गणेश चतुर्थी 2022 मुहूर्त महत्व पूजाविधी नानाविध प्रकारचे मोदक व खिरापत
गणेश उत्सव हा हिंदू लोकांचा मोठा सण आहे. भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी ह्या तिथीला गणपती बाप्पा ह्यांची स्थापना करतात. 10 दिवस साजरा होणारा गणेश उत्सव 31 ऑगस्ट ह्या दिवशी सुरू होत असून 9 सेप्टेंबर 2022 ह्या दिवशी अनंतचतुर्थी आहे ह्या दिवशी गणेश विसर्जन करायचे आहे. ह्या वर्षी गणेश चतुर्थी ह्या दिवशी दोंन चांगले शुभ यौग आहेत.
The text Ganesh Utsav 2022 Muhurat Mahatva Puja vidhi Nanavidh Prakarche Modak W Khirapat in Marathi be seen on our You tube Chanel Ganesh Utsav 2022
नानाविध प्रकारचे मोदक व खिरापत ह्याची लिंक येथे क्लिक करून पहा: मोदक व खिरापत
गणेश उत्सव 2022 तिथि (Ganesh Utsav 2022 Time)
भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथि आरंभ 30 ऑगस्ट 2022 दुपारी 3 वाजून 34 मिनट
चतुर्थी तिथि समाप्ती 31 ऑगस्ट दुपारी 3 वाजून 23 मिनट
गणेश उत्सव 2022 योग (Ganesh Chaturthi 2022 Shubh yoga)
गणेश उत्सवची सुरुवात ह्या वर्षी बुधवारी होत असून बुधवार हा दिवस गणपतीजिना समर्पित आहे. त्याच बरोबर गणेश चतुर्थी ह्या दिवशी रवी योग सुद्धा आहे, ह्या दोन्ही संयोगामुळे गणेश चतुर्थीचे महत्व अजून वाढले आहे. असे म्हणतात की रवी योग असताना गणेश पूजा केल्यास सर्व कष्टाचा नाश होतो. गणपती बाप्पा आपले सर्व दुख नष्ट करतो व सर्व अशुभ योगांचा प्रभाव नष्ट करण्याची शक्ति देतो.
रवि योग – 31 ऑगस्ट 2022, सकाळी 06.06 – 1 सप्टेंबर 2022, सकाळी 12.12
10 दिवस गणेश उत्सवचे महत्व: (Ganesh chaturthi significance)
प्रथम दिवस ह्या दिवशी श्री गणेशजी ची आराधना केल्यास सर्व विघ्न दूर होतात. भाद्रपद शुल्क पक्ष ह्या दिवशी पासून 10 दिवस भगवान गणेश पृथ्वीवर वास करतात. म्हणून ठीक ठिकाणी मंडप घालून गणेशजीनची स्थापना करतात व घरात सुद्धा त्यांची स्थापना करून त्यांची मनोभावे पूजा अर्चा केली तर आपल्या जीवनात सुख समृद्धी येते.
गणेश चतुर्थी 2022 पूजा- विधि
गणेश चतुर्थी ह्या दिवशी सकाळी लवकर उठून घरातील देव्हाऱ्यात दिवा लावावा. मग व्रत पूजाचा संकल्प करावा. शुभ मुहूर्तवर श्री गणेशजीनची मूर्ती स्थापना करावी. भक्त आपल्या आर्थिक परिस्थिती नुसार मूर्ती आणू शकतात. मग गंगाजल अर्पण करावे. मग फूल, दूर्वा, अर्पित करावे. दूर्वा गणेशजिना प्रिय आहेत. असे म्हणतात की दूर्वा अर्पित केल्याने गणेशजी प्रसन्न होतात व भक्ताची सर्व परेशानी दूर करतात. कुमकुम लावून मग मोदक किंवा लाडू अर्पित करा. मग शेवटी आरती म्हणून नमस्कार करावा. मग प्रसाद वाटावा.
गणेश चतुर्थी पूजा सामग्री लिस्ट
गणेशजीनची मूर्ती
लाल कापड आसनसाठी व पंचा
जानवे
कलश, 5 विडयाची किंवा आंब्याची पाने व नारळ
2 विडयाची पाने त्यावर ठेवायला खारीक, खोबरे, हळकुंड, सुपारी,बदाम
हळद-कुंकू, अक्षता, अत्तर
फुलांचा हार, फुले, दूर्वा
5 फळे, पंचामृत व खिरापत
गंगाजल
गणेश चतुर्थी ह्या दिवशी चंद्रदर्शन बिलकुल करू नये:
गणेश चतुर्थी ह्या दिवशी चंद्र दर्शन घेऊ नये. असे म्हणतात की चंद्र दर्शन झाले भविष्य मध्ये कलंक लागून काही खोटे आरोप येऊ शकतात. म्हणूनच चंद्र पाहू नये.