13 जुलै बुधवार गुरु पूर्णिमा शुभ मुहूर्त तिथी महत्व व सटीक उपाय काय करायचे
गुरु पूर्णिमा ह्या वर्षी 13 जुलै 2022 बुधवार ह्या दिवशी साजरी करायची आहे. ह्या दिवशी आपल्या गुरूचे पूजन व सन्मान करायचा असतो. गुरुब्रह्मा , गुरुविष्णु, गुरुदेवो महेश्वरा : गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम: ह्याचा अर्थ “गुरु ब्रह्मा, विष्णु व महेश आहेत गुरु हा परम ब्रह्मच्या समान असतो त्याना माझ्या नमस्कार”
The text Guru Purnima 2022 Shubh Muhurat Tithi Mahatva v Upay In Marathi be seen on our You tube Chanel Guru Purnima 2022
हिंदू धर्मा मध्ये गुरूला फार महत्व आहे. आपल्या समाजात गुरूचे स्थान हे महत्वाचे आहे. धर्म शास्त्रा नुसार गुरु हा चमकणाऱ्या चंद्रा सारखा असतो. जी आपल्याला अंधारात उजेड देवून आपले जीवन सफल करतो.
गुरु पूर्णिमा ह्या दिवशी चार विदानचे द्यान देणारे महर्षि व्यास ह्यांचा जन्म झाला होता. त्यामुळे ह्या दिवसाला वेद व्यास पूर्णिमा सुद्धा म्हणतात. वेद व्यास हे भगवान विष्णु ह्यांचा अंश अवतार आहेत असे म्हणतात. म्हणून ह्या दिवशी भगवान विष्णु ह्यांची पूजा करण्याचे महत्व आहे. वेद व्यास हयाणी प्रथम वेदांचे द्यान दिले त्यामुळे त्याना पहिल्या गुरूचा मान दिला जातो. म्हणून गुरु पूर्णिमा ही साजरी केली जाते.
गुरु पूर्णिमा महत्व:
हिंदू धर्मामध्ये गुरु पूर्णिमा ह्या दिवशी गुरुची पूजा करणे ही परंपरा आहे. शास्त्रा मध्ये गुरुची पूजा करणे म्हणजे देवाची पूजा करण्या सारखे आहे. म्हणून गुरु पूर्णिमा ह्या दिवशी आपल्या गुरुची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा.
गुरु पूर्णिमा तिथी व शुभ मुहूर्त
आषाढ पूर्णिमा तिथी प्रारंभ : बुधवार, 13 जुलै सकाळी 4 वाजून 1 मिनिट पासून ते
आषाढ तिथी समाप्त 14 जुलै रात्री 12 वाजून 7 मिनिट
गुरु पूर्णिमा ह्या दिवशी करावयाचे उपाय:
1. गुरु पूर्णिमा ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाला गोड पाणी घाला त्यामुळे लक्ष्मी माताची कृपा सदैव आपल्यावर राहील.
2. आपल्या कोणत्या सुद्धा कार्यात सफलता पाहिजे असेलतर भगवान श्री कृष्ण ह्यांना गाईच्या तुपाचा दिवा लावावा व आपल्या कामा बद्दल मना पासून प्रार्थया करावी आपले काम नक्की होईल.
3. विद्यार्थीना अगर अभ्यास करण्यास अडथळे येत असतील किंवा मन एकाग्र होत नसेलतर गुरु पूर्णिमा ह्या दिवशी गीता मधील कोणता सुद्धा एक अध्याय वाचावा.
4. ज्योतिष शास्त्रा नुसार करियर मध्ये तरक्की करण्यासाठी गुरु पूर्णिमा ह्या दिवशी जरूरतमंद व्यक्तिला पिवळी वस्तु दान करावी म्हणजे चनाडाळ, बेसन, पिवळे वस्त्र, पिवळी मिठाई, गूळ इ.
5. गुरु पूर्णिमा ह्या दिवशी भगवान श्री कृष्ण ह्यांची पूजा करून गाईची सेवा करावी. त्यामुळे विद्यार्थी मुलांची परेशानी दूर होईल.
6. जर कुंडली मध्ये गुरु दोष असेलतर ॐ बृं बृहस्पतये नम: हा मंत्र अगदी मनापासून 11, 21, 51 किंवा 108 वेळा म्हणावा.
7 गुरु पूर्णिमा ह्या दिवशी सत्य नारायण पूजा करतात त्यामुळे घरात सुख शांती राहते.