पितृ पक्ष मधील मातृ नवमी (अविधवा नवमी) विशेष महत्व | काय केल्याने पितर प्रसन्न होतील
पितृ पक्ष म्हणजेच श्राद्ध पक्ष आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी खास दिवस आहेत. पण नवमी ही तिथी सर्वात खास मानली जाते कारण की नवमी हा दिवस दिवंगत माता म्हणजेच आई, सुना व मुली ह्याचे श्राद्ध करण्यासाठी आहे.
The text Pitru Paksha 2022 Matru Navami | Avidhwa Navmi Mahatva kay karave in Marathi be seen on our You tube Chanel Pitru Paksha 2022 Matru Navami | Avidhwa Navmi
पितृ पक्ष मधील नवमी ह्या दिवसाचे महत्व जाणून घ्या व ह्या दिवशी काय केल्याने पितर प्रसन्न होतील.
पितृ पक्ष मधील मातृ नवमी ह्या वर्षी 19 सप्टेंबर 2022 सोमवार ह्या दिवशी आहे. ह्याच तिथीला अविधवा नवमी सुद्धा म्हणतात.
पितृ पक्ष मध्ये पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या मृत्यु तिथिला तर्पण, पिंडदान व श्राद्ध कर्म केले जाते. पितृ पक्ष नवमी तिथी ह्या दिवशी दिवंगत आई, सून, मुलगी ह्यांचे श्राद्ध केले जाते व ते चांगले मानले जाते.
मातृ नवमी का खास आहे? Why Matru Navami is special?
पितृ पक्ष मध्ये मातृ नवमी आश्विन कृष्ण पक्ष च्या नवमी तिथीला येते. ह्या दिवशी दिवंगत आई, सून, मुलगी ह्याचे श्राद्ध करणे चांगले मानले जाते. तसे पहिले तर पितृ पक्ष मधील प्रेतक दिवस खास आहे. पण मातृ नवनी ह्याचे महत्व अधिक आहे. ह्या तिथीला मातृ नवमी व सौभाग्यवतीनां श्राद्ध तिथि म्हणतात.
मातृ नवमी शुभ मुहूर्त | Matri Navami Shubh Muhurat
धार्मिक मान्यता अनुसार मातृ नवमी ह्या दिवशी पूर्वजांचे श्राद्ध केल्याने सुख-समृद्धी मिळते. हिंदू पंचांग नुसार 19 सप्टेंबर 2022 ह्या दिवशी नवमी तिथी आहे. 18 सप्टेंबर 2022 रविवार संध्याकाळी 4 वाजून 30 मिनिट पासून नवमी तिथी सुरू होत असून 19 सप्टेंबर 2022 सोमवार 6 वाजून 20 मिनिट पर्यन्त आहे. [अन तिथी नुसार नवमी श्राद्ध 19 सप्टेंबर सोमवार ह्या दिवशी करावयाचे आहे.
मातृ नवमी ह्या दिवशी काय करावे What to do on Matri Navami
* मातृ नवमी ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पांढरे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते.
* नवमी श्राद्ध ह्या दिवशी दक्षिण दिशेला एक चौरंग ठेवून त्यावर पांढरे वस्त्र घालून त्यावर दिवंगत परीजनांचा फोटो ठेवून काळ्या तिळाचा दिवा लावावा.
* मातृ नवमी ह्या दिवशी दिवंगत परिजन ह्यांच्यावर गंगा जल व तुळशी अर्पित करावी. त्याच बरोबर गरुड पुराण किंवा श्रीमद्भागवत गीता ह्याचा पाठ करावा.
* श्राद्ध कर्म झाल्यावर मृत परिजन साठी थोडे जेवण काढून ठेवावे.
* गाय, कावळा, मुंगी, पक्षी, व ब्राह्मण ह्यांच्या साठी सुद्धा जेवण काढून ठेवावे. असे केल्यावरच नवमी श्राद्ध पूर्ण होते.
* मातृ नवमी ह्या दिवशी मृत महिला सुहागन असेलतर सुहागन महिलांना जेवण द्यावे. त्याच बरोबर त्यांना सुहागनची सामग्री अर्पित करावी.
* श्राद्ध झाल्यावर मृत महिलाच्या आत्म्याला शांती लाभो अशी मनोभावे प्रार्थना करावी.
* नवमी श्राद्ध ह्या दिवशी तुलसी माताची सुद्धा पूजा करणे चांगले असते.