नवरात्री 9 दिवस नऊ रंग महत्व त्या रंगाचे कपडे परिधान करून मिळवा देवीची कृपा
नवरात्री हा सण हिंदू धर्मामध्ये विशेष महत्वाचा मानला जातो. हा सण पूर्ण देशांत धूम धडाक्यात मानला जातो. देवीचा नऊ दिवसांचा उत्सव सुरू झाला की प्रतेक दिवसाचे रंग व त्याचे महत्व आहे. त्यानुसार त्या रंगाचे कपडे परिधान करून देवीची पूजा अर्चा केल्यास शांती व धन प्राप्ती होते व आपल्याला त्याचे सुख अनुभवायला मिळते. नवरात्री हा सण पूर्ण वर्षात दों वेळा साजरा केला जातो.
एक म्हणजे चैत्र (मार्च-एप्रिल) व शारदा (ऑक्टोबर-नोव्हेंबर) महिन्यामध्ये. नवरात्री ह्या शब्दाचा संस्कृत मध्ये 9 रात्र होतो. हा एक असा सण आहे जो दोन्ही नवरात्रीमध्ये 9 दिवस चालतो. ह्या नवरात्री दिवसांसाठी 9 रंगाचे विशेष महत्व आहे. भारतामध्ये प्रतेक भागात नवरात्री विविध प्रकारे साजरी केली जाते. खर म्हणजे हिंदू देवी काली किंवा दुर्गा माता ह्यांचा विजय उत्सव हा मुळ विचार आहे. नवरात्री ह्या सणामध्ये संपूर्ण देशात बऱ्याच महिला नऊ दिवस उपवास ठेवतात.
The text Navratri Rang 9 Colours 2022 Mahatva v Tya Rangache Kapde Paridhan Karun Devichi Milva Krupa in Marathi be seen on our You tube Chanel Navratri 2022 9 Colours Rang
नवरात्री 2022 ह्या वर्षी 9 दिवस 9 रंगाचे कपडे परिधान करून देवीची उपासना केल्यास देवीची कृपा प्राप्त होते. आता आपण पाहूया 9 दिवसाचे 9 रंग कोणते आहेत:
पांढरा, लाल, रॉयल ब्लू म्हणजेच निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, नारंगी, मोरपंखी, केशरी, गुलाबी
घटस्थापना प्रतिपदा पहिला दिवस 26 सप्टेंबर सोमवार माता शैलपुत्री रंग- पांढरा:
पांढरा रंग हा शरद नवरात्रीचा आनंद व उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. हा रंग शांत आहे व तो सर्वाना आवडतो. माता शैलपुत्री प्रेम व वफादारीचे प्रतीक आहे. ही एक देवी असून तिच्या उजव्या हातात माळ आहे व डाव्या हातात एक पाण्याचे भांडे आहे. आपण ह्या दिवशी आपल्या घराला सजवण्यासाठी पांढऱ्या रंगाची फूल म्हणजेच चमेली किंवा पांढरे कमळ वापरू शकता. ह्या दिवशी पांदऱ्या रंगाची वस्त्र परिधान करून पूजा अर्चा करून आपल्या मित्र परिवाराला भेटायला जा. नऊ दिवस स्वच्छ मनाने पूजा अर्चा केल्यास आपली सर्व दुख दूर होतात.
दूसरा दिवस 27 सप्टेंबर 2022 दिवस मंगळवार माता ब्रह्मचारिणी रंग – लाल:
नवरात्री मध्ये लाल रंग हा सर्वात शक्तिशाली रंग आहे. लाल रंग हा माता ब्रह्मचारिणीचा आहे. हा रंग शक्ति व उग्रता दाखवतो. ह्या दिवशी आपण आपल्या घरात बरेच काही करू शकता. आपण लाल रंगाची फूल वापरुन लाल रंगाचे फळ प्रसाद म्हणून अर्पित करू शकता. आपण लाल रंगाचे कपडे परिधात करून लाल रंगाची कॉस्मेटिक्स वापरू शकता.
तिसरा दिवस 28 सप्टेंबर 2022 दिवस बुधवार चंद्रघंटा रंग- रॉयल ब्लू म्हणजेच निळा:
नवरात्री मधीळ निळा रंग सर्वांना आवडतो. निळा रंग माता चंद्रघंटा ला मनवण्यासाठी वापरतात. चंद्रघंटा माताला अष्टभुजा देवीच्या नावानी सुद्धा ओळखले जाते. कारणकी तिला आठ हात आहेत. असे म्हणतात की ह्या देवीने आपल्या सुंदर हसण्याने दुनिया निर्माण केली आहे. व तिच्या नावाचा अर्थ गरम ऊर्जा व ब्रह्मांडीय असा होतो. असे म्हणतात की नवरात्री च्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे परिधान करून देवीची आराधना केल्यास स्वास्थ, धन व शक्ति मध्ये सुधार होतो.
