श्री जिवतीची आरती इन मराठी
श्रावण शुक्रवार ह्या दिवशी श्री जीवतीची पूजा केली जाते. आपल्याला बाजारात जीवती देवीचा फोटो किंवा कागद मिळतो तो घरी आणून आपल्या देव्हाऱ्याच्या जवळ लावावा. मग श्रावण महिन्यातील प्रेतक शुक्रवारी त्याची पूजा करायची पूजा करताना हळद, कुमकुम, अक्षता, फुले, आघाडा, दूर्वा, हार, कापसाची माळ बनवून लावावी. मग जीवतीची आरती म्हणावी व कथा आइकावी. शेवटच्या शुक्रवारी पुरणाचा नेवेद्य दाखवून आपला मुलांना ओवाळावे. कारणकी जीवतीची पूजा ही आपल्या मुलांचे रक्षण व्हावे व त्याचे सर्व मंगल व्हावे म्हणून करतात.
The text Jiwatichi Aarti in Marathi can be seen on our You tube Chanel Jiwatichi Aarti
श्रीजिवतीची आरती:
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ ॥
श्रावण येतांचि आणूं प्रतिमा ।
गृहांत स्थापूनि करुं पूजना ।
आघाडा दूर्वा माळा वाहूं या ।
अक्षता घेऊनि कहाणी सांगू या ॥ १ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ ॥
पुरणपोळीचा नैवेद्द दावू ।
सुवासिनींना भोजन देऊ ।
चणे हळददीकुंकू दूधही देऊं ।
जमुनि आनंदे आरती गाऊं ॥ २ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ ॥
सटवीची बाधा होई बाळांना ।
सोडवी तींतून तूंचि तयांना मातां ।
यासाठी तुजला करिती प्रार्थना ।
पूर्ण ही करी मनोकामना ॥ ३ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ ॥
तुझिया कृपेने सौख्य नांदू दे ।
वंशाचा वेल वाढूं दे ।
सेवा हे व्रत नित्य घडूं दे ।
मनीचे हेतू पूर्ण होऊं दे ॥ ४ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ ॥