श्रावण महिन्याचे महत्व काय करावे काय करू नये
श्रावण महिन्याचे महत्व काय आहे तसेच भगवान शिव ह्यांना श्रावण महिना का प्रिय आहे. भगवान शंकर ह्यांची पूजा कशी करायची व तीचा लाभ कसा होतो.
29 जुलै शुक्रवार ह्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होत आहे. तर 27 ऑगस्ट शनिवार ह्या दिवशी समाप्त होत आहे. हा महिना खास करून भगवान शंकर ह्यांना प्रिय आहे.
The text Shrawan Maas Importance And What To Do Or Not Vidhi in Marathi be seen on our You tube Chanel Shrawan Maas Importance
आपल्या हिंदू शास्त्रा नुसार तसेच पुरातन काला पासून श्रावण महिना भगवान शिव व माता पार्वती ह्यांना समर्पित आहे. भगवान शिव ह्यांनी स्वतः सांगितले आहे की त्यांना हा महिना प्रिय आहे.
श्रावण महिना म्हणजे पाऊस व त्यामुळे सर्व ठिकाणी हिरवीगार शेत व झाडांची पालवी बघून मन खूप प्रसन्न होते. श्रावण महिना म्हणजे प्रतेक दिवस महत्व पूर्ण आहे. पण श्रावण सोमवार ह्या दिवसाचे विशेष महत्व आहे. श्रावण महिनामध्ये सोमवार ह्या दिवशी व्रत ठेवून भगवान शंकर ह्यांची पूजा अर्चा करावी त्याच बरोबर जलाभिषेक, रुद्राभिषेक, जप करणे फलदाई आहे. असे म्हणतात की ह्या महिन्यात
भगवान शंकर हे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. ह्या महिन्यात रामचरित मानस व राम नाम संकीर्तन ह्याचे विशेष महत्व आहे.
पौराणिक मान्यता अनुसार श्रावण महिन्यात माता पार्वतीनी भगवान शंकर ह्यांची तपस्या करून त्यांना प्रसन्न करून घेतले व आपले पती म्हणून प्राप्त केले होते. म्हणून सुद्धा भोलेनाथ ह्यांना श्रावण महिना अतिप्रिय आहे.
अजून एका मान्यता अनुसार समुद्र मंथनच्या वेळी समुद्र मधून निघालेले हलाहल विष भगवान शंकर ह्यांनी आपल्या गळ्यामध्ये साठवून ठेवले होते. तेव्हा त्यांना गळ्यामध्ये खूप वेदना होत होत्या म्हणून सर्व देवांनी भगवान शंकर ह्यांचा जलअभिषेक करून ती जळजळ कमी केली होती व त्यांना त्याच्या पासून शांती मिळाली होती. त्यामुळे ते प्रसन्न झालेहोते. म्हणून भगवान शंकर ह्यांना जलअभिषेक करण्याचे विशेष महत्व आहे.
श्री रामचरित मानसमध्ये तुलसीदास ह्यांनी श्रावण महिन्या बद्दल असे लिहिले आहे.
बरषा रितु रघुपति भगति, तुलसी सालि सुदास।
रामनाम बर बरन जुग, सावन भादव मास॥
अश्या प्रकारे श्रावण महिना भक्ति व हरियालीचे प्रतीक आहे.
श्रावण महिन्यात सोमवारचे व्रत सुरू करू शकतो ह्या महिन्यात जी व्यक्ति सोमवारचे व्रत करील व बेल व दूध-दही, तूप, मध व ऊसाचा रस इ. नी श्री भोलेनाथ ह्यांचा अभिषेक करील भोलेनाथ त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करील.
श्रावण महिन्यात शिवलिंगची पूजा करण्याचे महत्व आहे. ज्या भक्तांना पुत्र प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी शिवलिंगची पूजा अर्चा करावी व गाईच्या दुधानी अभिषेक करावा. असे केल्याने मनोकामना पूर्ण होईल.
लग्न न झालेल्या मुली चांगला पती मिळवा म्हणून सोमवारचे व्रत करू शकतात. जे भक्त जी मनोकामना घेऊन भोलेनाथ ह्याच्या दरबारात जातात व त्यांची श्रद्धा पूर्वक आराधना करतात त्यांची मनोकामना श्री भोलेनाथ नक्की पूर्ण करतात.
श्रावण महिन्यात भोलेनाथ व माता पार्वतीची पूजा अर्चा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतील.
श्रावण महिन्यात ह्या चुका करू नका:
श्रावण महिन्यात भगवान शिव ह्यांना पूजा करताना कधी सुद्धा कुंकू अर्पित करू नका. शिवजीना संसारचा संहारक मानले जाते. म्हणून त्यांना नेहमी चंदन अर्पित करा. सिंदूर चा रंग लाल आहे व तो रंग उग्र मानला जातो.
भगवान शिव ह्यांना तुळस कधी सुद्धा अर्पित करू नये. जर तुम्ही पंचामृत अर्पित करीत असाल तरी सुद्धा त्यामध्ये तुळस घालू नये नाहीतर आपल्याला त्या पूजेचे फळ मिळत नाही. पूजा करताना शिवजीना नारळ, तीळ, हळद व केतकी म्हणजेच केवडा अर्पित करू नये.
श्रावण महिन्यात अंगाला तेल सुद्धा लाऊ नये. कारणकी ते अशुभ मानले जाते. तसेच ह्या महिन्यात झाडे व फुले ह्यांना इजा होईल असे करू नये. जर तुम्हाला शिवजिनची कृपा पाहिजे असेलतर अधिक वृक्ष रोपण करा.
श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो म्हणून ह्या महिन्यात दारू, मांस मासे सेवन करू नये तसेच तामसी भोजन ण घेता सात्विक भोजन करा.
श्रावण महिन्यात दही, ताक, साग, वांगी, आल-लसूण-कांदा सेवन करू नये कारणकी ते सेवन केल्यास आपले मन पूजा अर्चा मध्ये लागत नाही. त्याच बरोबर आपले सकारात्मक विचार ठेवा.