झाल्यावर त्यावरील चाळणीला थोडेसे तूप लाऊन घ्या. व त्यावर सर्व दिवे मांडून घ्या. दिवे मांडून झाल्यावर झाकण लाऊन 15 मिनिट वाफवून घ्या.
दिवे वाफवून झाल्यावर विस्तव बंद करून झाकण काढून 5 मिनिट तसेच ठेवा. मग एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या.
दिवे थंड झाल्यावर त्यामध्ये तेलाची किंवा तुपाची वात लाऊन पूजा करा.