चौथा दिवस 29 सप्टेंबर 2022 माता कुष्मांडा गुरुवार रंग – पिवळा:
हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग म्हणजे नवीन गोष्टी शिकणे व तसेच ज्ञान ह्या रूपात दर्शविले आहे. पिवळा रंग हा नवरात्रीच्या दिवसान मधील एक रंग आहे. खर म्हणजे पिवळा रंग देवी माता कुष्मांडा चा रंग आहे. जी भगवान कार्तिकेयची माता आहे. ह्या दिवशी हळदीचे सेवन करावे. जेवण बनवताना हळद जरूर वापरावी. आपल्या त्वचा वरती लावावी व पूजेमद्धे सुद्धा वापरावी.
पाचवा दिवस 30 सप्टेंबर 2022 माता स्कंदमाता शुक्रवार रंग – हिरवा:
नवरात्रीमध्ये हिरवा रंग परिधान करून देवी माताची पूजा अर्चा करा. हिरवा रंग हा खूप सुंदर आहे. हिरवा रंग नवीन सुरवात, विकास व नवीन जन्मचे प्रतीक आहे. हिरवा रंग हा माता प्रकृति हिचा रंग आहे. तसेच माता स्कंदमाता ही ह्या रंगांनी मनवली जाते. आपण ह्या दिवशी हिरवे कपडे परिधान करून देवीची आराधना करा.
सहावा दिवस 1 ऑक्टोबर 2022 शनिवार माता कात्यायनी रंग – ग्रे म्हणजेच राखाडी:
सहाव्या दिवशी चमकिले कपडे परिधान करण्याच्या आयवजी ग्रे रंगाचे निराळे कपडे परिधान करा. हा रंग शांत व एलिगेंट रंग आहे. तसेच माता कात्यायनी चांगली म्हणजेच छान म्हणून ग्रे रंगाचे कपडे परिधान करतात. काही लोकांचे म्हणणे आहे की काली व कालरात्री ही एकच आहे. ह्यावरती अजून काही पुष्टी झालेली नाही. खरे तर आपण ग्रे रंगाचे कपडे परिधान करून देवी माताची पूजा अर्चा करून आपल्या जीवनातील नकारात्मकता नष्ट करू शकता.
सातवा दिवस 2 ऑक्टोबर 2022 रविवार माता कालरात्री रंग – नारंगी:
नवरात्रीच्या काळात नारंगी रंग हा खूप खास आहे. हा जीवंत व सुंदर रंग आहे. नारंगी रंग हा नेहमी गरमी, आग, व ऊर्जा ह्याच्याची जोडला गेलेला आहे. माता कालरात्री ला नारंगी रंगानी पूजले जाते. ह्या दिवशी आपले घर व पूजा घर नारंगी रंगानी सजवू शकता व देवी माताला नारंगी रंगाची फूल अर्पित करू शकता.
आठवा दिवस 3 ऑक्टोबर 2022 सोमवार माता महागौरी रंग – मोरपंखी
मोरपंखी हिरवा हा नवरात्री मधील एक सुंदर रंग आहे. ह्या दिवशी देवी माता महागौरीचा पर्व साजरे केले जाते. सिध्दी ह्याचा अर्थ आहे अलौकिक शक्ति व धात्रीचा अर्थ आहे दाता. ती मनुष्याला अलौकिक शक्ति देते. तसेच ती आध्यात्मिक शक्तिचा आशीर्वाद देते. ह्या दिवशी मोरपंखी हिरवा ह्या रंगाचे कपडे परिधान करून देवीची उपासना करा.
नववा दिवस 4 ऑक्टोबर 2022 मंगळवार देवी माता सिद्धिदात्री रंग – गुलाबी
नवरात्री मधील गुलाबी रंग देवी माता सिद्धिदात्री ला प्रसन्न करण्यासाठी परिधान करतात. आपल्या जीवनातील सारे कष्ट नष्ट करण्यासाठी माता सिद्धिदात्रीची पूजा अर्चा करतात. गुलाबी रंग हा शांती व बुद्धी चा रंग आहे. ह्या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे परिधान करून देवीची आराधना करा.
नवरात्री मध्ये 9 दिवस वर सांगितलेले 9 रंग परिधान करून आपले जीवन आनंदी बनवून नवरात्री साजरी करा.
दहावा दिवस 5 ऑक्टोबर 2022 बुधवार दसरा आहे. आपणा सर्वांना दसरा ह्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.