वास्तु टिप्स घरात हळदीच्या रोपापासून होणारे फायदे
आपल्याला माहीत आहे का? घरात हळदीचे रोप लावण्याचे वास्तुशास्त्रा नुसार फायदे काय आहेत व ते घरच्या कोणत्या दिशेस लावावे.
वास्तु शास्त्रा नुसार काही रोप जी आहेत ती घरात लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की ही रोपे लावल्याने घरात सुख शांती लाभते व घरातील आर्थिक स्थिति चांगली राहते. अश्या काही रोपान पैकी एक रोप म्हणजे हळदीचे रोप होय. हिंदू धर्मामध्ये हळद ही खूप शुभ मानली जाते. म्हणूनच हळदीचा वापर प्रतेक शुभ कार्यामध्ये केला जातो. असे म्हणतात की कोणत्या सुद्धा शुभ कार्यासाठी हळदीचा वापर केल्यास आपले काम सफल होते.
The text Vastu Tips: Benefits Of Planting Haldi (turmeric) Plants at Home Marathi be seen on our You tube Chanel Vastu Tips: Benefits Of Planting Haldi (turmeric) Plants at Home
वास्तु शास्त्रा नुसार घरात हळदीचे रोप लावणे शुभ मानले जाते व भाग्यशाली सुद्धा मानले जाते. हळदीचे रोप लावल्याने घरात सुख समृद्धी येवून आर्थिक तंगी दूर होते. चला तर मग आपण पाहूया की हळदी चे रोप लावल्याने काय फायदे होतात व कोणत्या दिशेस लावावे.
1. हळदीचे रोप घरात लावल्याने घरात सुख समृद्धी येते:
घरातील बाल्कनीमध्ये किंवा घरच्या बागेत झाडे लावणे सर्वाना आवडते. त्यामुळे घरात छान वातावरण राहून आपली तब्येत चांगली राहते. वास्तु शास्त्रा नुसार काही रोप घरात लावल्याने घरात सुख समृद्धी येऊन ग्रह सुद्धा मजबूत राहतात. त्याच बरोबर आर्थिक तंगी सुद्धा दूर होण्यास मदत होते. त्यामधील एक रोप म्हणजे हळदीचे रोप होय. हे रोप लावल्याने घरात सुख समृद्धी येते व आर्थिक प्रश्न सुटू लागतात.
2. हळदीचे रोप हे भगवान विष्णु ह्यांच्याशी संबंधित आहे:
असे म्हणतात की भगवान विष्णु ह्यांचा हळदीच्या रोपाशी अगदी सरळ संबंध आहे. म्हणूनच भगवान विष्णु ह्यांची पूजा करताना हळद आवश्य वाहिली जाते. गुरुवारच्या व्रताच्या दिवशी जर हळदीच्या रोपा बरोबर केळीच्या रोपाची पूजा केली असता भगवान विष्णु ह्यांची विशेष कृपा मिळते. हळद ही माता लक्ष्मी हयाना अतिप्रिय आहे. पिवळ्या हळदीनी भगवान विष्णु हयना प्रसन्न करू शकतो. भगवान शनि हे काळ्या हळदीचे प्रतिनिधित्व करतात. परंतु काळ्या हळदीचा वापर खाण्यासाठी करत नाहीत. काळी हळद वर लाल कुंकू लाऊन ते नाग केशरच्या बरोबर चांदीच्या डब्बित ठेवा व त्याची शक्ति वाढवण्यासाठी तिजोरीमध्ये ठेवा. असे केल्याने धनाची कधी सुद्धा कमतरता होणार नाही व आर्थिक लाभ होतील.
3. तिजोरीमध्ये ठेवा हळकुंड:
घरात आपण जय जागी धन ठेवतो किंवा तिजोरी ठेवतो त्याठिकाणी एक हळकुंड ठेवावे असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा नेहमी आपल्यावर राहते. त्याच बरोबर पैशाचा ओघ चालू राहतो. व हळदीचा हा उपाय आपल्याला सफलता देतो. हळकुंड बरोबर आपण श्री यंत्र किंवा कुबेर यंत्र तिजोरी मध्ये ठेवले तरी त्यामुळे आपली आर्थिक सुधारणा होते.
4. हळदीचे रोप घरात लावल्याने परिवारातील रिश्ते मजबूत बनतात:
वास्तु शास्त्रा नुसार घरात हळदीचे रोप लावणे शुभ मानले जाते. कारणकी त्यामुळे घरातील परिवारीक संबंध सुधारून मजबूत बनतात. घरात हळदीचे रोप लावल्याने गुरु हा ग्रह बलवान बनतो. त्यामुळे परिवारीक मतभेद दूर होतात व घरात सकारात्मक ऊर्जा येऊन नकारात्मक ऊर्जा घरच्या बाहेर जाते.
5. मनोकामनांची पूर्ती करते हळदीचे रोप:
असे म्हणतात की हळदीची जाप माळ वापरुन केलेला मंत्र जाप शुभ फळांची प्राप्ती देते. त्याच बरोबर हळदीच्या रोपाची दररोज पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.
6. हळदीचे रोप कोणत्या दिशेला लावावे:
घरातील व्यक्तिमध्ये प्रेम संबंध राहण्यासाठी हळदीचे रोप घराच्या पश्चिम-उत्तर दिशेला लावणे शुभ मानले जाते.
वास्तु दोष दूर करण्यासाठी हळदीचे रोप आग्नेय कोनामद्धे लावावे.
हळदीचे रोप उत्तर किंवा पूर्व दिशेस लावू शकता.
म्हणूनच घरात हळदीचे रोप लावावे त्यामुळे सुख समृद्धी येते व त्याची नियमित पूजा केल्याने मनोकामना पूर्ती सुद्धा होते.