श्रावण अमावस्या 2022 ह्या दिवशी करा हे सटीक उपाय
श्रावण अमावस्या ह्या वर्षी शुक्रवार दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 12 वाजून 23 मिनिटांनी सुरू होत असून शनिवार दिनांक 27 ऑगस्ट 2022 दुपारी 1 वाजून 46 मिनिट पर्यन्त आहे.
श्रावण अमावसयाहूया दिवशी मातृदिन आहे त्याच बरोबर पोळा सुद्धा आहे. श्रावण अमावस्या लाच दर्श पिठोरी अमावस्या किंवा हरियाली अमावस्या सुद्धा म्हणतात. श्रावण अमावस्या ह्या दिवशी दान धर्मला विशेष महत्व आहे व ह्या दिवशी दान केल्यास पुण्य मिळून पितृ दोषा पासून मुक्ती मिळते. तसेच श्रावण अमावस्या ह्या दिवशी माता परवी व भोले नाथ शंकर ह्यांची पूजा अर्चना करतात.
The text Shravan Hariyali Amavasya 2022 Shubh Muhurat, Mahatva v Upay in Marathi be seen on our You tube Chanel Shravan Hariyali Amavasya 2022
अमावस्या काळ:
26 ऑगस्ट 2022 शुक्रवार दुपारी 12 वाजून 23 मिनिट सुरू होणार
27 ऑगस्ट 2022 शनिवार दुपारी 1 वाजून 46 मिनिट पर्यन्त
Shravan Hariyali Amavasya 2022: श्रावण (हरियाली) अमावस्या पितृ शांतिचे उपाय:
अमावस्या ह्या दिवशी दान करण्याचे महत्व आहे. तसेच ह्या दिवशी म्हणजेच अमावस्याच्या दिवशी पितृ शांती च्या साठी गरीब व्यक्तिला कपडे व अन्न दान करावे.
श्रावण अमावस्या दिवशी वृक्षारोपण केल्याने पितरांना शांती मिळते. ह्या दिवशी पिंपळ, वड, आवळा, कडूलिंबूही झाडे लावावी व त्यांची काळजी घ्यावी.
हरियाली अमावस्या ह्या दिवशी पिठाच्या गोळ्या बनवून त्या माशांना खाऊ घालाव्या. त्याच बरोबर नदीमध्ये काळे तीळ सोडावे.
आपल्या पितरांचे स्मरण करून पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पित करावे. जल अर्पित करताना त्यामध्ये साखर, तीळ, तांदूळ, व फूल घालून मगच अर्पित करावे. जल अर्पित करताना खाली दिलेला मंत्र सतत म्हणावा. असे केल्याने चांगले फळ मिळते.
मंत्र: ऊं पितृभ्य: नम:
Shravan Hariyali Amavasya 2022: श्रावण अमावस्या महत्व:
धार्मिक व प्राकृतिक महत्व असल्यामुळे श्रावण अमावस्या खूप लोकप्रिय आहे. ह्या दिवशी वृक्षांच्या प्रती आपली कृतज्ञता प्रकट करण्यासाठी हरियाली अमावस्या मानली जाते. त्याच बरोबर धार्मिक दृष्टिकोनातून ह्या दिवशी पितरांना पिंडदान व दान धर्म करण्याचे महत्व आहे.
पौराणिक मान्यताअनुसार पिंपळाच्या वृक्षामध्ये त्रिदेव ब्रह्मा, विष्णु व महेशचा वास असतो. ह्या दिवशी वृक्षा रोपण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात व कष्ट दूर होतात.
भविष्यपुराणमध्ये लिहिले आहे की ज्याना संतान नाही त्यांनी वृक्ष हीच संतान असे मानावे. जे वृक्ष रोपण करतात त्यांचा लौकिक-पारलौकिक कर्म वृक्षच करतात. म्हणूनच ज्यांचे संतान नाही त्यांनी वृक्ष अवश्य लावावे. वृक्षामध्ये विद्यमान देवी-देवताची पूजा करणाऱ्यांची इच्छा पूर्ण करण्याची क्षमता असते. पिंपळ वृक्ष हे दिवस रात्र ऑक्सिजन देते व त्याच्यामध्ये ब्रह्मा, विष्णु और शिव ह्यांचा वास आहे.
श्रावण अमावस्या ह्या दिवशी भगवान शिव व माता पार्वती ह्यांची विधी पूर्वक पूजा केल्यास अखंड सौभाग्य प्राप्ति होते. ह्या दिवशी पिंपळाच्या मुळ भगावर जल व दूध अर्पित करा त्यामुळे पितृ तृप्त होतील. व संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने शनिदेव शांत होतील.