आजीचा (दादी-नानी) बटवा ब्युटी टिप्स: सुंदर व चमकती त्वचा आजीचे घरगुती सटीक उपाय नुस्खे
खूबसूरत व दमकती त्वचा म्हणजेच सुंदर व चमकती त्वचा साठी दादी-नानी आजीच्या बटव्यतील सोपे घरगुती उपाय किंवा नुस्खे
आजकाल प्रदूषण व गरमी मुळे आपल्या स्कीनवर त्याचा खूप वाईट परिणाम होत आहे. त्यासाठी बाजारात बरेच महागडे क्रीम, फेसवॉश व बरेच प्रोडक्टस उपलब्ध आहेत त्याच्या उपयोग करून आपण आपली त्वचा साफ सुतरी ठेवतो. पण नंतर त्याचे आपल्या स्कीनवर दुष्परिणाम सुद्धा होताना आपण पहातो. तसेच प्रतेक वेळेस आपल्याला एव्हडे महागडे क्रीम घेणे सुद्धा शक्य होत नाही.
The text Aaji Nani Maa Beauty Tips For A Beautiful Skin in Marathi be seen on our You tube Chanel Aaji Nani Maa Beauty Tips For A Beautiful Skin
तरुण मुली किंवा महिला पिंपल्स, ब्लैकहेड्स व व्हाइटहेड्स सारख्या समस्यांनी परेशान झालेल्या आपण पाहतो. मग बाजारातील महागडी क्रीम वापरुन स्कीन बरी करतात पण आपल्या आजीच्या बटव्यतील प्रयोग किंवा उपाय करून पहा खूप उपयोग होतो. म्हणूनच आजीचे बटव्यतील उपाय खूप लोकप्रिय सुद्धा आहेत. त्यामध्ये आपले घरगुती सामान म्हणजेच फुले, पाने किंवा मसाले वापरुन आपण आपली स्कीन सुंदर बेदाग ठेवू शकतो.
सौंदर्य प्रसाधन म्हंटले की महिलांचा आवडतीचा विषय होय. वय वाढायला लागलेकी महिला आपले सौन्दर्य वाढवण्यासाठी नानाविध प्रकारची सौंदर्य प्रसाधनचा प्रयोग करतात. पण आज सुद्धा दादी नानी किंवा आजीचे नुस्खे जास्त प्रमाणात काम करतात कारणकी त्याचा काही सुद्धा साईड इफेक्ट होत नाही. आजून सुद्धा बऱ्याच महिला ह्या होम रेमिडीज आचरणात आणतात व त्याचे प्रयोग सुद्धा करतात.
घरगुती नेचरल ब्युटि टिप्स आहेत त्या आपण पाहू या:
1. हळद: प्राचीन काळा पासून हळद ही आपल्या स्कीनचे सौन्दर्य वाढवण्यास वापरली जाते. तर काय करायचे थोडेसे कच्चे दूध व त्यामध्ये एक चिमूट हळद घालून मिक्स करून चेहऱ्यावर व हाता पायावर लावावे व हलक्या हातानी मालीश करावे. त्यामुळे स्कीनवर असेलला मळ निघून जाईल. त्यामुळे चहऱ्यावरील व हाता पाया वरील चमक वाढेल. चंदन, दूध, मलई व मध मिक्स करून त्याच्या फेस पॅक चेहऱ्यावर लावल्यास नेचरल ग्लो येतो.
2. बॉडी स्क्रबिंगसाठी बेसन एक नेचुरल चीज़ आहे. स्नान करण्याच्या अगोदर बेसनमद्धे एक चिमूट हळद व थोडेसे दूध घालून त्याची पेस्ट बनवून ती बॉडी वर लाऊन हलक्या हातानी मसाज करा. त्याच्या मुळे डेड स्कीन निघून जाईल. असे केलेतर साबण सुद्धा लावायची गरज नाही.
3. तुळशीची पाने गुलाबजलमध्ये 15-20 मिनिट भिजत ठेवा. मग ती वाटून त्यामध्ये एक चिमूट हळद घालून चेहऱ्यावर लावावे. काही दिवसातच आपल्याला बेदाग व चमकदार स्कीन पाहायला मिळेल.
4. बटाटा किसून त्याचा रस काढून त्यामध्ये चंदन पावडर मिक्स करून चेहऱ्यावर लाऊन हलक्या हातानी मसाज करून 15 मिनिट तसेच ठेवावे. मग थंड पाण्यानी चेहरा धुवावा.
5. संत्र्याची साल उन्हात सुकवून त्याची पाउडर करून त्यामध्ये मुलतानी माती व बेसन घालून मिक्स करून त्याचा एक पॅक बनवा मग चेहऱ्यावर लाऊन 15 मिनिट तसेच ठेवा. मग कोमट पाण्यानी चेहरा धुवावा.
6. दुधाचा प्रयोग: प्राचीन काळी नवी नवरीची त्वचा निखारण्यासाठी कच्च्या दुधाचा प्रयोग केला जायचा. तेव्हा दुधामध्ये हळद मिक्स करून त्याचा लेप नव्या नवरीला लावायचे त्यामुळे तिची त्वचा निरखून यायची. तेव्हा नुसत्या कच्च्या दुधानी चेहऱ्यावर मालीश करत त्यामुळे स्कीनची छिद्र उघडायची व त्यामुळे अगदी नेचरल पद्धतीने स्कीन क्लीन व मॉश्चराइज्ड व्हायची. ही परंपरा अजूनसुद्धा आचरणात आणतात.
7. केसरचा उपयोग: आपण पदार्थ बनवताना केसर वापरतो पण त्याच्या वापर सौन्दर्य प्रसाधने बनवण्यासाठी सुद्धा केला जातो. आजीच्या म्हणण्यानुसार जर दुधात केसर घालून रोज चेहऱ्यावर लावल्यास आपली स्कीनला नेचरल ग्लो येतो. जर दूध, चंदन व केसर मिक्स करून लावलेतर टॅन झालेली स्कीन दूर होते. किंवा पोपई, दूध, केसर व मध मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास डेड स्कीन निघून जाते. तसेच केसर, लिंबू, मध व बदाम ह्याचा प्रयोग केला तर स्कीन टाइट होऊन सुरकुत्या कमी होतात.