मऊ लुसलुशीत चॉकलेट केक तोंडात टाकताच विरघळणारा रेसीपी
केक हा सर्वाना म्हणजेच लहान असो किंवा मोठे असो आवडतो. केक आपण वाढदिवसच्च्या दिवशी किंवा इतर दिवशी किंवा डेझर्ट म्हणून सुद्धा बनवू शकतो. चॉकलेट केक हा स्वादिष्ट लागतो त्याचा रंग किंवा खुशबू सर्वाना आवडतो.
चॉकलेट केक आपण घरच्या घरी अगदी बेकरी सारखा बनवू शकतो. आपण घरी सुद्धा बेकरी सारखा मऊ लुसलुशीत केक बनवू शकतो. चॉकलेट केक बनवायला अगदी सोपा आहे व झटपट होणारा आहे.
आपण केक ओव्हनमध्ये किंवा कुकरमध्ये सुद्धा बनवू शकतो. चॉकलेट केक बनवण्यासाठी मैदा, कोको पावडर, कॉफी पावडर, तेल दूध व पाणी वापरले आहे.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
बेकिंग वेळ: 40-45 मिनिट
वाढणी: 7-8 जणांसाठी
साहित्य:
2 कप मैदा
½ कप कोको पावडर
2 कप पिठी साखर
2 अंडी
1 कप तेल
1 कप दूध
1 कप गरम पाणी (गरम)
2 टी स्पून बेकिंग पावडर
1 टी स्पून बेकिंग सोडा
½ टी स्पून कॉफी पावडर
1 ½ टी स्पून व्हनीला एसेन्स
½ टी स्पून मीठ
कृती: प्रथम मैदा, पिठीसाखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, कोको पाउडर, कॉफी पाऊडर व मीठ घालून मिक्स करून चाळून बाजूला ठेवा. केकच्या भांड्याला तेल लावून वरतून मैदा भुरभुरा व भांडे बाजूला ठेवा. मायक्रोवेव कोनव्हेकशन मोडवर प्रीहीट करायला ठेवा.
एका बाउलमध्ये तेल व गरम पाणी मिक्स करून घ्या. पाणी थोडे थंड झालेकी त्यामध्ये दूध घालून परत मिक्स करून घ्या. आता त्यामध्ये व्हनीला एसेन्स घालून मिक्स करून त्यामध्ये हळू हळू चाळलेला मैदा घालत हलवत रहा. मिश्रण एक सारखे झालेकी तेल लावलेल्या भांड्यात ओतून भांडे टॅप करा म्हणजे त्यामध्ये जर एअर बबल असतील तर निघून जातील.
आता भांडे मायक्रोवेव मध्ये ठेवून 45 मिनिट केक बेक करून घ्या. केक बेक झाला की बटन बंद करून 10-15 मिनिट केक मायक्रोवेव मध्येच राहू द्या. मग काढून थंड झाल्यावर कापून सर्व्ह करा.