नवरात्री 2022 देवीची 9 रूप महत्व त्यांची पूजा मंत्र
शारदीय नवरात्री ह्या वर्षी 26 सप्टेंबर 2022 सोमवार ह्या दिवसा पासून स्थापना होत असून 5 ऑक्टोबर 2022 बुधवार ह्या दिवशी समाप्त होत आहे.
आज आपण देवीची 9 रूप कोणती आहेत ते पाहू या:
1. प्रतिपदा माता शैलपुत्री पूजा 26 सप्टेंबर 2022 घटस्थापना
शैलपुत्री ही हिमालयाची कन्या असून श्री शिवाची पत्नी होय. हीचे वाहन वृषभ आहे. तिच्या उजव्या हातात त्रिशूल व डाव्या हातात कमळ आहे. हिच्या उपासनेने मनाजोगे लाभ होतात. यश देणारी ही देवता आहे.
The text Navratri 2022 Devichi Rup | Mahatva | Mantra in Marathi be seen on our You tube Chanel Navratri 2022 Devichi Rup | Mahatva | Mantra
2: द्वितीय माता ब्रह्मचारिणी पूजा 27 सप्टेंबर 2022
ब्रह्मपद दिणारी ही देवता आहे. ही प्रसन्न झालीतर मनुष्याला मुक्तीसाठी वरदान आहे. हीच संसार बंधनातून सोडवणारी मोक्षदाईनी आहे. हिच्या उपासनेने भक्ताला तप, सदाचार, वैराग्य, त्याग, संयम या गुणांची प्राप्ती होऊन मोक्ष मिळतो.
3: तृतीय माता चंद्रघंटा पूजा 28 सप्टेंबर 2022
हिच्या डोक्यावर किंवा हातात चंद्र घंटा आहे किंवा जिच्या घंटेमध्ये चंद्र आहे ती चंद्रघंटा. हिला दहा हात आहेत. हिच्या हातात कमळ, धनुष-बाण, त्रिशूल, गदा, खडग, ई आयुधे आहेत. ही लाल वस्त्र परिधान केलेली असून वाघावर बसलेली आहे. हिच्या उपासनेने सर्व पापे व बाधा नष्ट होतात. हिच्या कृपेने अलोकिक दर्शन, दिव्य सुंगध, व दिव्य ध्वनि यांची अनुभूति येते.
4: चतुर्थी माता कुष्मांडा पूजा 29 सप्टेंबर 2022
कुष्मा + अँड. कुष्मा म्हणजे ताप. वाईट ताप देणारा असा हा संसार जिच्या उदरात आहे ती. ही देवी त्रिविध तपांची बोळवण करणारी आहे. ह्या देवीला आठ हात आहेत हिच्या हातात जपमाळ, आणि कमडलू, धनुष व बाण, कमळ व अमृतकलश, चक्र व गदा आहेत ही देवी सिंह वाहिनी आहे. कुष्मांड म्हणजे कोहळा हा ह्या देवीला आवडतो. म्हणून नवाचंडि होमात कुष्मांड अर्पण करतात. हिच्या आशीर्वादाने रोग, शोक, कष्ट, नाहीसे होतात भक्ताला आयू, आरोग्य, यश देणारी ही देवी आहे.
5: पंचमी माता स्कंदमाता पूजा 30 सप्टेंबर 2022
स्कंद म्हणजे कार्तिकेय. भगवान शंकर व माता पार्वती ह्याचे सुपुत्र. हिला चार हात असून दोन हातात कमळपुष्प घेतली आहेत तिसऱ्या हाताची वरद मुद्रा असून शुभ्रवर्ण आहे. व चौथ्या हातात स्कंदाला धरले आहे. हीचे वाहन सिह आहे. हिची उपासनेने चितवृती शांत होते सर्व लौकिक, सांसारिक, मायिक बंधनातून साधक मुक्त होतो.
6: षष्ठी माता कात्यायनी पूजा 1 ऑक्टोबर 2022
ही देवी सिहवाहिनी असून त्रीनेत्रा आहे. विद्यार्णव तंत्रात ही चतुर्भुजा असून शंख-चक्र खड्ग त्रिशूल धरण करणारी आहे. तसेच मस्यपुराणात ही दशभुजा असल्याचे म्हटले आहे.
