नवरात्री 2022 राशी नुसार करा दुर्गापूजा व उपाय सर्व मनोकामना पूर्ण होतील
Navratri 2022 Puja Upay and remedies according to zodiac sign maa durga offers blessing with good luck
शारदीय नवरात्री 26 सप्टेंबर 2022 सुरू झाली असून ह्या काळात आपण आपल्या राशीनुसार दुर्गा पूजा अर्चा कराल तर आपल्याला विशेष फळ प्राप्त होऊन आपल्या मनोकामना लवकर पूर्ण होतील. चलातर मग आपण पाहूया नवरात्रीमध्ये राशीनुसार पूजा व उपाय काय आहेत.
The text Navratri 2022 Puja Upay Rashi Nusar Dewimata karel Manokamnaa Purn in Marathi be seen on our You tube Chanel Navratri 2022 Puja Upay
हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचे विशेष महत्व आहे. 26 सप्टेंबर 2022 पासून नवरात्री सुरू झाली असून ह्या वर्षी दुर्गा माताचे आगमन हत्तीवर विराजमान होऊन होत आहे. माता चे आगमन हत्ती म्हणजे चांगला पाऊस, खुशाली व समृद्धीचे संकेत आहेत. परम शक्ति दुर्गा माताची आराधना करणे सर्वोत्तम मानले जाते. ह्या वर्षी नवरात्री पूर्ण 9 दिवसांची आहे. नवरात्री समाप्ती 5 ऑक्टोबर 2022 रोज होत असून त्यादिवशी दसरा आहे.
शारदीय नवरात्रीचे सर्वात जास्त महत्व असते. असे म्हणतात की भगवान राम ह्यांनी शारदीय नवरात्री मध्ये देवीची उपासना करून विजया दशमी ह्या दिवशी रावणाचा वध केला होता. माता दुर्गा नेहमी आपल्या भक्तावर कृपा ठेवते पण नवरात्री मध्ये राशी नुसार उपाय केले तर विशेष कृपा ठेवते.
चला तर मग आपण पाहू या नवरात्रीमध्ये राशी नुसार उपाय व पूजाविधी
मेषराशी साठी नवरात्री उपाय:
मेषराशी असणाऱ्यांनी स्कंदमाताची पूजा करणे फलदाई आहे. आपण माताला भोग दाखवताना दुधा पासून मिठाई किंवा खीर बनवून दखवू शकता. त्याच बरोबर लाल रंगाचे फूल अर्पित करून कुंजिका स्तोस्त्रचे वाचन करावे असे केल्याने माता स्कंदमाता चे आशीर्वाद मिळतील.
वृषभ राशि असणाऱ्यानी करावयाचे उपाय:
वृषभ राशि असणाऱ्यानी नवरात्रीमध्ये पांढऱ्या वस्तूचा उपयोग करून महागौरीची आराधना करावी. असे करणे वृषभ राशि असणाऱ्याना खूप शुभ आहे. त्याच बरोबर सप्तश्लोकी दुर्गाचे वाचन करावे. असे केल्याने आपल्या आर्थिक स्थितिमध्ये खूप सुधारणा होऊ शकते.
मिथुन राशि असणाऱ्यानी करावयाचे उपाय:
मिथुन राशि असणाऱ्यानी दुर्गा माताचे ब्रह्मचारिणी ह्या रुपाची पूजा करायला पाहिजे त्यामुळे घरात सुख शांतीचे आगमन होईल. माता ब्रह्मचारिणीला साखर व पंचामृतचा भोग शुभ दाई आहे. ह्या छोट्याच्या उपायांनी सुद्धा माता ब्रह्मचारिणीच विशेष कृपा आपल्याला मिळेल.
कर्क राशि असणाऱ्यानी करावयाचे उपाय:
कर्क राशीचा स्वामी चंद्रमा आहे. तर ह्या राशीच्या लोकांनी माता शैलपुत्रीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी दही-भात व बत्तासे भोग म्हणून अर्पित करावे. असे केल्याने जर काही शारीरिक कष्ट असतील तर त्यापासून मुक्ती मिळेल. माता दुर्गाच्या बरोबर भगवान शिव ह्यांची सुद्धा उपासना केली पाहिजे.
सिंह राशि असणाऱ्यानी करावयाचे उपाय:
सिंह राशि असणारे जर धन संबंधित परेशानीनी त्रस्त असतीलतर नवरात्रीमध्ये माता कुष्मांडाची पूजा अर्चा करणे लाभकारी आहे. नवरात्री मध्ये रोली व केसर अर्पित करून कापुर नी देवीची आरती करावी. त्याच बरोबर दुर्गा सप्तशतीचे वाचन करावे.
कन्या राशि असणाऱ्यानी करावयाचे उपाय:
कन्या राशि असणाऱ्यानी देवीचे ब्रह्मचारिणी ह्या रुपाचे मनापासून पूजन करावे. त्याच बरोबर माताला दूध व तांदळाची खीर अर्पित करावी. त्यामुळे आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतील.
तुळ राशि असणाऱ्यानी करावयाचे उपाय:
तूळ राशी असणाऱ्यांनी नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे वचन जरूर करावे. त्याच बरोबर माता महागौरी ला लाल रंगाची चुनरी अर्पित करावी. असे केल्याने आपल्या घरात सुख शांती व आनंद येईल.
वृश्चिक राशि असणाऱ्यानी करावयाचे उपाय:
वृश्चिक राशि असणाऱ्यानी दुर्गा माताचे कालरात्रि ह्या रुपाचे पूजन करावे. त्याच बरोबर रोज सकाळी व संध्याकाळी माताची आरती करायला विसरू नका. तसेच माता ला जास्वंदीचे फूल अर्पित करून गुळाचा भोग दाखवावा.
धनु राशि असणाऱ्यानी करावयाचे उपाय:
धनू राशीचे लोक ह्या काळात आर्थिक परेशानीनी त्रस्त आहेत त्यांनी नवरात्री मध्ये दुर्गा सप्तशतीचे वाचन करावे. त्याच बरोबर कोणती सुद्धा पिवळ्या रंगाची मिठाई व तिळाचे तेल जरूर अर्पित करा.
मकर राशि असणाऱ्यानी करावयाचे उपाय:
मकर राशी असणाऱ्यानी आपली मनोकामना पूर्ती करण्यासाठी माता कात्यायनीला नारळाची बर्फी भोग म्हणून दाखवावी. नवरात्री मध्ये हा उपाय केल्यास खूप शुभदाई ठरेल.
कुंभ राशि असणाऱ्यानी करावयाचे उपाय:
कुंभ राशीच्या लोकांनी माता अंम्बेच्या कालरात्रीच्या रुपाची पूजा अर्चा करणे लाभदायक आहे. त्याच बरोबर देवी कवचे पठन केल्यास आर्थिक खर्च कमी होतो. त्याच बरोबर 2 ठिकाणी तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने घरात सुख समृद्धी येते.
मीन राशि असणाऱ्यानी करावयाचे उपाय:
मीन राशी असणाऱ्यानी नवरात्रीमध्ये रोज नऊ दिवस दुर्गा सप्तशतीचे वाच करावे. तसेच माता चंद्रघंटा ला केळी व पिवळ्या रंगाचे फूल जरूर अर्पित करावे. ह्या छोट्याश्या उपायांनी आपल्या सर्व समस्या दूर होतील.