श्रावण शनिवारी भगवान शंकरची पूजा करून शनि दोषा पासून मुक्ती मिळण्यासाठी काही खास उपाय करा
शनिदेव च्या दोष मुक्ती साठी श्रावण महिन्यात शनिवारी करावयाचे उपाय
श्रावण महिन्यात भगवान शंकर ह्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची मनोभावे पूजा अर्चा केल्यास ते लवकर प्रसन्न होतात. श्रावण महिना हा भगवान शंकर ह्यांचा आवडतीचा महिना आहे. चातुर्मास च्या चार महिन्यामधील एक महिना म्हणजे श्रावण होय. त्यामुळे संपूर्ण सृष्टिचा भार भगवान शिव ह्यांच्यावर येतो.
The text Shravan Shanivar Kara Shani Pida che Sope Upay in Marathi be seen on our You tube Chanel Shravan Shanivar che Sope Upay
आता 30 जुलै ह्या दिवशी शनिवार आहे. श्रावण महिन्यातील शनिवार हा दिवस अगदी खास मानला जातो. शनिदेव हे न्याय देवता आहेत. ते दंड देण्याचे काम करतात. म्हणूनच सर्वजण शनिदेवना खूप घाबरतात. व त्यांच्या प्रकोप मुळे वाचण्यासाठी सर्वजण त्यांचे उपाय करीत असतात. शनिदेव हे देवता असूनसुद्धा त्याना क्रूर देवता मानले जाते. श्रावण महिन्यात शनिवारी हा दिवस खास आहे:
असे म्हणतात की शनीच्या बऱ्याच उपायांमद्धे श्रावणी शनिवारचे उपाय हे सटीक व खास आहेत. कारण की श्रावण महिना शंकर भगवान ह्यांचा आहे व भगवान शंकरहे शनिचे गुरु आहेत. म्हणूनच शनिवारी भगवान शंकर ह्यांची पूजा केल्याने शनि प्रसन्न होतात.
जी व्यक्ति भगवान शंकर ह्यांच्या बरोबर शनि देवाची पूजा करतात त्याना शनिदेव लवकर प्रसन्न होतात. असे म्हणतात की श्रावण महिन्यातील शनि देव संबंधित सर्व समस्या भगवान शिव प्रसन्न होऊन दूर करतात.
श्रावण महिन्यातील शनिवारी केलेले उपाय शनि दोष पासून बचाव करतात.
1. श्रावण महिन्यातील शनिवारी भगवान शिव ह्यांची पूजा करताना त्यांचा प्रिय रंग गडद निळा ह्या रंगाचे कपडे परिधान करून करायला पाहिजे. असे केल्याने शनिदोष पासून मुक्ती मिळते.
2. श्रावण महिन्यातील शनिवारी मंत्र जाप करताना रुद्राक्ष जाप माळ वापरावी असे केल्याने शनि दोषा पासून मुक्ती मिळते.
3. असे सुद्धा म्हणतात की श्रावण महिन्यातील शनिवारी पिपळाचे झाडा जवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असे केल्याने शनि दोष नष्ट होतो. त्याच बरोबर पिपळच्या झाडाला पाणी घालून 7 प्रदक्षिणा घालाव्या.
4. शनिवारी शिवलिंग वर जल अभिषेक करावा त्यामध्ये काळे तीळ घालावे. असे म्हणतात की असे केल्याने भगवान शिव ह्यांच्या बरोबर शनि भगवान ह्यांची सुद्धा कृपा मिळते.
5. श्रावण महिन्यात शिवजीनची पूजा करताना शिवलिंग वर तांदूळ वहावे त्यामुळे आर्थिक तंगी दूर होते.
6. जर घरात कोणी आजारी असेलतर शनिवारी गाईच्या शुद्ध तुपानी शिव अभिषेक करा. त्यामुळे आजारी व्यतीला लवकर आराम मिळेल.
7. शनिवारी काळे तीळ दान करावे व शिव जिना काळे तीळ अर्पित करावे.
8. शनिवारी काळे कपडे दान करावे. त्यामुळे शनि मुक्ती मिळेल.
9. सुख समृद्धी साठी शनिवारी शिव मंदिर मध्ये जवस चे दान करावे. त्यामुळे शनि पीडा पासून मुक्ती मिळेल.
10. शनिवार ह्यादिवशी शिव लिंग वर दूध व गंगाजल अर्पित करावे त्यामुळे पुण्य मिळते.
टीप: वर सांगितलेले उपाय आपल्या माहिती साठी देत आहोत आम्ही त्याची कोणतीसुद्धा जबाबदारी घेत नाही.