7: सप्तमी माता कालरात्रि पूजा 2 ऑक्टोबर 2022
रौद्र स्वरूप असलेली, उग्र तपात रामलेली, संहारक अशी तामसी शक्ति म्हणजे कालरात्री होय. सर्व संहारक कालाला सुद्धा नाशाचे भय निर्माण करते, म्हणून तिला कालरात्री म्हंटले आहे. कालरात्री दूषटयांचा नाश, ग्रहबाधानाश करणारी असून. हिच्या उपासनेने उपासक भयमुक्त होतो. पण उपासकाने यमनियमपूर्व शरीर , मन, वाणी यांची शुद्धी ठेवणे आवश्यक आहे. ही दिसण्यास भयंकर असली तरी शुभ फलदायिनी असल्यामुळे हीचे नाव शुभंकरी असेही आहे. गरधब हीचे वाहन आहे. अमावस्या हे या देवीचे प्रतीक मानले असल्याने त्या रात्री साधना करणे श्रेयस्कर मानतात. कार्तिक आमवस्या विशेष मानली जाते. या देवीचे मंत्र पठन शस्त्रूचे उचाटन, नाश यासाठी केले जाते. ही देवी आद्यशक्तीचे सर्वनाशक स्वरूप आहे.
8: अष्टमी माता महागौरी दुर्गा महा नवमी पूजा दुर्गा महा अष्टमी पूजा 3 ऑक्टोबर 2022
हिमवानाची कन्या पार्वती हिने श्री शंकराची आराधना करून त्यांना पती म्हणून प्राप्त करून घेतले. पार्वतीचा वर्ण सावळा व शंकर तर कर्पूरगौर. नववधूला ते काळी म्हणून चिडवत. पार्वतीला राग आला ती विध्य पर्वतावर गेली तिने तप करून ब्रम्हदेवांना प्रसन्न करून घेतले. त्यांच्या कडून गौर वर्ण मागून घेतला व ती गौरवर्ण झाली तेव्हा पासून तिचे नाव गौरी असे पडले पुढे तिचे नाव महागौरी असे पडले. ही चतुरभुज असून हिच्या उजव्या हातात त्रिशूल अ अभयमुद्रा तर डाव्या हातात डमरू व वरमुद्रा आहे. हीचे वाहन बैल आहे. ही शांत चेहऱ्याची असून हिच्या कृपेने असंभव कार्य संभव होते. ही देवी भक्ताचे पाप, ताप निवारण करणारी तसेच दुख, दैन्य दूर करते.
9: नवमी माता सिद्धिदात्री नवरात्रि पारणा विजय दशमी 4 ऑक्टोबर 2022
हिलाच सिद्धीदा किंवा सिद्धीदायिनी असेही म्हणतात. ही देवी अष्ट महासिद्धी देते त्या अश्या अणिमा-महिमा, गरिमा-लघिमा, प्राप्ती-प्राकाम्य, ईशीत्व-वशीत्व. सूक्ष्म रूप धारण करणारी म्हणजे अणिमा. महिमा म्हणजे शरीर मोठे होणे, लघिमा म्हणजे हलके होणे किंवा लवकरात लवकर काम करन्याची शक्ति. गरिमा म्हणजे सर्वाना पूजनीय होण्याची अवस्था तसेच सर्वाना वश करून घेणे या सर्व सिद्धी हिच्या कृपेने मिळतात ही देवी चतुर्भुज असून तीच्या उजव्या हातात चक्र व गदा आहेत. आणि डाव्या हातात शंख व पद्य आहे. हीचे वाहन सिंह असून ही कमलासना आहे. विधिविधानासह हिची उपासना केल्यास उपासकाला अशक्य काहीच राहात नाही.
10: दशमी दुर्गा विसर्जन 5 ऑक्टोबर 2022
शारदीय नवरात्री देवीची 9 दिवसाची 9 रूप व 9 बीज मंत्र काय आहेत.
पहिला दिवस शैलपुत्री ह्रीं शिवायै नम:।
दूसरा दिवस ब्रह्मचारिणी ह्रीं श्री अम्बिकायै नम:।
तीसरा दिवस चन्द्रघण्टा ऐं श्रीं शक्तयै नम:।
चौथा दिवस कूष्मांडा ऐं ह्री देव्यै नम:।
पाचवा दिवस स्कंदमाता ह्रीं क्लीं स्वमिन्यै नम:।
सहावा दिवस कात्यायनी क्लीं श्री त्रिनेत्राय नम:।
सातवा दिवस कालरात्रि क्लीं ऐं श्री कालिकायै नम:।
आठवा दिवस महागौरी श्री क्लीं ह्रीं वरदायै नम:।
नऊवा दिवस सिद्धिदात्री ह्रीं क्लीं ऐं सिद्धये नम:।