वास्तु शास्त्र: स्वयंपाक घरातील पोळपाट-लाटणे ठेवण्याची योग्य दिशा, नाहीतर येईल नकारात्मक ऊर्जा
वास्तु शास्त्रामध्ये घरातील प्रतेक वस्तु ठेवण्याची योग्य दिशा आहे. व त्या वस्तूचे योग्य ठिकाणी ठेवण्याचे महत्व सुद्धा आहे. तसेच स्वयंपाक घरातील प्रतेक वस्तु ठेवण्याची दिशा आहे व ती कोणत्या पद्धतीने ठेवायची व कशी ठेवायची हे सुद्धा महत्व पूर्ण आहे. तसेच स्वयंपाक घातील पोळपाट-लाटणे ठेवण्याची दिशा व एक पद्धत सुद्धा आहे जर आपण त्या पद्धतीने ठेवले नाहीतर आपल्या स्वयंपाक घरात नकारात्मक ऊर्जा येते व त्याचा त्रास आपल्याला होतो.
The text Kitchen Vastu Tips For Polpat Latne in Marathi be seen on our You tube Chanel Kitchen Vastu Tips For Polpat Latne
आपल्या घरातील स्वयंपाक घर हे महत्व पूर्ण आहे. वास्तु शास्त्रा नुसार घरातील स्वयंपाक घर हे घरतील प्रतेक सदस्याशी निगडीत असते म्हणजेच त्याचवर त्यांचे आरोग्य व सुख-समृद्धी अवलंबून असते. आपले स्वयंपाक घरची दिशा व त्यामधील ठेवलेल्या वास्तु ह्यांची योग्य दिशा नसेलतर वास्तु दोष निर्माण होतो. तसेच स्वयंपाक घरातील पोळपाट-लाटणे हे खूप महत्वपूर्ण आहे.
आज आपण पोळपाट-लाटणे खरेदी पासून त्याच्या ठेवण्याच्या जागे संबंधतात काय नियम आहेत ह्याची माहिती पाहणार आहेत. चलातर मह आपण पाहूया वास्तु दोष व आर्थिक हानी पासून वाचण्यासाठी स्वयंपाक घरातील पोळपाट लाटणे ठेवण्याचे नियम काय आहेत.
वास्तु शास्ता नुसार पोळपाट-लाटणे हे बुधवारी खरेदी केले पाहिजे. त्यासाठी बुधवार हा दिवस शुभ मानला जातो. एक गोष्ट लक्षात ठेवा की मंगळवार किंवा शनिवार ह्या दिवशी पोळपाल-लाटणे खरेदी केले तर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.
बऱ्याच लोकांना सवय असते की पोळ्या लाटून झाल्याकी पोळपाट तसेच उलटे करून ठेवून द्यायचे पण ही पद्धत खूप चुकीची आहे. वास्तु शास्त्रा नुसार पोळपाट-लाटणे कधी सुद्धा उलटे ठेऊ नये. पोळ्या झाल्याकी स्वच्छ धुवून कोरडे करून साफ जागी ठेवावे. काही जण तसेच कणकेच्या डब्यावर उलटे करून ठेवतात वास्तु शास्त्रानुसार असे करणे म्हणजे दारिद्राचे लक्षण आहे.
पोळपाट घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ते आपल्या स्वयंपाक घरातील ओट्यावर चपाती लाटताना ते स्थिर राहिले पाहिजे म्हणजे चपाती करताना पोळपाटाचा आवाज येता कामा नये. नाहीतर घरातील सदस्यांमद्धे बाचा बाची होऊन संबंध बिघडू शकतात. तसेच तुटलेले पोळपाट-लाटणे सुद्धा वापरू नये. त्याच्या मुळे घरातील सुख समृद्धीवर वाईट परिणाम होऊ शकतो.
पोळपाट खरेदी करताना जर आपण लोखंडी किंवा स्टीलचे म्हणजेच धातूचे घेणार असालतर शनिवारी बिलकुल घेऊ नका. जर लाकडाचे घेणार असालतरी शनिवार किंवा मंगळवार ह्या दिवशी घेऊ नका. पोळपाट कोणते सुद्धा घ्यायचे असेलतर बुधवार ह्याच दिवशी खरेदी करा.
पोळपाट-लाटणे ठेवताना पोळपाट नेहमी स्वच्छ धुवून एका स्टँडवर ठेवा किंवा स्वच्छ जागी उभे करून ठेवा. पिठाच्या डब्यावर ठेवू नका व लाटणे नेहमी आडवे ठेवा.
वास्तु शास्त्रा नुसार पोळपाट लाटणे विषयी असे नमूद केले आहेकी पोळपाट लाटणे स्टीलचे असणे सर्वश्रेष्ठ मानले जाते तर लाकडाचे पोळपाट हे रोगी असलेले मानले जाते. कारणकी त्याच्या मध्ये बुरशी येऊ शकते किंवा तेलाचा वापर केलाकी तेल शोषून घटले जाते.
म्हणूनच पोळपाट लाटणे घेताना ह्या गोष्टी लक्षात घेऊन केल्यावर घरात सुख समृद्धी राहू शकते.
(डिस्क्लेमर: ह्या लेखात जी माहिती दिली आहे टी आपल्याला माहिती होण्यासाठी दिली आहे त्याची कोणती सुद्धा जबाबदारी आम्ही घेत नाही.